Tata Safari, Harrier ने Global NCAP क्रॅश टेस्ट मध्ये किती सेफ्टी स्टार्स मिळवले जाणून घ्या

Published:

Tata Safari, Harrier Global NCAP Crash Test : टाटा मोटर्स आपल्या कार्स च्या सेफ्टी साठी नेहमीच चर्चेत असते. सेफ आणि उत्तम कर बनवणं हे या कंपनीची प्राथमिकता असते. नुकतीच टाटा मोटर्स ने सफारी आणि हॅरियरच्या किमती जाहीर केल्या आहेत त्या सोबतच या प्रीमियम एसयूव्हीज च्या ग्लोबल NCAP क्रॅश टेस्ट चे रेटिंग्स जाहीर केले आहेत, तुम्हाला सांगायला आनंद वाटतो आहे कि टाटा सफारीने टेस्ट मध्ये ५ स्टार मिळवले आहेत. टेस्टचे नवीन मानक लागू झाल्यानंतर ५ स्टार आणि जास्तीत जास्त स्कोर कमवणाऱ्या पहिल्या या दोन एसयूव्ही आहेत. .

  • हॅरियर, सफारीने एडल्ट सेफ्टीत 33.05 गुण मिळवले.
  • चाईल्ड सेफ्टीसाठी 49 पैकी 45 गुण मिळाले.
  • हॅरियर, सफारीची बॉडी शेल इंटिग्रिटी स्टेबल असल्याचे आढळलले.

२०१४ सालापासून टाटा मोटर्स आपली वाहनांची सेफ्टी टेस्ट करण्यासाठी NCAP crash tests साठी पाठवत आहे. टाटा नॅनो, निक्सन, अल्ट्रोज, पंच, टिगोर आणि टिआगो या वाहनांनी आपली सेफ्टी आधीच सिद्ध केली आहे यामध्ये उणीव जाणवत होती ती म्हणजे टाटा मोटर्सच्या प्रीमियम एसयूव्हीजची, तसे तर या वाहनांनी आपली बिल्ड क्वालिटी भारतीय रस्त्यांवर सिद्ध केली आहेत त्यात आता क्रॅश टेस्ट रिपोर्ट समोर आल्याने कंपनीच्या सेल मध्ये आणखीन बूस्ट होणार हे नक्की.

दोन्ही हॅरियर आणि सफारी चे क्रॅश टेस्ट झाली असून दोन्ही गाड्यांची ५ स्टार सेफ्टी गन मिळवले आहेत. लक्ष्यात घेण्यासारखी गोष्ट आहे कि ग्लोबल NCAP टेस्टिंग प्रोटोकॉल अधिक अवघड झाल्यानंतर या वाहनांनी ५ स्टार्स आणि जास्त पॉईंट्स मिळवले आहेत. सफारी, हॅरियर नवीन प्रोटोकॉल मध्ये तर महिंद्रा XUV700 जुन्या प्रोटोकॉल मध्ये क्रॅश टेस्ट झाल्या आहेत, याच कारणास्तव हे सेफ्टी पॉईंट्स कम्पेअर करण्याजोगे नाहीत.

टाटा हॅरियर, सफारी एडल्ट सेफ्टी क्रॅश टेस्ट रेटिंग पॉईंट्स

नवीन टाटा हॅरियर आणि सफारी ने ३४ पॉईंट्स पैकी एकूण ३३.०५ पॉईंट्स मिळवले आहेत ज्याने गाडयांना ५ स्टार रेटिंग मिळाले. परीक्षकांनी दोन्ही मॉडेल्सवर ड्रायव्हर आणि प्रवाशाच्या डोक्याला आणि मानेला दिलेले संरक्षण चांगले असल्याचे रेट केले, तर ड्रायव्हर आणि प्रवाशाच्या छातीचे संरक्षण पुरेसे असल्याचे मानले गेले.

image

साइड इम्पॅक्ट चाचणीमध्ये, हॅरियर आणि सफारी फेसलिफ्टमध्ये डोके, छाती, पोट आणि माकडहाडासाठी  “चांगले संरक्षण”दिले, असे जागतिक वाहन सुरक्षा परीक्षकाने म्हटले आहे. साइड पोल इम्पॅक्ट चाचण्यांवर, SUV ला कर्टन्स एअरबॅग्ज स्टॅंडर्ड मिळतात आणि फिटमेंट, डोक आणि ओटीपोटाचे चांगले संरक्षण, छातीला किरकोळ संरक्षण आणि पोटाला पुरेसे संरक्षण रिक्वायरमेंट पूर्ण करतात. दोन्ही वाहनांची बॉडी शेल “स्टेबल” आणि समोरील इम्पॅक्ट सहन करण्यास सक्षम असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

वाचा – Tata Harrier & Safari Facelift – नवीन जनरेशन प्रीमियम सेगमेंटच्या हॅरियरआणि सफारी लाँच! XUV700 धोक्यात?

टाटा हॅरियर, सफारी चाईल्ड सेफ्टी क्रॅश टेस्ट रेटिंग पॉईंट्स

फेसलिफ्ट टाटा हॅरियर आणि सफारीने ४९ पॉईंट्स पैकी ४५ पॉईंट्स चाईल्ड प्रोटेक्शन टेस्ट मध्ये मिळवले आहेत. चाईल्ड सेफ्टी मध्ये सुद्धा दोन्ही वाहनांना ५ स्टार सेफ्टी रेटिंग देण्यात आली आहे. यामध्ये CRS (child restraint system) इन्स्टॉलेशनसाठी 12 पैकी पूर्ण 12 आणि कमाल 24 डायनॅमिक स्कोअर समाविष्ट आहे.

Tata Safari & Harrier Global NCAP Crash test ratings जाहीर | अवघड प्रोटोकॉल असून ठरल्या नंबर १
Photo of author

Ajinkya Sid

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment Cancel reply

Exit mobile version