उद्धव ठाकरें अजूनही चालवतात ही कार, काय असेल ह्या कारची किंमत आणि फिचर्स? वाचा संपूर्ण माहिती

Aishwarya Potdar

Updated on:

सध्या निवडणुकीच वातावरण सगळीकडे झालं आहे, अश्यात ठाकरे घराण्याची चर्चा होणार नाही अस कधीच घडणार नाही. सध्या उद्धव ठाकरे फडणविसाच्या टिकेमुळे किंवा स्वतः ठाकरेंच्या भाषणामुळे पुन्हा एकदा चर्चेच्या झोतात आले आहेत. यामुळे सर्वत्र इंटरनेटवर उद्धव ठाकरे मराठी बातम्या किंवा उद्धव ठाकरेच्या संबंधित माहिती वेगाने सर्च केली जात आहे. ठाकरे कुटुंबाची माहिती, उद्धव ठाकरे यांचा फोन नंबर माहिती,  उद्धव ठाकरेंच्या कार संबंधित माहिती किंवा उद्धव ठाकरेंची गाडी. म्हणूनच सदर लेखात उद्धव ठाकरे कोणती कार वापरतात? त्या कारची किंमत काय आहे? या संबंधित संपूर्ण माहिती खालील लेखात तुम्हाला मिळेल.

उद्धव ठाकरेंची गाडी

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे याचे चिरंजीव असून, सध्या इंटरनेटवर उद्धव ठाकरेंच्या संबंधित माहिती खूप मोठ्या प्रमाणात शोधली जात आहे, त्यातल्या त्यात सर्वात जास्त ठाकरेंची उत्सुकता असणारा प्रश्न म्हणजे उद्धव ठाकरे किती किंमतीची आणि कोणती कार वापरतात? त्या कारची खासियत काय आहे? कार बुलेटप्रुफ आहे का? कारचे एडवांस्ड फिचर्स काय आहेत?

उद्धव ठाकरे दोन वेगवेगळ्या कार वापरतात; मर्सिडीज-बेंझ एस-क्लास आणि मर्सिडीज-बेंझ जीएल-क्लास. माजी मुख्यमंत्र्यांना स्वतःचे वाहन स्वतःला चालवायला आवडत असल्याने बऱ्याच वेळा त्यांना सेल्फ- ड्राइविंग करताना बघण्यात आले आहे. याआधी मर्सिडीज-बेंझ एस-क्लास या कारमधून उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचे भाऊ- राज ठाकरे यांनासुद्धा एकत्र प्रवास करताना पाहण्यात आले आहे. ज्या-ज्या वेळी उद्धव ठाकरे स्वतः कार चालवत असतं, त्या- त्या वेळी त्यांच्या बॉडीगार्ड्स यांनी त्यांच्या सुरक्षिततेसाठी पाठलाग केला आहे. या दोन कारसोबत उद्धव ठाकरे टाटा सफारी आणि टोयाटोच्या फॉर्चुनर कारमधून प्रवास करताना दिसून आले आहेत.

वाचा: ‘तासाला ५’ गाड्यांची विक्री होते टोयोटाच्या या स्वस्त गाडीची, एका लिटरमध्ये 20 पेक्षा जास्त मायलेज

मर्सिडीज-बेंझ एस-क्लास

2 करोड किंमतीमध्ये बाजारात उपलब्ध असणाऱ्या ह्या कारचे व्हाइट म्हणजेच पांढऱ्या व्हेरिएंटची कार माजी मुख्यमंत्र्यांकडे आहे. दोन इंजिन ह्या कारमध्ये दिले असून,  3.0 लीटरचे आणि  6 सिलेंडर असणारे एक डिझेल इंजिन यासोबत 6 सिलेंडर आणि 3.0 लिटरचे टर्बो-चार्ज्ड पेट्रोल इंजिन ह्या कारमध्ये मिळते. 4व्हील ड्राइव हा पर्याय असणाऱ्या ह्या कारमध्ये 9 स्पीड असणारा ऑटोमॅटिक गियरबॉक्स दिला आहे. या कारच्या सेफ्टी फिचर्समध्ये इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, पुढच्या बाजूस-मागच्या बाजूस पार्किंग सेन्सर आणि 10 एयरबॅग्स यांचा समावेश आहे.

वाचा: जगातली पहिली ऑटोमॅटिक ओलाची स्कूटर, ड्रायव्हरशिवाय चालणाऱ्या ओला सोलोची संपूर्ण माहिती

मर्सिडीज-बेंझ जीएल-क्लास

ठाकरेंची दुसरी कार ही पांढऱ्या रंगाची मर्सिडीज-बेंझ जीएल-क्लास ही आहे, ह्या कार मध्ये दोन इंजिन पर्याय मिळतो, पेट्रोल आणि डिझेल इंजिन. 8 सिलेंडर आणि ऑटोमॅटिक ट्रांसमिशन असणारी ह्या कार ची किंमत 1.90 करोड इतकी आहे. सेफ्टीसाठी या एसयुव्ही मध्ये एयरबॅग्स, रियर पार्किंग कैमरा या इतर एडवांस्ड फिचर्सचा समावेश आहे.

वाचा: दुचाकीच्या किंमतीमध्ये मिळणार टाटा नॅनो, चौरस कुटुंबासाठी बेस्ट ईव्ही,वाचा संपूर्ण माहिती

टोयाटो फॉर्चुनर आणि टाटा सफारी

ठाकरे वापरत असणाऱ्या फॉर्चुनर ची किंमत 51 लाख रुपये असून सफारीची किंमत 28 लाख इतकी आहे.  दोन्ही कारमध्ये ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रांसमिशन मधून असून, 6 ते 7 लोक या कारमधून आरामात प्रवास करू शकतात. या कारमधून एयरबॅग्स, अँटी -लॉक ब्रेकिंग सिस्टिम सारख्या एडवांस्ड फिचर्सचा समावेश आहे.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment Cancel reply

Exit mobile version