Hyundai Verna 5 Star: काय सांगता? ह्युंदाई वेरना ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्ट मध्ये मिळाले ५ स्टार्स

  • वेरनाला adult आणि लहान मुलांच्या सफ्टी साठी 5 स्टार्स मिळाले आहेत.
  • बॉडीशेल इंटिग्रिटी अस्थिर म्हणून रेट केली गेली
  •  चाचणी केलेल्या मॉडेलमध्ये 6 एअरबॅग आणि ESC स्टँडर्ड होते.

नवीन ह्युंदाई वेरना ने ग्लोबल NCAP मध्ये ५ स्टार सेफ्टी रेटिंग मिळवल्या असून ह्युंदाई ची ही पहिली ५ स्टार सेफ्टी मिळवणारी गाडी भारतात विकली जाणार आहे. टेस्ट साठी वापरलेले मॉडेल हे भारतीय मार्केट मध्ये विकायला असून यामध्ये सेफ्टी साठी ६ एअर बॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, मागील ISOFIX माउंट आणि सीट बेल्ट रिमायंडर स्टँडर्ड दिले जाते.

HyundaiVerna Side

लक्ष्यात घेण्यासारखी गोष्ट आहे की ह्युंदाई वेरना चे ही शेवट च्या काही मोजक्या वाहनांपैकी एक आहे जी ग्लोबल NCAP च्या Safer Cars For India programme मध्ये टेस्ट साठी पाठवण्यात आली होती. आता १ ऑक्टोबर पासून पुढे भारतात विकली जाणारी सर्व वाहन ही भारत NCAP मध्ये टेस्ट केली जाणार आहेत.

Screenshot 20231004 000118 Drive

Hyundai Verna adult occupant crash test rating

वाचा – टाटा मोटर्स ऑटो सेल सप्टेंबर जाहीर, तब्ब्ल 82,023 वाहन विकली तरीही ५% ने घसरला

Hyundai verna ने adult ocupant प्रोटेक्शन साठी ३४ पॉइंट्स पैकी २८.१८ पॉइंट्स स्कोर केला आहे. जरी बॉडीशेलला अस्थिर (Unstable Bodyshell) रेट केले गेले आणि पुढील लोडिंगचा सामना करण्यास असमर्थ असली तरी व्हर्नाने ड्रायव्हर आणि प्रवाशाच्या डोक्याला आणि मानेला फ्रंटल इम्पॅक्ट चाचणीमध्ये चांगले संरक्षण दिले, परंतु ड्रायव्हरसाठी छातीचे संरक्षण किरकोळ होते. मात्र प्रवासी छाती भागाच्या संरक्षण करिता चांगले रेट मिळाले आहे.

Screenshot 20231004 000144 Drive

शिवाय, ड्रायव्हर आणि प्रवाश्यांच्या गुडघ्यां करिता किरकोळ संरक्षण दाखवले कारण डॅशबोर्डच्या मागे असलेल्या धोकादायक स्त्यांट्रक्चरल मुळे सेफ्टीला परिणाम होऊ शकतो.

HyundaiVerna Pole

गाडीच्या साइड इफेक्ट चाचणीमध्ये, वेर्नाने समोरच्या प्रवाशाचे डोके, माकड हाड आणि पोटाला चांगले संरक्षण दिले, परंतु छातीचे संरक्षण नॉर्मल होते. दरम्यान, साइड पोल इम्पॅक्ट चाचणीमध्ये, व्हर्नाला प्रवाशाच्या डोक्याला आणि माकड हाडाला चांगले संरक्षण, छातीला किरकोळ संरक्षण आणि पोटाला पुरेसे संरक्षण देते त्यामुळे ‘ओके’ असे रेट केले गेले आहे.

HyundaiVerna Frontal

Verna च्या इलेक्ट्रॉनिक stability कंट्रोल ची चाचणी देखील केली आहे. या चाचणी मध्ये ईएससी प्रदर्शन ग्लोबल एनसीएपी मनका नुसार स्वीकार करण्यायोग्य आहे. वेरना UN 127 आणि GTR9 पादचारी सुरक्षा नियमांचे देखील पालन करते.

Screenshot 20231004 000207 Drive

Hyundai Verna child occupant crash test rating

वेराना ने चाईल्ड सेफ्टी रेटिंग मध्ये 49 पैकी 42 गुण मिळवले. यामध्ये CRS (चाइल्ड रेस्ट्रेंट सिस्टम) फीचर साठी 12 पैकी 12 गुण आणि डायनॅमिक स्कोअरमधील 24 पैकी 24 गुणांचा आणि Vehicle assessment score मध्ये 13 पैकी 6 गुणांचा समावेश आहे.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment