100 किमीच्या रेंज देणाऱ्या अँपिअर इलेक्ट्रिक स्कूटरची 10 हजाराने किंमत ‘कमी’, नो लायसेन्स-नो रजिस्टेशन

Published:

महागड्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या जगात Ampere – अँपिअर इलेक्ट्रिक स्कूटरच्या मॉडेलवर कमालीचा डिस्काउंट देत आहेत, ज्याचे उद्दिष्ठ या e-scooter चा खप वाढववण्याचे आहे. या 9,000 पेक्षा अधिक मिळणाऱ्या कमालीच्या डिस्काउंटमुळे मध्यमवर्गीय लोकांच्या आनंद पसरला आहे, कारण long range best electric scooter तेसुद्धा कमी किंमतीमध्ये कोणाला नको ? तुम्हीसुद्धा best electric scooter घेण्याचा विचार करत असाल तर खालील Ampere e-scooters price reduction ची माहिती देणारा संपूर्ण लेख वाचा.

अँपिअर इलेक्ट्रिक स्कूटरवर 10 हजाराचा डिस्काउंट

Graves electric mobility या इलेक्ट्रिक स्कूटर बनविणाऱ्या कंपनीने स्वतःच्या Ampere च्या काही मॉडल्सच्या किंमतीमध्ये बदल केला आहे, ह्या बदलामुळे इलेक्ट्रिक स्कूटर वापकर्त्यामध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे कारण या Ampere स्कूटर आता स्वस्त झाल्या आहेत. Ampere च्या Magnus LT , Magnus EX आणि Rio-Li Plus या इलेक्ट्रीक स्कूटरवर जवळ-जवळ 10,000 रुपयांची घट झाली आहे. चला जाणून घेवूया विश्लेषित माहिती.

अँपिअर ई-स्कूटर मॉडेल्स अँपिअर ई-स्कूटर ऑफर किंमत
Magnus LT 84,900 रुपये
Magnus EX 94,900 रुपये
Rio-Li Plus 59,900 रुपये

वाचा: ओला स्कूटर झाल्या स्वस्त, ओलाने दिला डिस्काउंट, हे आहे या मागच कारण !

मॅग्नसचे EX आणि LT बॅटरी आणि परफॉर्मन्स

नवीन इंस्ट्रूमेंट पॅनल आणि मजबूत बॉडी डिझाइन असणारी मॅग्नसचे EX आणि LT हे दोन व्हेरिएंट, एकूण 8 रंगातून उपलब्ध आहेत, या दोन्ही स्कूटरमध्ये लाँग रेंजची गॅरेंटी, रिव्हर्स मोड सोबत जबरदस्त आणि पॉवरफुल मोटर हब हे एडवांस्ड फिचर्स देण्यात आले आहेत. ही इलेक्ट्रिक दुचाकी चालवताना प्रवास आरामदायी आणि सुरक्षित होण्यासाठी कंबाइंड ब्रेकिंग सिस्टिम, साइड स्टँड सेन्सर, काढघालीची बॅटरी, मोठी लेग रूम, टेलिस्कोपिक सस्पेशन आणि ड्युरेबल शॉक- ऑब्सर दिले गेले आहेत. Magnus EX मधील 60V लिथियम बॅटरी चार्ज होण्यासाठी 6 ते 7 तास लागतात. एका चार्जमधून ही दुचाकी 80-100 किमीचा पल्ला गाठू शकते. Magnus LT मधील 60V बॅटरी चार्ज होण्यासाठी 5-6 तास लागू शकतात. या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरवर रोडसाइड असिस्टन्स आणि बॅटरीवर 3 वर्षाची स्टँडर्ड वॉरेंटी तर 2 वर्षाची एक्सटेंडेड वॉरंटी मिळते.

वाचा: EV Charging Station: तुमच्या जवळच्या ‘Fastest EV चार्जिंग स्टेशन’ माहिती एका क्लीकवर

Rio-Li Plus नो लायसेन्स नो रजिस्टेशन

अँपियरच्या Rio-Li Plus या मॉडेलची बॅटरी 1.3 kWH लिथियम आयन बॅटरी दिली गेली आहे जी 5-6 तासाच्या चार्जमध्ये 70 किमी पेक्षा अधिक रेंज देते. सुरक्षितेसाठी या स्कूटरमध्ये USB चार्जर, इग्निशन स्विच, लिथियम आयन बॅटरी, मॅकॅनिकल ड्रम ब्रेक्स सारखे फिचर्स देण्यात आले आहेत. या स्कूटरमध्ये एकूण 4 रंग उपलब्ध आहेत. या मॉडेलला चालवण्यासाठी लायसन्स अथवा रेजिस्टेशनची गरज लागत नाही.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment Cancel reply

Exit mobile version