New Ather Electric Scooter: एथर एनर्जी लाँच करणार फॅमिली स्कूटर; बजाज चेतक, टीव्हीएस ई-स्कूटरची करणार छुट्टी!

बजाज चेतक, टीव्हीएस आयक्यूब ई-स्कूटरची सध्या भारतीय बाजारपेठेत वाढते वर्चस्व आणि ग्राहकांना आवडणारी पारंपरिक डिजाईन यामुळे एथर एनर्जी लवकरच आपली एक फॅमिली इलेकट्रीक स्कूटर ४५० लाईनअप मध्ये लाँच करणार आहे.

हायलाईट्स

  • नवीन एथर इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्चसाठी सज्ज आहे.
  • २०२४ च्या सुरुवातीला कंपनी स्कूटर लाँच करणार आहे.
  • नवीन फॅमिली स्कूटरची किंमत स्पर्धात्मक असेल.

भारतीय मार्केट मध्ये एथर एनर्जी हि इलेक्ट्रिक स्कूटर बनवणारी कंपनी सर्वात जुनी आणि विश्वासाहार्य आहे. उत्तम बिल्ड क्वालिटी, सुयोग्य रेंज आणि रिलायबल सर्व्हिस यामुळे कंपनीने आपले चांगले वर्चस्व निर्माण केले आहे. परंतु भारतीय मार्केट मध्ये सध्या चेतक, टीव्हीएस आयक्यूब यांसारख्या पारंपरिक दिसणाऱ्या फॅमिली स्कूटर ला जास्त प्राधान्य मिळत असल्याचे दिसते आहे.

सध्याचा फक्त तरुण वर्गच एथर एनर्जीची ४५० सिरीज च्या एक्स आणि एस लाईनअप मधील स्पोर्टी स्कूटर घेत आहे. ३५ वर्षांपेक्षा जास्त वय असणारे लोक स्पोर्टी स्कूटर घेण्यापेक्षा फॅमिली स्कूटर घेणं पसंत करतात म्हणजे घरातील स्त्री, वडीलधारी व्यक्ती आणि इतरही ती स्कूटर आरामशीर चालवू शकतात. याचाच अभ्यास करत एथर एनर्जी ने ४५० सिरीज मध्येच एक फॅमिली ओरिएंटेड स्कूटर लाँच करण्याचे ठरवले आहे.

New Ather Electric Scooter: तरुण मेहता यांनी केली पुष्टी

नवीन स्कूटर चाचणी दरम्यान स्पॉट झाली होती आणि त्याचे फोटो सुद्धा सोशल मीडिया वर वायरल झाले आहेत, स्पाय शॉट्स समोर आल्यानंतर अथर नवीन स्कूटरची चाचणी करत असल्याचे समोर आले परंतु त्या बातमीला दुजोरा मिळत न्हवता परंतु एथर एनर्जीचे सीईओ आणि सह-संस्थापक तरुण मेहता यांनी अथर एनर्जी च्या आगामी फॅमिली इलेकट्रीक स्कूटरच्या लाँच बद्दल पुष्टी केली आहे. कॅमफ्लाज परिधान करून चाचणी करताना दिसलेली स्कूटर, अथर २०२४ वर्षात लाँच करणार आहे. या व्यतिरिक्त सध्याचे 450X हे मॉडेल सुद्धा अपग्रेड करून सादर करण्यात येणार आहे. 

New Ather Family Electric Scooter spy shoots

नवीन आगामी अथर कुटुंबाभिमुख ई-स्कूटर चे काही छायाचित्र इंटरनेट वर प्रसिद्ध झाले त्यानुसार गाडीमध्ये पुढे टेलेस्कोपिक सस्पेन्शन, सपाट फ्लोर बोर्ड, पारंपरिक सीट डिजाईन आणि मोठे स्विंग आर्म तसेच १२-इंच अलॉय व्हील आणि फ्रंट डिस्क ब्रेक दिसून आले.

ather energy family electric scooter
आगामी अथर ४५० फॅमिली स्कूटर

पाठीमागून डिजाईन पाहिल्यास हॉरीझॉन्टल एलईडी टेल लॅम्प, साईड फुटरेस्ट आणि पुढे मोबाइल ठेवण्यासाठी छोटेसे पॉकेट दिसत आहे. पाठीमागील लॅम्प प्रमाणेच पुढे सुद्धा आडवी एलईडी हेडलॅम्प दिली आहे यामुळेच लोक टीव्हीएस आयक्युबची कॉपी म्हणून या कंपनीला हिणवत आहेत. डॅशबोड ४५०x प्रमाणेच टचस्क्रीन असलेला दिसत आहे पण लाँच वेळी डॅशबोर्ड डिस्प्ले चे २ पर्याय उपलब्ध केले जातील.

ather energy family electric scooter
आगामी अथर ४५० फॅमिली स्कूटर

या गुंढाळलेल्या आगामी स्कूटरला सेंटर स्टॅन्ड नसल्याचे दिसत आहे. गाडीमध्ये बीएलडीसी मोटर वापरलेली नसून अथर त्यांची 6.4kW PMSM मोटरच वापरणार असल्याचे दिसते आहे. डिजाईन वगळता गाडीच्या स्पेसिफिकेशन्स मध्ये कंपनी सर्व ४५० एस आणि ४५० एक्स चे फीचर्स कॅरी फॉरवर्ड करेल असे दिसते आहे.

आगामी अथर ४५० फॅमिली स्कूटर

अथर एनर्जी या आगामी कुटुंबभिमुख स्कूटरला परवडणाऱ्या किमतीत ठेवण्यासाठी कदाचित 2.9 kWh या बॅटरी पॅक सह लाँच करेल अशी अपेक्षा आहे त्यानंतर कंपनी अधिक रेंज साठी 3.7 kWh च्या बॅटरी पॅक चा पर्याय सुद्धा उपलब्ध करू शकते. किमती बाबत अजून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. एथर एनर्जीचे सीईओ तरुण मेहता यांनी स्वतः ट्विट करत कन्फर्म केले आहे कि हि गाडी येत्या २०२४ वर्ष्यात ग्राहकांसाठी विक्री करण्यात येईल.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment