‘स्कूटर आणि रिक्षा’ची अनोखी जोडणी, इलेक्ट्रिक सर्ज एस-32 स्कूटरची बनते रिक्षा

Published:

हिरो मोटोकॉर्प लवकर थ्री व्हिलर इलेक्ट्रिक स्कुटर घेऊन येत आहे, ह्या इलेक्ट्रिक स्कुटर ची चर्चा आता मार्केटमध्ये होत आहे कारण, हि  ई-स्कुटर तीनचाकी आणि स्कुटरची अनोखी जोडणी आहे.  या स्कुटरच नाव ‘सर्ज एस-32 इलेक्ट्रिक स्कुट’ आहे. हिरो मोटोकॉर्प ने जयपुर येथे घडलेल्या हिरो वर्ल्ड 2024 Hero Hatch मध्ये Hero Surge मल्टीपर्पस थ्री-व्हीलरचे कॉन्सेप्ट मॉडेल जाहीर केले, जरी ह्या मॉडेलच्या नावात ‘इलेक्ट्रिक स्कूटर’ असले, तरी हि स्कुटर थ्री-व्हीलर चे कामसुद्धा करते.

सर्ज एस-32 इलेक्ट्रिक स्कुटर काय आहे?

हिरोची नवीन सर्ज एस-32 नावाची इलेक्ट्रिक स्कुटर लोकांमध्ये आकर्षणाचा विषय ठरत आहे त्याच कारण स्कुटरची हटके रचना ज्यामध्ये मजबुती आणि डिझाईन आहे. या बद्दलची अधिक माहिती तुम्हाला सर्ज ऑटोच्या मूळ वेबसाइटवर मिळेल ज्यात या इलेक्ट्रीक थ्री-व्हीलर बाबत लिहिलं आहे; हिरो इनोव्हेशन सेल अंतर्गत बनलेले प्रोग्राम सर्ज एस 32 थ्री-व्हीलर आणि स्कूटर चा मध्यांतर जादूगार आहे, हि इलेक्ट्रीक थ्री-व्हीलर तुमच्या स्कुटरकडून असणाऱ्या सर्व गरज पूर्ण करते. इतरवाहनाच्या सेगमेंटमध्ये वाहनांकडून असणाऱ्या बहुमुखी गरजा संपूर्ण करणारी डिझाईन या सर्ज एस 32 थ्री-व्हीलरला मिळत आहे.

फायदेशीर सर्ज एस-32 इलेक्ट्रिक स्कुटर

स्वतःची जीवनशैली बदलताना हिरोच्या नवीन इलेक्ट्रिक स्कुटर महत्वाची भूमिका पार पडू शकते, कारण या इलेक्ट्रिक स्कुटर ची डिझाईन आणि लुक, हा टू-व्हिलर आणि थ्री व्हिलर यांचं एकत्रित समीकरण असल्याने हि स्कुटर खरेदी करणारा अथवा वापरकर्ता त्याच्या रोजगारासाठी एका किंमतीत दोन वाहने मिळवून कमाई वाढवू शकतो.  

वाचा: एमजी झेडएस ईव्ही चक्क 3.9 लाख रुपयांनी कमी, MG motors कारकिंमतीत ‘मोठी घसरण’

Hero Surge रिक्षा ते स्कूटर

या वाहनचा बदल इलेक्ट्रिक रिक्षा ते इलेक्ट्रिक स्कूटर घडू शकतो; या इलेक्ट्रिक सर्ज एस-32 ला वापरकर्ता रिक्षा म्हणून वापरताना 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्तींना घेऊन राईड करू शकतो तर त्याच वेळी वापरकर्ता याची इलेक्ट्रिक स्कूटर करून एकट्यासाठी वापरू शकतो. या दोन्ही प्रकारात राईड करणाऱ्या प्रवाश्याना आरामदायी अनुभव मिळतो.

जर तुम्ही हि इलेक्ट्रिक सर्ज एस-32 रिक्षावरून स्कुटर करण्याच्या विचारात असला तर या वाहनाचा सेटअप बदलण्यासाठी केवळ 3 मिनिटे लागतात, ज्यासाठी कोणत्याही जागेची अथवा ॲक्सेसरीज ची गरज पडत नाही.

वाचा: मारुती फ्रॉंक्सवर 83 हजार रुपयापर्यंत डिस्काउंट, फ्री ॲक्सेसरीज आणि एक्सचेंज बोनससुद्धा जाणून घ्या सर्व माहिती

सर्ज एस-32 इलेक्ट्रिक रचना

या इलेक्ट्रिक स्कुटरच्या रचनेत समोर एक प्रवासी केबिन मिळते जिथे हेडलाइट्स, टर्न इंडिकेटर, विंडस्क्रीन वाइपर ,विंडस्क्रीन मिळतात. इतर स्कुटरच्या तुलनेत या स्कुटरमध्ये स्पीडो आणि स्विचगियर अधिक फीचरमार्फत मिळतात.

इलेक्ट्रिक स्कुटर सर्ज एस-32

तपशील 2W स्कूटर 3W वाहन
पॉवर 3 kW (4 bhp) 10 kW (13.4 bhp)
बॅटरी 3.5 kWh 11 kWh
टॉप स्पीड 60 किमी/ताशी 50 किमी/ताशी

या गाडीच्या बॅटरी पॅकची 1 लाख किलोमीटरपर्यंत टेस्ट करण्यात आली होती, या इलेक्ट्रिक वाहनाचे थ्री व्हिलर रिक्षामध्ये रूपांतर केल्यावर जवळ-जवळ 500 किलोपर्यंत भार उचलण्याची क्षमता या वाहनात आहे

Two in one electric ⚡ auto

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment Cancel reply

Exit mobile version