बाऊन्स इन्फिनिटीने लाँच केली स्वॅपिंग बॅटरीची स्कूटर, किंमत फक्त 55,000 रुपये

Bounce Infinity electric scooter

बाऊन्स इन्फिनिटी या इलेक्ट्रिक स्कूटर बनवणाऱ्या कंपनीने आत्तापर्यंतची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे, जी केवळ 60 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीमध्ये मिळते, स्कूटरची सर्वात चांगली गोष्ठ ही आहे की ह्या स्कूटरमध्ये दिलेले बॅटरी ही स्वापेबल म्हणजेच बाहेर प्रवास करताना स्कूटरची संपलेली बॅटरी कोणत्याही इलेक्ट्रिक चार्जिंग नेटवर्क स्टेशनवर अगदी सोप्या पद्धतीने बदलवून घेवू शकतात. बॅटरी स्वॅपिंग याचा फायदा हा आहे की, जोपर्यंत तुम्ही एखाद्या स्कूटरमध्ये पेट्रोल भरायला वेळ लागतो, त्यापेक्षाही कमी वेळेत ह्या स्कूटरची बॅटरी बदलता येते. चला जाणून घेवूया या इलेक्ट्रिक Infinity E1X ची संपूर्ण माहिती.

बाउन्स इन्फिनिटी E1X आणि E1+X इलेक्ट्रिक स्कूटर

बाउन्स इन्फिनिटीने एखाद्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कामगाराला, कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला अगदी प्रवासासाठी बाहेर पडणाऱ्या व्यक्तीच्या गरजा लक्षात घेवून E1X आणि E1+X या स्कूटरला बनवलं आहे. ह्या स्कूटरची किंमत 55,000 ते 59,000 हजाराच्या दरम्यानची असून ऐन वेळी स्कूटरची बॅटरी अचानकपणे संपली की, ही बॅटरी तुमच्या शाळा-कॉलेज किंवा ऑफिसजवळच्या कोणत्याही चार्जिंग स्टेशनमध्ये जाऊन बॅटरी स्वॅप करुन पुढील प्रवासाचा मार्ग मोकळा करता येतो.

दोन्ही स्कूटरमधील बॅटरीचे वजन 14.2 किलो इतके आहे. E1X या इलेक्ट्रिक स्कूटरची 1.1 kW मोटर असून हिचा टॉप-स्पीड 55 किमी प्रतितास आणि E1+X चा टॉप-स्पीड 65 किमी प्रतितास सोबत इथे 1.5 kW ची मोटर मिळते. E1X इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जमध्ये 90 किमीचा पल्ला गाठते तर E1+X एकदा चार्ज केली की 80 किमी प्रवास सहज पूर्ण करते. स्कूटरचे वजन 100 किलोपेक्षा कमी आहे. बॅटरी पैक सोबत अंडरसिट स्टोरेज 12 लिटरची मिळते.

E1 च्या दोन्ही स्कूटरमध्ये तीन रायडिंग मोड्स मिळतात; इको,पॉवर आणि टर्बो. इलेक्ट्रिक स्पेसिफिकेशनमध्ये ट्विन शॉक-ऑब्सर, टेलिस्कोपिक फोर्क आणि आलोय व्हिल्स सारखे इतर फिचर्स आहेत, सोबत हिल स्टार्ट असिस्ट, रिव्हर्स मोड, मोबाईल ब्लूटूथ कनेक्टिविटी, USB चार्जिंग पोर्ट, क्रुझ कंट्रोल, LED लाइटिंग, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर सारखे फिचरसुद्धा या स्कूटरमध्ये समाविष्ठ केलेले आहेत.

बाउन्स इन्फिनिटी E1 रेंज

बाउन्स इन्फिनिटी E1 ची श्रेणी भारतामध्ये खूप लोकप्रिय असून E1X ची बॅटरी वगळून किंमत रु 55,000 इतकी आहे. E1+X ची बॅटरी वगळून किंमत 59,000 रुपये, E1 ची किंमत 1,12,125 रुपये, E1 LE ची किंमत 1,25,615 रुपये आणि E1+ ची किंमत 1,09,605 रुपये इतकी आहे.

बाउन्स इन्फिनिटीच्या स्कूटरची बुकिंग प्रक्रिया

संपूर्ण भारतामध्ये 50 पेक्षा अधिक डिलर असणारी बाऊन्स इन्फिनिटी इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी सध्या त्यांच्या 92 किमीची रेंज देणाऱ्या स्कूटरवर काम करत आहेत. वेळेची बचत होण्यासाठी बाऊन्स इन्फिनिटी इंडियाने E1X स्कूटर लाँच केली असून तुम्हाला जर ह्या इलेक्ट्रिक स्कूटरचे बुकिंग करायचे असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या  बाऊन्स इन्फिनिटी शोरूममध्ये भेट देऊन 499/- रुपये भरून ह्या स्कूटरचे रिझर्वेशन करू शकता.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment