एथर रिझताचे बुकिंग सुरु, 999 रुपये भरुन करा ह्या सोप्या पद्दतीने बुकिंग

Aishwarya Potdar

Updated on:

एथर एनर्जीची सर्वात मोठी सीट असणारी इलेक्ट्रिक स्कूटर ‘रिझता’ लवकरचं लाँच होत आहे, लाँचिंग आधी एथर एनर्जीने या फॅमिली स्कूटरच्या फिचर्स आणि स्पेसिफिकेशन बद्दल माहिती देणारी व्हिडीओ सादर केले आहेत, ज्यातून ही इलेक्ट्रिक फॅमिली स्कूटर मजबूत, लोंग रेंज देणारी आणि अद्यावत फिचर्सने भरपूर असणारी दिसते. आता नुकतेचं इलेक्ट्रिक स्कूटर रिझता साठी बुकिंग प्रक्रिया सुरू झाली आहे. तुम्हाला सुद्धा या फॅमिली स्कूटरची टेस्ट राइड घेवून बुकिंग करायचं असेल, तर खाली या इलेक्ट्रिक स्कूटरची सर्व माहिती दिली आहे.

एथर इलेक्ट्रिक स्कूटर रिझता

एथर एनर्जीच्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये नव्याने लाँच होणाऱ्या रिझताची चर्चा चालू आहे. आत्तापर्यंतच्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये या स्कूटरची बसण्याची व्यवस्था अधिक सुलभ आणि आरामदायी करण्यासाठी सर्वात मोठे सिट देण्यात आले आहेत. अनेक लोकप्रिय बॉलिवूड कलाकारांनी या स्कूटरला खरेदी करण्यास उत्सुकता दाखवून रिझताचे मालकसुद्धा झाले आहेत. स्कूटरच्या लूकबाबतीत माहिती देता, मोठाले फ्रंट टायर, फ्रंट फोर्क आणि सुसज्ज मिरर व्यूने सुसज्ज असणार आहे. DRLS ,LED हेडलाईटस, LED टेललाइट, LED टर्नसिंगल, USB चार्जिंग पोर्ट, इलेक्ट्रिक स्टार्ट-स्टॉप बटण यासारखे महत्त्वाचे फिचर्स आहेत.

रोडवर स्कूटर घसरण्याचे चान्सेस कमी होण्यासाठी, या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अँटी स्किड फिचर म्हणजेच सिंगल चॅनेल ABS सारखे फिचर देण्यात येत आहे. या स्कूटरच्या अधिक फिचरसंबंधित माहिती डेटा, स्कूटरमध्ये इंस्ट्रूमेंट क्लस्टर म्हणून मोठा टचस्क्रीन देण्यात आला आहे. ज्यावर ड्रायव्हर सोप्या पध्दतीने गूगल मॅप्स हाताळू शकतो. एथरच्या लाइनअप मध्ये असणाऱ्या 450 सारखीच बॅटरी आणि मोटर या रिझता स्कूटरला मिळणार आहे.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 

केवळ 999 रुपये भरून रिझताचे बुकिंग करा

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, या स्कूटरचे बुकिंग सुरु होणार असून ही बुकिंग प्रक्रिया खूपच सोप्पी ठेवण्यात आली आहे. केवळ 999 रुपये भरून ह्या स्कूटरचे तुम्ही बुकिंग करू शकता. तुम्ही जर ह्या स्कूटरची टेस्ट राइड घेण्यास इच्छुक असाल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या एथर शोरूम ला भेट देऊन टेस्ट राइड अथवा थेट बुकिंग टोकन अमाऊंट भरू शकता.

Ather Rizta नवीन वैशिष्ट्ये

एथरने नव्या रिझता बाबतीत असणाऱ्या वैशिष्ठ्याचे खुलासे त्यांच्या सोशल मीडियावर व्हिडिओ मार्फत सादर केले आहेत, पहिल्या व्हिडिओमध्ये एथर बॅटरीला तब्बल 40 फुटावरून फेकण्यात येऊन बॅटरीच्या मजबूतची टेस्ट करण्यात अळी होती, इतक्या उंचीवरून फेकून सुद्धा ही बॅटरी मात्र ‘जैसे की जैसे’ होती आणि यानंतरच या बॅटरीला मजबूत सॉलिड बॅटरी म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये एथर रित्झला पाण्याच्या मोठ्या टँकमध्ये चालवून टेस्ट केली, ज्यामध्ये सुद्धा ही इलेक्ट्रिक स्कूटर अजिबात न घसरता दुसऱ्या टोकापर्यंत आरामात धावली. ज्यामुळे या स्कूटरला अँटी-स्किड फिचर ने सुसज्ज असणारी स्कूटर म्हणून ओळखण्यात आले.

हे दोन्ही वैशिष्ट्ये दुचाकी चालवताना खूप महत्त्वाचे असतात, हेच लक्षात घेवून एथरने रिझतासारखी चांगली स्कूटर मार्केटमध्ये लाँच करण्याचा निर्णय घेतला. तुम्हाला जर चांगला लुक असणारी, लोंग रेंज देणारी आणि परवडणारी इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायची असेल तर रिझता या पर्याय तुमच्यासाठी उत्तमच ठरू शकतो.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment Cancel reply

Exit mobile version