60 हजारपेक्षा कमी किंमतीमध्ये 90 किमीची रेंज देणारी iVOOMi स्कूटर

Published:

iVOOMi S1 Lite launched in Rs 54,999, range up to 90 km

iVOOMi या मेड इन इंडिया इलेक्ट्रिक वाहन कंपनीने 90 किमी इतकी लांब राइडिंग रेंज देणारी S1 Lite स्कूटर लाँच केली आहे, या स्कूटरची खासियत म्हणजे हिची अतिशय किफायतीशीर अशी किंमत आणि इतक्या कमी किंमतीमध्ये मिळणारे स्कूटरचे अगणित फायदे. तुम्ही मजबूत आणि टिकाऊ मटेरियल असणारी इलेक्ट्रिक स्कूटर शोधत असाल आणि तुमचं बजेट जर 60 हजारपेक्षा कमी असेल तर ही स्कूटर तुमच्यासाठी फायदेशीर आहे की नाही याची संपूर्ण माहिती सदर लेखात दिली आहे.

iVOOMi स्कूटर विकत घेण्याची कारणे

  • स्वस्त किंमत
  • प्रीमियम बांधणी
  • कस्टमाइझ सस्पेंशन
  • आरामदायी सीट्स
  • काढघालीची बॅटरी
  • मोठा बूट-स्पेस
  • भारतातील सर्वात हलका चार्जर

 iVOOMi- S1 Lite

S1 Lite च्या स्वस्त किंमतीसोबत या इलेक्ट्रिक स्कूटरची खासियत स्कूटरसोबत मिळणारा सर्वात हलका चार्जर, आणि काढण्यायोग्य बॅटरी हे आहेत. ही इलेक्ट्रिक स्कूटर चे दोन बॅटरी प्रकार बाजारात उपलब्ध आहेत, Graphene बॅटरी आणि Li-ion बॅटरी. या दोन्ही प्रकारामध्ये 1.8 kW पीक पॉवर आणि 10.1 Nm इतका टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. ग्राफीन बॅटरी असणारी स्कुटर 101 किलो वजनाची आहे त्याच तुलनेत लिथियम आयन बॅटरी 82 किलो वजन आहे. दोन्ही स्कूटर वजनाने हलक्या आहेत. ग्राफीन बॅटरी प्रकारावर 18 महिन्यांपर्यंतची वॉरंटी आणि लिथियम आयन बॅटरीवर 3 वर्षाची वॉरंटी मिळते. इको, रायडर आणि स्पोर्ट मोडवर ही स्कूटर चालवू शकतो.

iVoomi S1 Lite फिचर्स आणि स्पेसिफिकेशन

ही स्कूटर पर्ल व्हाइट, मून ग्रे, स्कार्लेट रेड, मिडनाईट ब्लू, ट्रू रेड आणि पीकॉक ब्लू या सहा आकर्षक रंगामधून उपलब्ध आहेत. स्कूटर टिकाऊ बनण्यासाठी स्कूटरमध्ये ERW 1 ग्रेड चेसिस वापरण्यात आले आहे. या स्कूटरचा चार्जरसुद्धा वॉटर-रेसिस्टन्स म्हणजे पाणी-प्रतिरोधक आणि हलका दिला आहे. तुम्ही जिथे स्कूटर पार्क करता त्या पार्किंगच्या परिसरात जर चार्जिंग पॉइंट उपलब्ध नसतील तर तुम्ही ह्या स्कूटरची बॅटरी काढून घरी जाऊन चार्जरने चार्ज करू शकता. ग्राफिन बॅटरी असणारी स्कूटर 6 तासात संपूर्ण चार्ज होते तर लिथियम आयन बॅटरी असणारी स्कूटर फक्त 3 तासात संपूर्ण चार्ज होते. कस्टमाइझ सस्पेंशन सोबत स्कूटरमध्ये पुढचा डिस्क आणि मागचा ड्रम ब्रेक सोबत फिचर्समध्ये18-लिटरची अंडरसीट स्टोरेज मिळते, LED इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि मोबाईल चार्जिंगसाठी USB पोर्ट सारखे इतर फिचरसुद्धा मिळतात.

iVoomi S1 Lite किंमत

या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत बॅटरी प्रकार अवलंबून आहे. ग्राफीन आयन बॅटरी प्रकार असणारी स्कूटरची किंमत 54,999 रुपये आहे तर लिथियम-आयन बॅटरी प्रकार असणारी स्कूटरची किंमत 64,999 रुपये आहे. तुम्ही जर ही स्कूटर EMI पर्यायातून विकत घेणार असाल तर 1,499 रुपयांपासून ईएमआय पर्याय उपलब्ध आहेत.

 iVOOMi इलेक्ट्रिक स्कूटर सारांश

 iVOOMi या इलेक्ट्रिक स्कूटर बनवणाऱ्या कंपनीचे Jeet X हे वाहन स्कूटरसुद्धा बाजारात 81,999 रुपयांच्या किंमतीमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही जर EMI पर्यायाने ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणार असाल तर 3253/- च्या EMI किंमतीने स्कूटर खरेदी करू शकता. Jeet X स्कूटर तुम्हाला एका चार्जमध्ये 100 किमी इतकी रेंज मिळवून देते. स्कूटरचा टॉप-स्पीड 65 किलोमीटर प्रति तास असून ह्या स्कूटरची बॅटरी चार्ज होण्यासाठी 2 तास पुरेसे आहेत. या स्कूटरच्या बॅटरीवर 3 वर्षांची वॉरंटी सोबत iVOOMi- S1 Lite सारखेच गुणधर्म मिळतात.

Photo of author

Ajinkya Sid

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment Cancel reply

Exit mobile version