EV युजर्स साठी खुशखबर, भारतात ‘किया कंपनीचे 1000 चार्जर्स’ तयार, पहिले 3 महिने गाडी करा ‘फुकट चार्ज’..

Kia India K-Charge: इलेक्ट्रिक कार वापरकर्त्याना सगळ्यात मोठी चिंता असते, ती म्हणजे इलेक्ट्रिक कारच्या चार्जिंग पॉइंट्सची, EV जर प्रवासाला निघाली की, चालक थोड्या अंतरावर जवळच चार्जिंग पॉइंट शोधण्यात आणि ते चार्जिंग स्टेशन आपल्या गाडीचाच आहे की नाही, हे शोधण्यात व्यस्त होऊन जातो. यामुळेच इलेक्ट्रिक गाडीच्या रेंजची चिंता किंवा बॅटरी पॉवर संपुष्टात येण्याने बरेच लोक EV घेण्यास कचरतात. पण आता ह्या ग्रामीण आणि निमशहरी भागात पुरेशा इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनचा अभाव बघून या प्रश्नावर किआ इंडिया ने नवीन K-Charge 1000 चार्जर्स भारतीयांसाठी उघडून त्यांचा प्रवास अजूनच सोयीचा आणि सोप्पा केला आहे.

Kia India ची EV युजर्स साठी के-चार्ज चार्जिंग इनिशिएटिव्ह ऍक्सेसिबिलिटी

के-चार्ज चार्जिंग इनिशिएटिव्ह ऍक्सेसिबिलिटी बद्दल माहिती देताना Kia India ने आपल्या देशातील EV6 इलेक्ट्रिक वाहन युजर्स साठी एक उपक्रम भेटीस आणलाआहे,ज्या मार्फत भारतमधल्या Kia ग्राहकांना पाहिल्या 3 महिन्यांसाठी K-charge अगदी मोफत मिळणार आहे सोबत Kia ने हा उपक्रम केवळ कियायुजर्ससाठी राबवला नसून Kiaचे नसलेले ग्राहक देखील या इलेक्ट्रिक चार्जरचा लाभ घेऊ शकतात.

K-Charge ‘MyKia’ अॅपद्वारे मिळणार ऍक्सेस

Kia India चे K-Charge या चार्जिंग पॉइंट हे ‘MyKia’ जे NumoCity Technologies च्या मदतीने access होऊ शकणार आहे. ह्या अँप मध्ये Kia नसलेल्या वापरकर्त्यांना किया Kia EV6 वापरकर्त्यांना लांबच्या पल्ल्याच्या प्रवासादरम्यान चार्जिंग ची सोय करत पहिले तीन महिने मोफत चार्जिंगसाठी विशेष टाय अप प्रदान करण्यात येत आहे .

संपूर्ण भारतीय जे किया इलेक्ट्रिक अथवा इतर इलेक्ट्रिक वाहनाचे वापरकर्ते आहेत, त्यांना के-चार्ज सेवा पुरवण्यासाठी , Kia India ने EV गाड्यांचा प्रसार आणि विस्तार होण्यासाठी CPOs (चार्ज पॉइंट ऑपरेटर) उभारले आहेत. सोबत हे इलेक्ट्रिक चार्जर पुरवण्यासाठी रिलक्स इलेक्ट्रिक, लायन चार्ज , स्टॅटिक, चार्ज झोन आणि ई-फिल चार्जर्स यांच्यासोबत कियाइंडियाने भागीदारी केली आहे.

MyKia’ अॅपद्वारे मिळणाऱ्या सुविधा

EV युजर्सची चार्जिंग बाबतची चिंता लक्षात घेऊन किया ने १००० चार्जर चा बंदोबस्त करत नवीन MyKia आणले आहे , ज्या मदतीने EV वापरकर्त्यां मेड-इन-इंडिया नकाशा ज्यामध्ये चार्जिंग स्टेशन शोधण्यात मदत होते. या ऍप च्या मदतीने EV युजर्स भारतातील नकाशा , चार्जिंग स्लॉट तपासून घेऊ शकतो आणि अॅपमधील असणाऱ्या वॉलेट ह्या पर्यायाच्या सेवेद्वारे देखील पेमेंट करू शकतो.

किया इंडिया के-चार्ज: सुविधा

कियाच्या संपूर्ण गाड्यांच्या सेगमेंतमधली Kia EV6 ही एकमेव इलेक्ट्रिक गाडी आहे असली तरी, 2024 Kia ​​EV5 इलेक्ट्रिक SUV डेब्यू – 600 किमी पर्यंत रेंज देणारी कियाची नवी गाडी आपल्या भेटीस येत आहे. Kia EV6 फेसलिफ्ट च्या होणाऱ्या चाचण्यांचा विचार घेऊन अशी सुद्धा अपेक्षा केली जातेय की , कियाची EV6 चे फेसलिफ्ट देखील 2024 च्या सुरुवातीला पदार्पण करू शकत.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment