‘कोमाकीची 500 किलो वजन वाहणारी ई-स्कूटर’, जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि बरच काही

Komaki Electric Scooters : कोमाकी इलेक्ट्रिक वाहन उत्पादक ने नवीन येणारे मॉडेल ‘कोमाकी एक्सजीटी कॅट 3.0’ चे सादरीकरण केले आहे, ह्या स्कुटरमध्ये काही आधुनिक फिचर्स आणि अपग्रेड पॉवर यांचा समावेश करण्यात आला आहे. या तीनचाकी कोमाकी इलेक्ट्रिक स्कूटरची खासियत याची लोडींग क्षमता आणि स्मार्ट फायर रेझिस्टन्स बॅटरी असणार आहे; जी विविध मोड द्वारे 75-180 किमी इतकी कमालीची रेंज देणार आहे.

कोमाकी एक्सजीटी कॅट 3.0 फीचर्स

भारतीय बाजारपेठेत, इलेक्ट्रिक स्कूटरचा वाढत प्रसार बघून ह्या इलेक्ट्रिक स्कूटर ची कॉम्पॅक्ट रचना मालवाहू, तरीही आरामदायी आणि प्रशस्त अशी करण्यात आली आहे. या स्कूटरमध्ये समावेश केलेल्या वैशिष्ठयांमुळे, हि तीनचाकी स्कूटर दिव्यांग रायडर्ससाठी फायदेशीर ठरू शकते.

Komaki XGT CAT 3.0 नव्याने लॉन्च झाली असताना, तीनचाकी व्यावसायिक स्कूटर व्यावसायिक आणि वैयक्तिक वापरासाठी नवनवीन फिचर सोबत वापरकर्त्यांच्या गरजा या वाहनात देण्यात आल्या आहेत. BLDC HUB MOTOR, एक्सट्रा कॅरिअर , पार्किंग असिस्ट आणि वाहन दुरुस्ती, रिव्हर्स असिस्ट, मल्टिपल सेन्सर्स, सेल्फ डायग्नोसिस, वायरलेस अपडेटेड फीचर्स, VIVID स्मार्ट डॅश , बॅक रेस्ट , बॅक LED LIGHT, ट्रिपल डीस-ब्रेक सिस्टम,12 इंचाची 3 व्हील्स, किलेस एंट्री अँड कंट्रोल, मोबाईल चार्जिंग पॉइंट, अँटी थेफ्ट लॉक, रिमोटद्वारे लॉक, टेलिस्कोपिक शॉकर आणि रिपेअर स्विच यांचा समावेश आहे.

कोमाकी एक्सजीटी कॅट 3.0 बॅटरी आणि मोड

एक्सजीटी कॅट 3.0 मध्ये तीन मोडस दिले आहेत; इको, स्पोर्ट आणि टर्बो मोड. या गाडीमध्ये पोर्टेबल चार्जर मिळतो, ह्याची बॅटरी चार्ज होण्यासाठी 4 ते 5 तासांचा अवधी लागतो. एका चार्जमध्ये हि बॅटरी, एका वेळी 120 ते 180 किलोमीटर इतकं अंतर पार करू शकते. सर्वात महत्वाची गोष्ट हि आहे कि, स्कूटरची बॅटरी फायर रेसिस्टन्स फ्री आहे थोडक्यात या प्रकारच्या बॅटरीला सहजासहजी आग लागत नाही.

कोमाकी इलेक्ट्रिक स्कूटर आधुनिक फीचर्स

कोमाकी एक्सजीटी कॅट 3.0 स्कूटर Komaki’S İQ System ने सुसज्ज असणार आहे, (intelligent dash). ही सिस्टीम वाहनासोबत एकत्रित येऊन, वायब्रंट स्मार्ट डॅश स्क्रीनद्वारे रिअल-टाइम राइडिंगबद्दल संपूर्ण माहिती देते. ह्या सिस्टीम चा अजून एक फायदा होतो, जो कि स्कूटरमध्ये 500 किलो वजन असताना सुद्धा आतील प्रवाश्यांना स्थिरतेची आणि सुरक्षितेची जाणीव होते.

कोमाकी एक्सजीटी कॅट 3.0 मधले 5 आकर्षक फीचर्स

  1. कमालीची लोडींग क्षमता
  2. आतील वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी लॉकिंग सिस्टम
  3. इलेक्ट्रिक स्कूटर रिमोटने लॉक करू शकता.
  4. आरामदायी आणि सुरळीत प्रवासासाठी यात शॉक ऑब्झर आहे.
  5. इ-स्कूटर पार्किंग सेन्सर ने सुसज्ज

कोमाकी एक्सजीटी कॅट 3.0 किंमत

आधुनिक फीचर्स ने सुसज्ज असणारी कोमाकी इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स शोरूम किंमत 1,06,000/- पासून सुरु होते. हि किंमत तुमच्या एरिया वर अवलंबून आहे. ह्या स्कुटरची किंमतची चौकशी आणि या तीन चाकी वाहनाचे रंग पर्याय जाणूनघ्यायचे असतील, तर तुम्ही तुमच्या जवळच्या डिलरकडे भेट देऊ शकता. सोबतच तुम्ही जर मालवाहू वाहतूक करत असाल अथवा तुम्हाला रोज जास्त भाराचे दळणवळण करायचे असेल, तर कोमाकी XGT कॅट 3.0 तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment