‘शेतीचा भार ते कंपनीचं ओझ’ सगळं वाहून नेईल ही Motorvolt M7 इलेक्ट्रिक स्कूटर, 999 रुपये भरून करा बुकिंग

Published:

2023-24 च्या दरम्यान अनेक इलेक्ट्रिक वाहन कंपन्यानी नव्याने वाहन क्षेत्रात उडी घेतलेली आहे त्यापैकीच Motovolt M7 – All New E-Scooter Made In India for India असून या भारतीय इलेक्ट्रिक टू व्हीलर कंपनीने, त्यांची पहिले स्कूटर वाहन Motorvolt M7 स्कूटरचे लॉन्चिंग केलेले आहे. ह्या स्कूटरचा वैयक्तिक आणि व्यावसायिक वापरावर भर देण्यात येणार आहे. या मेड-इन-इंडिया स्कूटरची खासियत तिची कमालीची रेंज आणि स्वॅप करता येणारी बॅटरी आहे. तुम्ही या इलेक्ट्रिक स्कूटरचे केवळ 999 रुपये इतकी टोकन अमाऊंट देऊन बुकिंग करू शकता.

एका भारतीयांच्या संपूर्ण दिनचर्येत होणाऱ्या टू व्हीलर स्कूटर चा वापर लक्षात घेऊन या इलेक्ट्रिक स्कूटर ला भक्कम जोडणी आणि कमालीचे फीचर्स देण्यात आलेले आहेत. राईड सुखकर व्हावी तसेच पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, अशी जोडणी देत यामध्ये प्लास्टिकचा वापर अगदी कमी केलेला आहे, स्कूटरचे डिझाईन अगदी मॉड्युलर आहे, मोटोव्होल्ट ॲपद्वारे सुद्धा तुम्ही या स्कूटरला हाताळू शकता. या स्कूटरला रायडर्स रियल टाईम लोकेशन ट्रेकिंग, हिस्टरी ऑफ राईट डेटा, ओव्हर-द- इयर सॉफ्टवेअर अपडेट्स यांसारखे फीचर्स दिलेले आहेत सोबत या स्कूटरमध्ये सर्विस रिमाइंडर किंवा मॉनिटर व्हेईकल हेल्थच्या मेंटेनन्स याबाबतीत सुद्धा अचूक माहिती मिळते.

या इलेक्ट्रिक स्कूटर ला लांबचा पल्ला गाठणारी लॉंग रेंजची दणकट बॅटरी ऑप्शन मिळतो. ही बॅटरी तुम्ही तुमच्या मोबाईल ॲपद्वारे सुद्धा ट्रॅक करू शकता सोबत आपल्यासाठी भारतीयांसाठी नव्याने तयार झालेला प्लॅटफॉर्म स्वाभी हा या स्कूटरमार्फत मिळत आहे स्वामी या प्लॅटफॉर्म मार्फत आपल्याला बॅटरी चार्जिंग स्टेशनची माहिती रेंटल बॅटरी ची माहिती सोबत रेंटल व्हेईकल ची सुद्धा माहिती मिळणार

स्कुटरला 3kWh बॅटरी दिली गेली आहे जी ॲडव्हान्स LFP सेल केमिस्ट्रीची आहे, ह्याच वैशिष्ट्य असं आहे की, या बॅटरीला तुम्ही 1000 सायकल पेक्षाही अधिक वेळा चार्ज करू शकता, ही बॅटरी फायर रेजिस्टन्स सोबत वॉटर रेजिस्टन्स आहे. परफॉर्मन्सच्या बाबतीत या स्कूटरबद्दल माहिती द्यायची म्हटली तर, या स्कूटरची रेंज 166 km ची आहे, 60Kmph इतका टॉप स्पीड आणि यामध्ये चार राइडिंग मोड्स मिळतात; इको ,पॉवर, स्पोर्ट आणि रिव्हर्स.

या इलेक्ट्रिक स्कूटरच्या अत्याधुनिक फिचर्समध्ये मोटोवोल्ट कनेक्टेड ॲप, फ्रंट एलईडी इंडिकेटर्स, रियर एलईडी इंडिकेटर्स, बॅक स्टोरीज स्पेस, टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेन्शन, मल्टी फंक्शनल डिस्प्ले, कंट्रोल पॅनल आणि डीअटॅचबल बॅटरी यांचा समावेश आहे.

Swoobby म्हणजे काय?

या इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीला चार्ज करण्यासाठी Swobbee बॅटरी स्वॅपिंग नावाचा एक प्लॅटफॉर्म तयार करण्यात आलेला आहे, आता स्वॉबी  हा एक युरोपियन तंत्रज्ञानाचा प्लॅटफॉर्म आहे, ज्यामध्ये बॅटरी बदलली जाते, स्वाबी तंत्रज्ञानामार्फत बॅटरी स्वॅपिंग स्टेशन बॅटरी रेंटल अथवा बिलकुल रेंटल याची संपूर्ण आणि अचूक माहिती मिळू शकते.

लाइटनिंग ग्रे, गॅलेक्सी रेड, निळा, व्हाइट, कॅनरी येल्लो आणि प्यूमा ब्लॅक यांसारख्या रंगांमध्ये मोटोवोल्ट उपलब्ध असून, या स्कूटर ची किंमत 1,22,000/- रुपये आहे. तुम्हाला जर ही स्कूटर बुक करायची असेल तर तुम्हाला ऍडव्हान्स पेमेंट 999 रुपयांचा करावे लागेल जे तुम्हाला संपूर्ण पेमेंट झाल्यावर रिफंड होऊ शकते.

The Newly Launched 𝐌𝐨𝐭𝐨𝐯𝐨𝐥𝐭 𝐌𝟕 𝐄-𝐒𝐜𝐨𝐨𝐭𝐞𝐫

Leave a Comment Cancel reply

Exit mobile version