ओला इलेक्ट्रिक स्कूटर देतेय प्रत्येकाला लाखो कमवण्याची संधी

Published:

Ola Electric Refer Program – सध्या ओला इलेक्ट्रिक भारतात नंबर एक चा ई स्कूटर सेलर असून कंपनीने प्रत्येक भारतीयाला ओला स्कूटर रेफर करुन पैसे कमावण्याची संधी दिली आहे.

तुमच्याकडे ओला इलेक्ट्रिक स्कूटरअसो वा नसो तुम्ही पैसे कमवण्यासाठी तुमच्या सर्कल मध्ये ओला स्कूटर रेफर करू शकता. पण त्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती तुम्हाला माहित असायला हव्या.

काय आहे ओला इलेक्ट्रिक रेफर प्रोग्राम?

ओला इलेक्ट्रिकचा रेफरल प्रोग्राम समजून घेण्यासाठी अगदी सोपा आहे. जर तुम्ही Ola S1 सिरीज किंवा S1 Pro पैकी कोणतीही एक गाडी तुमच्या फॉलोअर्स किंवा प्रियजनांना खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित केले तर त्यांच्या सक्सेसफुल खरेदीनंतर तुमच्या ओला मनी खात्यात १ हजार रुपये जमा केले जाणार आहेत. तुम्ही अनलिमिटेड लोकाना रेफर करू शकता  पण त्यासाठी काही शर्ती आहेत.

विद्यमान ग्राहकांसाठी – 

जर तुम्ही ओला इलेक्ट्रिकची कोणतीही स्कूटर वापरात असाल तर तुम्हाला एक महिन्यात ५ जणांना यशस्वी रित्या रेफर करुन प्रत्येकी १ हजार रुपये कमावता येतात. जर तुम्ही ५ वा ग्राहक यशस्वी रित्या रेफरल केल्या नंतर फ्री ८ वर्ष/८०,००० किमी वॉरंटी मिळणार आहे. तुम्ही प्रत्येक महिन्याला ५ हजार अश्या प्रमाणे अमर्यादित कमवू शकता.

  • नॉन ओला कस्टमर्स साठी मर्यादा.
  • यशस्वी रित्या ओला एस 1 रेफर केल्यास ₹१००० रुपये खात्यात जमा होतात.
  • एका महिन्यात फक्त ३ रेफरल ग्राह्य धरले जाणार.

ग्राहक नसलेले – 

जर तुमच्या कडे ओलाची कोणतीही इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध नाहीये तर तुम्ही एका महिन्यात फक्त ३ जणनांना रेफर करुन प्रत्येकी एक हजार रुपये या प्रमाणे पैसे कमावता येतात. तुम्ही प्रत्येक महिन्याला ३ हजार अश्या प्रमाणे अमर्यादित कमवू शकता.

  • यशस्वी रित्या ओला एस 1 रेफर केल्यास ₹१००० रुपये खात्यात जमा होतात.
  • प्री ओनर ओला एस 1 ग्राहकांसाठी ५ व्या यशस्वी रेफरल नंतर फ्री ८ वर्ष/८०,००० किमी वॉरंटी मिळणार.
  • एका महिन्यात फक्त ५ रेफरल ग्राह्य धरले जाणार.

ओला एस 1 रेफर कसे करावे?

ola refral

ओला ऍप मध्ये रेफर & अर्न सेक्शन मध्ये जाणून तुमच्या मित्र परिवारातीळ सदस्याचे नाव, फोन नंबर आणि शहर याची माहिती भरावी. रेफर झाल्यानंतर संबंधित ग्राहकाने यशस्वी रित्या स्कूटर खरेदी केल्यावर टीमच्या खात्यात पैसे क्रेडिट केले जातील.

Photo of author

Ajinkya Sid

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment Cancel reply

Exit mobile version