ओला इलेकट्रीक स्कूटरला आग, कंपनीने काय दिल स्टेटमेंट वाचा

स्कूटरने पेट घेतल्याने ओला इलेकट्रीक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. २ वर्ष्यात घडलेली हि दुसरी घटना आहे. या आधी ओला इलेकट्रीक च्या स्कूटर ने पुण्यातच पेट घेतल्याची घटना घडली होती आणि या वेळेस देखील पिंपरी चिंचवड येथे स्कूटर ने पेट घेतला आहे. या घटनेचा विडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आणि तो काही तासांतच वायरल झाला आहे.

OLA ELECTRIC SCOOTER FIRE

ओला इलेकट्रीक स्कूटरने पेट घेतल्याचे वृत्त

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, 28 ऑक्टोबर रोजी ओला इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याची घटना डि वाय पाटील कॉलेजच्या पार्किंग परिसरात घडली. X वर त्याच घटनेचा व्हिडिओ देखील पाहिला गेला ज्यामध्ये गाडीमधून धूर येत असून अग्निशामक दल पाण्याच्या पाईपने आग विझवताना दिसत आहे. विडिओ मध्ये स्पष्ट होत आहे कि ओला इलेकट्रीकची हि जनरेशन १ स्कूटर रस्त्याच्या मधोमध पार्क असून डिक्की मधून धूर येत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) अग्निशमन दलाने सुद्धा वर्तमान पत्राला दिलेल्या स्टेटमेंट नुसार ररस्त्यात इलेक्ट्रिक स्कूटरला अचानक आग लागली आणि त्यातून प्रचंड धूर निघू लागला.

Another Ola electric scooter caught fire in #Pune today, marking the second incident in just over a year. Safety concerns are on the rise. #OlaScooterFire #Pune @OlaElectric pic.twitter.com/MTy4oSZ9oi
— Punekar News (@punekarnews) October 28, 2023

या घटनेत चालक एकदम सुखरूप असून वेळीच अग्निशामक दल तिथे पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला. या सर्व घटने नंतर ओला इलेकट्रीक च्या अधिकृत एक्स हॅण्डल वरून या घडलेल्या घटनेचे स्टेटमेंट देण्यात आले आणि कंपनीने आपले म्हणणे स्पष्ट केले आहे.

ओला इलेकट्रीक चे स्टेटमेंट

ओला इलेकट्रीक ने स्कूटर पेट घेलेल्या घटनेची तात्काळ दखल घेत इन्वेस्टीगेशन टीम तात्काळ घटनास्थळी पाठवली व या घटनेमागे नक्की काय कारण आहे याची शहानिशा केली. कंपनीच्या स्टेटमेंट नुसार संबंधित ओला इलेकट्रीक स्कूटर मध्ये थर्ड पार्टी आफ्टर मार्केट ऍक्सेसरीज फिट केल्याने शॉर्ट सर्किट झाले आणि गाडीने पेट घेतला. इन्वेस्टीगेशन करत असताना त्यांनी हे देखील कन्फर्म केले कि वाहनांची बॅटरीला कोणतेही नुकसान झाले नसून ती पूर्णपणे सुस्तिथितीत कार्यक्षम आहे. ओला इलेकट्रीक कंपनीने  त्यांच्या ग्राहकांना या स्टेटमेंट मधून आवाहन केले आहे कि गाडीमध्ये सर्व जेनुइन पार्ट चा वापर करा किंवा काही मदत हवी असल्यास जवळच्या सर्विस सेंटरशी संपर्क करा.

Important update pic.twitter.com/K7pw71Xoxo
— Ola Electric (@OlaElectric) October 29, 2023

अशी घ्या तुमच्या इलेकट्रीक स्कूटरची काळजी

जर तुमच्या कडेही कोणत्याही कंपनीची इलेकट्रीक स्कूटर असेल तर नेहमी गाडी चार्ज करताना सावलीमध्ये पार्क करा. गाडीचे पार्ट बदलायचे असतील किंवा काही ऍक्सेसरीज लावायच्या असतील तर नेहमी कंपनीच्या ऑथोराइज सर्व्हिस सेंटरशी संपर्क करा. गाडीच्या वायरिंग किंवा इतर पार्टशी छेडछाड करू नका. जर गाडीला आफ्टर मार्केट पार्ट मुळे काही अपघात घडला तर इन्शुरन्स कंपनी क्लेम नाकारू शकते. ज्यास्त माहिती करीता आमचा हा विडिओ पहा –

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment