Shahrukh’s first EV: किंग खानच्या ब्रँडेड कार्सच्या ताफ्यात ‘ह्युदाई लॉनिक ५’ ची एंट्री..!

Bollywood बादशाह म्हणजेच शाहरुख खान सुद्धा आता एका EV म्हणजेच इलेक्ट्रिक वेहिकल चा मालक बनला आहे, ही गाडी ह्युदाई कंपनीची असून ,जाणून घ्या किंग खानच्या अनेक ब्रँडेड कार्सच्या ताफ्यात ह्युदाईच्या कोणत्या इलेक्ट्रिक कारची एंट्री झाली आहे.

  • शाहरुख खानच्या ताफ्यातली इलेक्ट्रिक SUV Hyundai IONIQ 5
  • Hyundai Ioniq 5: प्रमुख वैशिष्ट्ये आणि किंमत
  • शाहरुख कडे असणाऱ्या ब्रॅंडेड कॉर्स

Hyundai IONIQ 5

भारतामध्ये ह्युदाई इंडियाने स्वतःच्या ह्युदाई लॉनिक ५ ने आत्तापर्यंत ११०० युनिट्स ची विक्री केली आहे. आणि ह्या ११०० युनिट्सपेकी एक यूनिट किंग खान म्हणजेच शाह रुख खानच्या घरी पोहोचली आहे. शाह रुख खान हा अभिनेता जवळ जवळ २५ वर्ष ह्युदाई ह्या कंपनीचा ब्रॅंड अंबेसिडोर आहे. ह्युदाईच्या कुटुंबात शाहरुख खानला सुद्धा कुटुंबातील व्यक्ती म्हणूनच मोजलं जात.शाह रुख खानने गेल्या अनेक वर्ष्यांत ह्युदाई कंपनीचा एक जबाबदारीक ब्रॅण्ड अँबॅसिडर म्हणून त्याची कर्तव्ये पार पाडली आहेत. नुकत्यात पार पडलेल्या hyundai Ioniq 5 EV (इलेक्ट्रिक वाहन) च्या लॉन्च इव्हेंटमध्ये बॉलिवूड किंग खानने हजेरी लावली होती. त्यावेळेस शाहरूख ने सांगितले की , ‘इलेक्ट्रिक SUV Hyundai IONIQ 5 मिळाल्याबद्दल मला  सन्मान वाटतो. ही माझी पहिली EV असून ती EV Hyundai ची असल्याचा मला आनंद आहे.’

Hyundai Ioniq 5: प्रमुख वैशिष्ट्ये आणि किंमत

72.6 kWh क्षमतेची बॅटरी पॅक असणारी ही Hyundai Ioniq 5 हिची 630 किलोमीटरची श्रेणी आहे. ह्या गाडीचा चार्ज 350 kW DC असून, ह्या चार्जरचा वापर करुन ही गाडी एका वेळच्या 18 मिनिटांच्या चार्जमध्ये 10 ते 80 टक्के चार्ज होते. ही गाडी 214 bhp आणि 350 Nm चे पीक टॉर्क जनरेट करते. ह्या गाडीची किंमत ₹ 46 लाख आहे जी एक्स-शोरूम आहे.

शाहरुख कडे आहेत ‘ह्या’ गाड्या..!

संपूर्ण जगभरात सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड किंग हा गाड्यांच्या बाबतीत प्रचंड हौशी आहे हे काही नव्याने सांगण्याची गरज नाहीये, शाहरुख Hyundai Creta मॉडेल ते बेंटले कॉन्टिनेंटल जीटी, रोल्स रॉयस फॅंटम आणि मर्सिडीज-बेंझ एस-क्लास सारख्या अनेक लक्झरी कार मॉडेल्सचा शाहरुख मालक आहे .त्याच्या स्पोर्ट्स आणि luxury गाड्यांच्या ताफ्यात बुगाटी वेरॉन स्पोर्ट्सकार, ऑडी A6 आणि रेंज रोव्हर वोगचा समावेश आहे.

हेपण वाचा:

Tata Zephyr Launch Date in India: कॉन्सेप्ट कि सत्यात उतरणार, वाचा सविस्तर

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment