‘सुजुकीची इलेक्ट्रिक स्कूटर’ पेट्रोल इंजिनवर भारी पडणारी आणि 100 किमीपेक्षा जास्त range देणारी सुझुकी स्कूटर

भारतामध्ये इलेक्ट्रिक स्कुटर चा वाढता प्रसार बघता; सुझुकी ने देखील नवीन ‘इलेक्ट्रिक स्कूटर’ लॉन्च करायचा विचार मनावर घेतला आहे. ही e-scooter सुझुकीच्या popular मॉडेल स्कूटर बर्गमैन वर आधारित असणार आहे, एथर, बजाज चेतक सारख्या तगडया आणि मजबूत ईव्ही यादीत; आता ‘सुझुकी बर्गमॅन स्ट्रीट इलेक्ट्रिक’ हे नाव मोजलं जाणार आहे, या इलेक्ट्रिक स्कुटर ला 60-80 किलोमीटरची रेंज आणि आधुनिक फिचर्स देखील मिळत आहे.

इलेक्ट्रिक बर्गमॅन स्कूटर

2024 च्या वर्षात सुझुकी टोकियो- जपान मोबिलिटी शो मध्ये , आपली ‘लोकप्रिय स्कूटर बर्गमन’ ला इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये लॉन्च करणार आहे. सुझुकीची हि नवीन इलेक्ट्रिक स्कुटर बर्गमॅन सुझुकीच्या 125cc पेट्रोल इंजिनवर चालणाऱ्या स्कूटरच्या तोडीस-तोड असणार आहे, असं या ब्रॅन्डचं म्हणंन आहे. ह्या स्कुटरची बॅटरी हि बॅटरी स्वॅपिंग टेक्नॉंलॉजीची असणार आहे. या स्कूटरमध्ये पेट्रोल इंजिनच्या ऐवजी बॅटरी आणि मोटर असल्याने वजनाने बर्गमन पेट्रोल स्कूटर च्या तुलनेत, इलेक्ट्रिक बर्गमन कमी-जास्त असू शकते.

इलेक्ट्रिक बर्गमॅन स्कूटर फिचर्स

इलेक्ट्रिक स्कुटर बर्गमॅन सुझुकीबद्दलची अधिक माहिती जरी बाहेर पडली नसली तरी या इलेक्ट्रिक स्कूटरची तुलना Honda इलेक्ट्रिक स्कूटर Activa, Bajaj Chetak आणि TVS iQube सोबत केली जातेय, ज्याचा अर्थ ह्या सुझुकीच्या स्कूटरमध्ये मॅक्सी स्टाइल बॉडी वर्क, स्पोर्टी फॅशिया, साइड पॅनल्स, डिस्क ब्रेक,फ्रंट फोर्क, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, 4G सपोर्ट डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, सिंगल शॉक ऍब्जॉर्बर यासारख्या फिचर्सचा समावेश असू शकतो.

वाचा: Hero Surge: 2 इन 1 कन्व्हर्टेबल ईव्ही, इलेक्ट्रिक सर्ज एस-32 स्कूटरची बनते रिक्षा

बर्गमन स्ट्रीट 125 शी मिळता-जुळता लुक मिळणार इलेक्ट्रिक बर्गमॅनला

सुझुकी बर्गमन इलेक्ट्रिक ही मोटरसायकल ड्युअल टोन पेंट मध्ये उपलब्ध असण्याची शक्यता मंडळी जातेय, सुझुकीच्याच मूळ बर्गमनसारखे ह्या नव्या इलेक्ट्रिक मोटरसायकल आरामदायक सवारी स्थिती, चांगला परफॉर्मन्स, तेजस्वी हेडलॅम्प, आकर्षक लुक आणि फिचर्स मिळत असल्याची शक्यता मांडली जातेय. बर्गमन स्ट्रीट 125 मध्ये मेटॅलिक मॅट ब्लॅक-वायकेव्ही, मेटॅलिक रॉयल ब्रॉन्झ-क्यूएस 4, पर्ल मॅट शॅडो ग्रीन, मेटलिक मॅट ब्लॅक नंबर 2, मेटॅलिक मॅट बोर्डो रेड, पर्ल मिराज व्हाइट मिळणारे कलर suzuki burgman electric मध्ये मिळणार आहेत की नाही, हे लवकरच जाहीर केले जाईल.

वाचा: ‘छोटा पॅकेज- बडा धमाका’ 300 km पेक्षा जास्त रेंज देणारी ‘स्वस्त इलेक्ट्रिक नॅनो’

सुझुकी मोटारसायकल तपशील

सुझुकी मोटोसायकल म्हंटल कि, सर्वात जुनं आणि विश्वासू ब्रँड म्हणून ओळखलं जात, suzuki motorcycle
सुरक्षित, जबरदस्त आणि आरामदायी राईडसाठी popular आहेत. सुझुकीच्या Avenis, हायाबुसा, कटाना + व्ही-स्टॉर्म 650XT, Gixxer SF Access आणि V-Strom 250 ह्या मोटोरसायकल सर्वात लोकप्रिय आहेत.

Suzuki Burgman Electric scootar बॅटरी

suzuki burgman electric ची बद्दल अधिक माहिती जरी बाहेर पडली नसली तरी टेस्ट यूनिट मॉडेलमार्फत या इलेक्ट्रिक स्कुटर च्या काही गोष्टी बाहेर पडल्या आहेत. सुझुकीच्या टेस्ट यूनिट e-scooter मध्ये AC सिंक्रोनस मोटर दिली गेली आहे, सोबत 3-4kWh बॅटरी पॅक दिला आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची लिथियम-आयन बॅटरी – स्वॅपिंग टेक्नॉंलॉजी म्हणजे काढ-घाल करण्याजोगी आहे. स्कूटरच्या चार किलोवॅट मोटरमार्फत 18 न्यूटन मीटरचा टॉर्क मिळतो, एका चार्जमध्ये बर्गमन इलेक्ट्रिकची बॅटरी रेंज 100 किलोमीटरपेक्षा जास्त रेंज देण्याची अपेक्षा मांडली जातेय.

suzuki e-scooter बर्गमन मेजरमेंट

स्कूटरच्या मेजरमेंट बाबतीत माहिती देता, ह्या 147 किलो वजन असणाऱ्या ई-स्कूटरची एकूण लांबी 1825 मिमी , रुंदी 765 मिमी आणि उंची 1140 मिमी असू शकेल, या स्कूटरच्या सीटची उंची 780 मिमी असू शकते. 

सुझुकी बर्गमन इलेक्ट्रिक लॉन्चिंग आणि किंमत

सुझुकीने या इलेक्ट्रिक स्कूटरची लॉन्चिंगच्या तारिखेच्या माहितीबद्दल काही खुलासा केला नसला तरी, 2024 च्या येत्या काही महिन्यात ही स्कूटर भारतीय बाजारात पाहायला मिळू शकते दरम्यान स्कूटरच्या किंमतीबाबतीत सांगायचं झाल  तर, 1,05,000 ते 1,20,000 रुपयांच्या किंमतीटी ही स्कूटर उपलब्ध होण्याची शक्यता मांडली जातेय.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment