Top 5 EV Scooters in 2023- या वर्षा अखेरीस लाँच होणाऱ्या ‘टॉप ५’ इलेक्ट्रिक स्कूटर

2023 च्या वर्षाच्या हा शेवटचा महिना आणि शेवटच्या महिन्यात इलेक्ट्रिक मोबेलिटीक्षेत्रात काही EV स्कूटर्स आगमन करण्याच्या तयारीत आहेत. हे आगमन स्पर्धात्मक होण्यासाठी काही नव्या ev निर्मात्यांनीसुद्धा जय्यत तयारी केली असल्याचे दिसत आहे आणि खास ह्यासाठी नवनवीन EV वाहनावर ऑफर्ससुद्धा ठेवण्यात आल्या आहेत.

  • 2023 मधल्या नव्याने भेटीस येणाऱ्या टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर

नवीन  बजाज चेतक अर्बन

बजाजने वाहनबाजारात नव्याने  बजाज चेतक अर्बन मार्फत एंट्री केली असून  गाडीच्या नवीन बेस वेरिएंटमध्ये चांगली रेंज आणि सिंगल इको रायडिंग मोड शिवाय ड्रम ब्रेक मिळणार आहे. या गाडीत डिव्हाइस कनेक्टविटी ऑप्शन आहे.

किंमत – ₹ 1.20 लाख

एथर 450 एपेक्स

या गाडीच्या हार्डवेअर च्या बाबतीत म्हणजे नवीन ather 450 apex चा आकार अथवा साचा कसा असेल, याची माहिती तूर्तास तरी बाहेर पडली नसली तरी, याची प्रभावी रेंज आणि चांगलं एक्सलॅरेशन आणि परफॉर्मन्स याची चर्चा सगळीकडे होत आहे.

किंमत – ₹ 1.49 लाख रुपये

गोगोरा क्रॉस ओव्हर

भारतीय इलेक्ट्रिक वाहनाच्या बाजारपेठेत तैवानची इलेक्ट्रिक कंपनी पाय रोवताना दिसत आहे,कारण आता गोगोरा क्रॉस ओवर भारत नव्याने लाँच होत आहे. भारतातील बाजारपेठेसाठी गोगोरा त्यांच्या स्कूटर मध्ये काय काय खास गोष्टी करतेय हे अजूनपर्यंत ह्या कंपनीने सांगितले नाहीये पण लवकरात लवकर या नव्या गाडीची संपूर्ण माहिती जाहीर होऊ शकते.

किंमत – लवकरच प्रदर्शित होईल.

सिंपल डॉट वन

जरी सिंपल वन ची सुधा सिंपल डॉट वन ही गाडी लवकरच मार्केटमध्ये हजेरी लावत आहे , अजूनपर्यंत अधिक माहिती काही बाहेर पडली नसली तरी लुक आणि अधिक फिचर्स ची माहिती लवकरात लवकर उपलब्ध होईल.

किंमत -₹ 99,000 रुपये

कायनेटिक ग्रीन इलेक्ट्रिक स्कूटर

११ डिसेंबर २०२३ रोजी वाहन मार्केटमध्ये नव्याने मॉडल उपलब्ध करणारी कायनेटिक ग्रीन कंपनीने त्याच्या नव्या इस्कूटरचे तपशील मात्र अगदी कमीच दिले आहेत, या कंपनीने त्याच्या ब्रँडसोबत नव्या EV ची ओळख जगासमोर करण्याचे आव्हान स्वीकारले आहे.

किंमत – ₹ 80,000 रुपये

हेपण वाचा:

होंडाच्या कार्स महागणार, जाणून घ्या कारणे आणि नवी किंमत

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment