2024 हिरो डेस्टिनी 125 मध्ये ‘या’ पाच महत्त्वाच्या गोष्टी बदलल्या..!

Published:

या नवीन अपडेट मध्ये जनरेशन टू 2024 हिरो डेस्टिनी 125 या स्कूटरला तीन वेरीएंट आणि सात रंग मिळालेले आहेत. या नवीन स्कूटरचे झालेले बदल,  नवीन किंमत, फीचर्स-स्पेसिफिकेशन सोबत संपूर्ण माहिती सदर माहिती दिली गेलेली आहे.

2024 हिरो डेस्टिनी 125

2018 मध्ये लॉन्च झालेल्या हिरो डेस्टिनी 125 या स्कूटरला मिळालेला हा पहिला अपडेट असून, 2018 मध्ये लॉन्च झालेल्या या स्कूटरला मिळालेला हा पहिला अपडेट आहे, हिरो डेस्टिनी ही स्कूटर Hero Xoom 110 या प्लॅटफॉर्मवर बनवण्यात गेलेली असून आहे  यामध्ये कॉस्मेटिक मेकओव्हर, नवीन डिझाईन, एलईडी हेडलाईट ज्याच्यासोबत डे-टाईम रनिंग लाइट्स, लांब सीटचा समावेश केलेला आहे. स्कूटरमध्ये काही महत्त्वाचे बदल घडवण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये लाँग व्हीलबेस, फुल LCD हेडलाईट प्रोजेक्टर, आकाराने मोठे असणारे व्हिल्स सोबत फ्रंट डिस्क-ब्रेक, फुल डिजिटल क्लस्टर, रिव्हर्स एलईडी एलसीडी आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी यांचा समावेश केलेला आहे. स्कूटरच्या सीट खाली सुद्धा 19 लिटरची स्टोरेज दिली गेलेली आहे.

2024 Hero Destini 125 वेरीएंट्स

हिरो डेस्टिनी एक दोन पाच ही दोन लेवल मध्ये उपलब्ध करण्यात आलेली आहे. यातील पहिला प्रकार – कास्ट ड्रम वेरिएंट प्रकार;  त्यात वी-एक्स वेरिएंट (VX variant) उपलब्ध आहे तर कास्ट डिस्क प्रकार, ज्यामध्ये झेड एक्स आणि झेड एक्स प्लस व्हेरिएंट (ZX and ZX+ variants) उपलब्ध आहे. इटरनल व्हाइट, रीगल ब्लॅक , ग्रूवी रेड, मिस्टिक मॅजेन्टा (पिंक), कॉस्मिक ब्लू, इटरनल व्हाइट आणि रीगल ब्लॅक या सात रंगांमध्ये ही स्कूटर उपलब्ध झाली आहे.

हिरो डेस्टिनी 125 मध्ये बदलण्यात आलेले फीचर्स

फीचर्समध्ये नवीन एलईडी हेडलाईट आणि प्रोजेक्टर सेटअपच्या जवळ एच H आकाराचे DRL आणि टर्न- इंडिकेटर मिळतात. स्कूटरच्या फीचर्स मध्ये बेस-स्पेक (base-spec) आणि mid-spec (base-spec) वेरिएंटमध्ये सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळतं, त्याच तुलनेत टॉप स्पेकमध्ये संपूर्णपणे डिजिटल LCD सोबत निगेटिव्ह डिस्प्लेचा समावेश, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सोबत स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी ज्याद्वारे चालक कॉल आणि एसएमएस यांची माहिती मिळू शकतो.  नोटिफिकेशन अलर्ट आणि टर्न बाय टर्न नेवीगेशन यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे.

हिरो डेस्टिनी 125 इंजिन माहिती

या स्कूटरच्या इंजिन बाबतीत माहिती देता स्कूटरमध्ये 124.6 cc च सिंगल सिलेंडर एअर-कूल्ड इंजिन दिले गेलेल आहे, जे 9 bhp इतकी पॉवर आणि 10.4 Nm इतका टॉर्क जनरेट करतो. स्कटरच वजन 114 किलो इतके आहे. या स्कूटरची फ्युएल टॅंक कॅपॅसिटी 5.0 लिटर इतकी असून एका लिटरमध्ये 54 किलोमीटर चा पल्ला ही स्कूटर गाठू शकते. स्कूटरचे प्रतिस्पर्धी सुझुकी एक्सेस 125 आणि टीव्हीएस ज्युपिटर 125 तसेच होंडा एक्टिवा 125 असू शकतील, अशी शक्यता मांडण्यात येत आहे.

Photo of author

Ajinkya Sid

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment