महेंद्रसिंग धोनीची नवीन ‘अफलातून कस्टमाइज ‘ बाईक ..!

Ajinkya Sidwadkar

Updated on:

Jawa 42 Bobber : भारतीय क्रिकेट संघाच्या निवृत्त कर्णधार ”महेंद्रसिंग धोनी आणि त्याचं बाईक वेड”, हे काही नव्याने सांगण्याची गोष्ट नाहीये. ह्या सुप्रसिद्ध क्रिकेटपटूंच्या मोटारसायकलच्या ताफ्यात, आता अजून एका मोटारसायकलची भर पडली आहे, आणि ह्या बाईकचा नाव आहे  ‘जावा 42 बॉबर’. मूळचा झारखंड च्या रांचीमधून आलेला हा क्रिकेटपटू त्यांच्या भागात बऱ्याचदा ‘नवनवीन गाड्या, बाईक’ आवडीने चालवत असताना सगळ्यांना दिसले आहे. माहीच्या जवळ असणाऱ्या त्याच्या बाईक कलेक्शन वरून सगळ्यांच्या लक्षात येतंच कि माही किती बाइकप्रेमी आहे.

जावा 42 बॉबर

जावा 42 बॉबर: इंजिन

धोनीच्या मोटारसायकलच्या ताफ्यात नव्याने वाढलेली जावा 42 बॉबर, एक बेस्पोक पेंट जॉबसह विकत घेता येते. ह्या बाईकच्या इंजिनबाबतीत बोलायचं झालं तर 334 सीसी असणार सिंगल-सिलेंडर इंजिन आहे , ज्याची साधारण 29.5 बीएचपी पॉवर आणि 32.74 एनएम पीक टॉर्कसह लिक्विड-कूल्ड जनरेट करण्याची लेवल आहे. ह्या बाईकला 6-स्पीड गिअरबॉक्स, 35 मिमी टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि 7-स्टेप एडजेस्टेबल प्रीलोड दिले आहेत त्याचसोबत मागील बाजूस गॅस-फिल्ल्ड मोनोशॉक सुद्धा ह्या बाइकमध्ये दिले आहेत.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 

ह्या जावा 42 बॉबर बाईकमध्ये फ्रंट सिंगल डिस्क 280 मिमी चा आहे आणि मागचा डिस्क240 मिमी  आहे, हि बाईक ड्युअल-चॅनल ABS आहे. 

जावा 42 बॉबर: रंग आणि वैशिष्ठे 

जावा 42 बॉबरमध्ये इंधनची टाकी जिच्यावर सोनेरी आकर्षक पट्टे आहेत, बाईकच्या बाजूचे पॅनल्स, मोटोरसायकल च्या पुढे मागे मडगार्ड्स देखील आहेत. हि मोटारसायकल सिंगल-सीट आहे .

जावा 42 बॉबर: किंमत 

धोनीच्या बाईक कलेक्शनमध्ये नव्याने  आलेली Jawa 42 Bobber ची किंमत ₹2.25 लाख (एक्स-शोरूम) आहे. माचीकडे असणारी हि जावा 42 बॉबर महिने आवडीनुसार बेस्पोक अपग्रेड केली आहे. माहीकडे जावा 42 बॉबर सोडून असंख्य बाईकचा कलेक्शन आहे ज्यामध्ये जुन्या Yamaha YZF-R6, BSA आणि नॉर्टन, जावा ते कावासाकी निन्जा ZX-14R यासारख्या कित्येक मोटोरसायकलींचा समावेश आहे.

‘बोल्ड रंगामुळे’ आता नवीन केटीएम 390 एडव्हेंचरच्या चर्चा रंगल्या…!

EV जगातली आजपर्यंतची रोल-रॉइसची ‘चॅलेंजिंग’ घोषणा…!

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 
Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment