2024 Kawasaki W175 Street भारतात लाँच, किंमत आणि सर्व फीचर येथे जाणून घ्या

Published:

2024 Kawasaki W175 Street या बाईकला कंपनीने याच महिन्यात लाँच केले असून बाईकची किंमत 1.35 लाख रुपये (एक्स-शोरूम) जाहीर करण्यात आली आहे, हि किंमत इंट्रोड्युक्टरी असून काही दिवसात गाडीची किंमत वाढवण्यात येणार आहे. कावासाकी W175 स्ट्रीट भारतीय बाजारपेठेत बजाज एवेंजर क्रूज 220, रॉयल एनफील्ड हंटर 350 आणि टीवीएस रोनिन 225 सारख्या प्रस्थापित बाईक्सना टक्कर देणार आहे.

कावासाकी W175 स्ट्रीट डिलिव्हरी

गोव्यात सुरु असलेल्या “इंडिया बाईक वीक २०२३” मध्ये कावासाकीने त्यांच्या डब्ल्यू175 स्ट्रीट या रेट्रो-स्टाइल बाईकला लाँच केले असून या बाईकमध्ये नवीन कलर्स चे ऑपशन्स आणि काही कॉस्मेटिक बदलावं केले आहे. नवीन 2024 Kawasaki W175 Street आउटगोइंग मॉडेल पेक्षा अधिक ऍडव्हान्स आणि आकर्षक करण्यात आली आहे. या गाडीची बुकिंग्स सुरु करण्यात आली असून डिसेंबर महिन्यातच डिलिव्हरी सुद्धा पण इंडिया केली जाणार आहे.

कावासाकी W175 स्ट्रीट डिजाईन आणि फीचर्स

अपडेटेड W175 स्ट्रीटला ला पूर्वीच्या मॉडेलच्या तुलनेत अनेक अपडेट दिले आहेत ज्यामध्ये दोन नवीन कलर ऑपशन्स ज्यामध्ये कॅंडी एमराल्ड ग्रीन आणि मेटॅलिक मूनडस्ट ग्रे, 17-इंच अलॉय व्हील सह ट्यूबलेस टायर्स, 786.5 मिमी सीट्स, समोर टेलीस्कोपिक फोर्क आणि मागील बाजूस ड्युअल शॉक सस्पेन्शन्स, 152 मिमी मिमी ग्राउंड क्लीयरन्स, 245 मिमी फ्रंट ब्रेक डिस्क, सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, फ्यूल टैंक वर आकर्षक ग्राफिक्स व्हिज्युअल्स इत्यादी. या व्यतिरिक्त डब्लू१७५ स्ट्रीट रेट्रो अर्बन बाईक मध्ये 12.1 litres कपॅसिटी असणारी टाकी दिली आहे आणि 1,323 mm व्हील बेस गाडीला दिलेला आहे.

Kawasaki W175 Street colors

2024 W175 स्ट्रीट मध्ये काही डाउनग्रेड देखील पाहायला मिळाले आहेत ज्यामध्ये, ग्राउंड क्लीयरन्स 165 मिमी वरून 152 मिमी करण्यात आलाअसून सीटची उंची देखील 786.5 मिमी पर्यंत कमी केली आहे.

कावासाकी W175 स्ट्रीट इंजन 

कावासाकी W175 स्ट्रीट मध्ये 177cc सिंगल-सिलेंडर, एयर-कूल्ड, फ्यूल-इंजेक्टेड इंजन सेटअप दिला आहे. या इंजिनसोबत 5-स्पीड गियरबॉक्स जोडला गेला असून हे इंजिन @7,000 rpm वर 12.9 BHP मॅक्स पॉवर निर्माण करते आणि @6,000 rpm पर 13.2 NM मॅक्स टॉर्क प्रोड्युस करते.

ENGINE & TRANSMISSION
TYPE Air-cooled, 4-stroke Single Cylinder
DISPLACEMENT 177 cc
BORE AND STROKE 65.5 x 52.4mm
COMPRESSION RATIO 9.1:1
VALVE SYSTEM SOHC, 2 valves
FUEL SYSTEM Fuel injection
FUEL TYPE / MINIMUM OCTANE RATING Unleaded petrol
IGNITION Digital
STARTING Electric
LUBRICATION Forced lubrication, Wet
TRANSMISSION 5-speed, return
MAXIMUM POWER 9.6 kW {13 PS} / 7,500 rpm
MAXIMUM POWER WITH RAM AIR
MAXIMUM TORQUE 13.2 N•m {1.3 kgf•m} / 6,000 rpm

 

वाचा – होंडाची पहिली EM1 इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच होणार लाँच, सर्व माहिती आली समोर

2024 Kawasaki W175 Street: ऑन-रोड किंमत

कावासाकी रेट्रो W175 स्ट्रीट ची एक्स शोरूम किंमत ₹1.35 लाख रुपये इंट्रोडक्टरी प्राइस वर लॉन्च केले आहे.  कंपनी ऑफिशिअल्स ने हि किंमत किती दिवसांकरिता किंवा महिन्यांकरिता व्हॅलिड असेल याबाबत कोणतेही भाष्य केले नाही. W175 Street ची महाराष्ट्रात ऑन-रोड किंमत ₹1,63,674/- इतकी आहे.

Description Amount
Ex-Showroom Price ₹ 1,35,000
TCS ₹ 0
Insurance ₹ 10,600
Registration Charges ₹ 18,074
Processing Charges ₹ 0

 

Kawasaki First Made In India Motorcycle || MY23 W175 || Absolute Respect || Kawasaki W175

Photo of author

Ajinkya Sid

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment Cancel reply

Exit mobile version