‘बोल्ड रंगामुळे’ आता नवीन केटीएम 390 एडव्हेंचरच्या चर्चा रंगल्या…!

Published:

भारतीय बाजारपेठेत तरुणांच्या आवडीची KTM बाईक आता अपडेट होऊन नव्याने नावारुपास यायला सज्ज झाली आहे. Duke नंतर पसंदीस पडलेली KTM च 2024 KTM 390 Adventure ह्या नव्या रूपाचं जागतिक स्तरावर अनावरण झालं आहे. आणि तुम्हीसुद्धा स्पोर्ट्सबाईक चे वेडे फॅन असाल आणि ह्या नवीन KTM  बाईक विकत घेण्याचा विचार करत असाल, खालील संपूर्ण माहिती तुमच्यासाठीच आहे, कारण सदर माहितीमध्ये केटीएम बाईकचा परफार्मन्स,बाइकमध्ये दिलेल्या पर्यायी रंगसंगती,ऑफ-रोड परफार्मन्स,पॉवर-पॅक कामगिरी,वैशिष्ट्ये या सगळ्यांची अचूक माहिती दिलेली आहे.(नवीन 2024 KTM 390 Adventure मध्ये रंग पर्याय नव्याने देण्यात आले आहेत, ज्यामुळे 2024 केटीएम 390 एडव्हेंचर हि अजूनच देखणी, रोमांचक आणि आकर्षक दिसते. सदर बाइकमध्ये अन्य कोणतेही बदल करण्यात आले नाहीये.)

2024 केटीएम 390 एडव्हेंचर: पॉवर-पॅक इंजिन

2024 KTM 390 Adventure गाडीचं 373.2 cc सिंगल-सिलेंडर (लिक्विड-कूलिंग )इंजिन आहे , जे 9,000 rpm वर 43 bhp च्या इतका पॉवर आउटपुट देत.क्विकशिफ्टर सोबत गाडीमध्ये 6-स्पीड गिअरबॉक्स आहेत ज्याला स्लिप-अँड-सिस्ट क्लच ने जोडण्यात आले आहे.

2024 केटीएम 390 साहसी बाईक: रंग 

2024 केटीएम 390 एडव्हेंचर

2024 KTM 390 साहसी बाईक -या नवीन बाईक मध्ये मध्ये एडव्हेंचर व्हाइट अँड एडव्हेंचर ऑरेंज असे कलर पर्याय म्हणून दिले आहे. संपूर्ण गाडीच्या रंगाशी एकरूप होऊन गाडीचा देखावा, या दोन्ही भिन्न रंगामुळे ऊर्जा देणारा आणि आकर्षक वाटतो.

KTM 390 Adventure

केटीएम 390 साहसी बाईक : सेफटी आणि वैशिष्ट्ये

या गाडीमध्ये 3D इनर्शिअल मेजरमेंट युनिट (IMU) असून ऑफरोड एबीएस, राइड-बाय-वायर,  ट्रॅक्शन कंट्रोल , क्विकशिफ्टर+ , लीन अँगल सेन्सिटिव्हिटीसह कॉर्नरिंग एबीएस , शिवाय स्ट्रीट आणि ऑफ-एड हे  राइडिंग मोड्स आहेत सोबत गाडीमध्ये एलईडी हेडलँप चा समावेश आहे. या गाडीची थ्रॉटल बॉडी हि 46 मिमी असून , स्लिपर क्लच आणि 5-इंचाचा कलर टीएफटी डिस्प्ले सुद्धा गाडीमध्ये देण्यात आला आहे. 

केटीएम 390 एडव्हेंचर: बुकिंग आणि किंमत

या केटीएम 390 एडव्हेंचर गाडीची प्रतिस्पर्धी रॉयल एनफिल्ड हिमालयन 452 मानले जात आहे. पण किंमतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर, नुकत्याच भारतात लाँच  झालेल्या- या KTM च्या साहसी बाईक ची किंमत ₹3.11 लाख एक्स-शोरूम ठेवण्यात आली आहे. आणि या गाडीच्या बुकिंगसाठी  ₹4,499 च्या नाममात्र टोकन पेमेंट करून, सोबत 2024 KTM 390 Adventure अधिकृत वेबसाइटवर बुकिंग केले जाऊ शकते.

दिवाळीच्या ऐन मोक्यावर, OLA स्कुटर रेकॉडब्रेकिंग विक्रीमुळे पुन्हा चर्चेत…!

ओला इलेकट्रीक स्कूटरला आग, कंपनीने काय दिल स्टेटमेंट वाचा

 

Photo of author

Ajinkya Sid

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment Cancel reply

Exit mobile version