टीव्हीएस आयक्यूब vs ओला एस-1-एक्स कोणती आहे बेस्ट स्कूटर ?

Published:

TVS iQube S vs Ola S1X+ : The electric scooter compares

इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेत आहात का? पण कळत नाहीये, चांगली स्कूटर कोणती आहे?तुमची चिंता मिटवण्यासाठी खालील माहितीमध्ये महाराष्ट्रमधल्या दोन इलेक्ट्रिक स्कूटरची माहिती दिली आहे. ​TVS iQube S आणि Ola S1X ज्यामध्ये एक इलेक्ट्रिक स्कूटर बजेट-फ्रेंडली, लोंग रेंज आणि एडवांस्ड फिचर्सने भरपूर आहे तर दुसरी प्रिमियम लाँग रेंज आणि एडवांस्ड फिचर्स असणारी. चला या दोन्ही बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटरची तुलना करुन पाहूया कोणती इलेक्ट्रिक स्कूटर तुमच्यासाठी बेस्ट स्कूटर ठरेल.

आजकाल इलेक्ट्रिक स्कूटरची मार्केटमध्ये गर्दी झाली आहे. बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटर, एक लाखाच्या आतमध्ये बेस्ट स्कूटर, लाँग रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर किंवा स्वस्तात चांगली रेंज देणारी प्रिमियम स्कूटर ह्या गरजांमुळे स्कूटरच्या खरेदीसाठी बाहेर पडल्यावर खूप गोंधळ उडतो,परिणामे चुकीच्या स्कूटरची खरेदी आणि पश्चाताप सहन करावा लागतो. म्हणूनच इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करताना तुम्हाला वाटणारे विचार,शंका यांचं निसरण करत खालील माहितीमध्ये भारतातील टॉप इलेक्ट्रिक स्कूटर टीव्हीएस आयक्यूब आणि ओला एस-1-एक्स ची माहिती देत आहे. ओला आणि  टीव्हीएस या दोन्ही कंपन्या इलेक्ट्रिक स्कूटर बनवणात अग्रेसर आहेत. दोन्ही स्कूटर तरुणपिढीला आकर्षित करतात. दोन्ही स्कूटरमध्ये चांगली श्रेणी, गरजेचे-एडवांस्ड फिचर्स भरपूर आहेत.

टीव्हीएस आयक्यूब vs ओला एस-1-एक्स

माहिती  ओला एस-1-एक्सटीव्हीएस आयक्यूब
वेरिएंट्सओला इलेक्ट्रिक एस1 एक्स 2kWh

ओला इलेक्ट्रिक एस1 एक्स 3kWh

ओला इलेक्ट्रिक एस1 एक्स +

ओला इलेक्ट्रिक एस1 एक्स 4kWh

आयक्यूब 2.2 kWh 

आयक्यूब Standard 

आयक्यूब S – 3.4 kWh

आयक्यूब ST – 3.4 kWh 

आयक्यूब ST – 5.1 kWh

टॉप-स्पीड90 किमी ताशी78 किमी ताशी
राइड मोडइको,नार्मल आणि स्पोर्टइकोनॉमी, पॉवर
रेंज125 किमी100 किमी
स्कूटरचे वजन118 किलो115 किलो
चार्जिंगसाठी लागणारा वेळ7 तास 40 मिनिटे4 तास 30 मिनिटे
किंमत74,999 रुपये1,17,637 रुपये

ओला एस1 एक्स च्या प्रमुख स्पेसिफिकेशनमध्ये एंटी-थेफ़्ट अलार्म, कॉल आणि मेसेजिंग, लो बॅटरी अलर्ट,चार्जिंग पॉइंट, फास्ट चार्जिंग ऑप्शन सारखे पर्याय मिळतात, टीव्हीएस आयक्यूबच्या प्रमुख स्पेसिफिकेशनमध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, कॉल/एसएमएस अलर्ट, पार्क असिस्ट, दोन राइड मोड्स, सोशल मीडिया अलर्ट सारखे फिचर्स मिळतात.

iQube S इलेक्ट्रिक स्कूटर मधील आयक्यूब 2.2 kWh बॅटरी 75 किमी इतकी रेंज देते, आयक्यूब Standard 100 किमी, आयक्यूब S – 3.4 kWh 100 किमी, आयक्यूब ST – 3.4 kWh 100 किमी आणि आयक्यूब ST – 5.1 kWh 150 किमी इतकी रेंज देते. ही स्कूटर 11 रंगांमध्ये उपलब्ध आहे. स्कूटर चार्ज होण्यासाठी 2 तास ते 4.30 मिनिटे लागतात.

ओला इलेक्ट्रिक एस1 एक्स 2kWh एका चार्जवर 95 किमी रेंज,एस1 एक्स 3kWh 143 किमी रेंज, ओला एस1 एक्स + 151 किमी रेंज आणि ओला इलेक्ट्रिक एस1 एक्स 4kWh 190 किमी रेंज देते. ही इलेक्ट्रिक स्कूटर चार्ज होण्यासाठी 5 तास ते 6.5 तास लागतात. ही स्कूटर 7 रंगांमध्ये उपलब्ध आहे.

TVS iQube S vs Ola S1X किंमत

स्कूटर  व्हेरिएंट किंमत
ओला एस-1-एक्सओला इलेक्ट्रिक एस1 एक्स 2kWh74,999 रुपये
ओला इलेक्ट्रिक एस1 एक्स 3kWh84,999 रुपये
ओला इलेक्ट्रिक एस1 एक्स +89,999 रुपये
ओला इलेक्ट्रिक एस1 एक्स 4kWh99,999 रुपये
टीव्हीएस आयक्यूबआयक्यूब 2.2 kWh 1,17,637 रुपये
आयक्यूब Standard1,47,003 रुपये
आयक्यूब S – 3.4 kWh1,56,795 रुपये
आयक्यूब ST – 3.4 kWh 1,65,911 रुपये
आयक्यूब ST – 5.1 kWh1,85,729 रुपये

 

Photo of author

Ajinkya Sid

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment