मोठ्या कुटुंबासाठी टोयाटोची एक्सवॅन, दुसऱ्या सीटचा बनतो टेबल, जाणून घ्या संपूर्ण माहिती.

Aishwarya Potdar

आजकाल प्रवास करताना यात्रा सुखकर आणि आरामदायी व्हावी यासाठी नवनवीन शक्कल लढवल्या जात असताना, टोयाटोसुद्धा नवीन वॅन बनवत आहे; एक्सवॅन गियर. जिला अगदी सोफ्यासारखे मोठे आणि आरामदायी सीट्स मिळतील, ज्यात किमान 7-8 लोक अगदी आरामात प्रवास करू शकतील. तुम्हीसुद्धा अश्या वॅनच्या शोधत आहात का जिचा कम्फर्ट कमालीचा असेल, शिवाय एडवांस्ड फिचर्सने भरपूर असेल, तर खालील माहिती संपूर्ण वाचा.

एक्सवॅन गियर

टोयाटोचे नवीन पेटंट बाहेर पडले आहे, ज्यामध्ये ही वॅन अगदी वॉक्सी किंवा नोहा सारखी दिसते. वॅनच आकारमान सुद्धा ह्या दोन्ही वॅन्स इतकचं आहे. या वॅन मध्ये तीन वेरिएंट्स असणार आहेत; एक्स-वॅन-गियर, एक्स-वॅन-कोअर आणि एक्स-वॅन-टूल. वॅन मध्ये सीटिंग अरेंजमेंट ही 3-रो मध्ये बनवली आहे. ही वॅन मोठ्या कुटुंबासाठी बनलेली असल्याने हिची रचना अगदी सहज आणि सोप्पी बनवली आहे. वॅनच्या आतमध्ये जाण्याचा मार्ग अगदी सोपा केला आहे. स्लाइडिंग डोअर असणाऱ्या वॅन मध्ये पहिल्या रांगेतील पॅसेंजर सिटला असं काहीसं डिझाइन मिळत की ज्यामुळे, फ्रंट सिट अगदी छोट्या लिविंग रुममध्ये रूपांतरीत होते, ज्यामुळे मागील प्रवाशीसुद्धा आरामात प्रवास करतात.

वाचा: ‘स्वस्तात मस्त’ टाटाची Altroz Racer, टाटाची डायरेक्ट ह्युंदाईशी टक्कर

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 

वाचा: टाटा टियागो ईव्हीला मिळाला नवा अपडेट, या दोन फिचर्सचा समावेश शिवाय टाटा टियागो ईव्हीवर मिळतोय डिस्काउंट

या वॅन मधील दुसऱ्या रांगेतील सिट एखाद्या टेबलप्रमाणे वापरू शकता. ह्या वॅनच मोजमाप सांगायचं म्हंटल तर, लांबीने 4,695 मिमी ,रुंदीने 1,820 मिमी आणि उंचीने 1,855 मिमी इतकी आहे. प्रवास चांगला अनुभवता यावा म्हणून या वॅन मध्ये 3 पिस सनरूफ दिलं गेलं आहे. ही कॉन्सेप्ट जरी फुचरिस्टिक असली तरी लवकरच भारतातील रस्त्यावर ही वॅन धावताना दिसण्याची शक्यता मंडळी जाते. जाहीर झालेल्या पेटंटच्या मदतीने वॅन मध्ये डेटाइम रनिंग लाइट्स आणि पिक्सलेट्ड हेडलाइट हे सोडून इतर बाकी माहिती कळली नाहीये.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 
Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment