‘स्वस्तात मस्त’ टाटाची Altroz Racer, टाटाची डायरेक्ट ह्युंदाईशी टक्कर

Aishwarya Potdar

Tata Altroz Racer: टाटा मोटर्स ने या वर्षात भारत मोबिलिटी एक्स्पो 2024 मध्ये ‘एक-सो-एक’ कारचे प्रेझेंटेशन आहे, आणि टाटा टॉप कारची यादी आता आहे, ‘टाटा अल्ट्रोझ रेसर’ चा समावेश आहे, अल्ट्रोझ रेसर लुकने अजूनच आकर्षक बनली आहे. Hyundai i20 N-Line च्या ह्या प्रतिस्पर्धीची तुम्ही जवळपास 10 लाखात खरेदी करू शकता. चला बघूया टाटा कार खरेदी मार्गदर्शक 2024 बद्दल सर्व माहिती.

टाटा अल्ट्रोझ रेसरला मिळालेले नवीन फीचर्स

टाटा अल्ट्रोझ रेसर, नावातच रेसर असल्याने; भल्या-भल्या powerfull गाडयांना नवीन अल्ट्रोज टक्कर देणार आहे; Hyundai i20 N शी तोडीस तोड असणारी, advanced features ने सुसज्ज असेल. या टाटा अल्ट्रोझ रेसर मध्ये sunroof मिळाल्याने amazing असा बदल गाडीत झाला आहे.

वाचा: ‘बिझिनेसवाल्यांची स्कूटर’ Ola ची नवीन स्कुटर मिळणार फक्त B2B साठी, काय आहे हे B2B?

या गाडीत सांगण्यासारख अजून एक महत्वाचं फिचर आहे, कारचा लुक एखाद्या रेस कार सारखी आहे, कारचा लुक vibrant टोनच्या रंगातून मिळतो; थोडक्यात ह्या गाडीला sporty असा लुक दिला गेला आहे. तुम्हाला जर थोडी ऍडवेंचरिक आणि स्पोर्टी लूकच्या गाड्यांमध्ये रस असेल तर टाटा अल्ट्रोझ रेसर हा तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे.

टाटा अल्ट्रोझ रेसरचे बाहेरील फीचर्स

अल्ट्रोझ रेसरला, ड्युअल-टोन पेंट थीममध्ये रंगवण्यात आलं आहे, कारच्या ऑरेंज रंगामुळे कार पटकन डोळ्यात भरते. अल्ट्रोझमध्ये पहिल्यांदाच ब्लॅक-आउट सनरूफ जे व्हॉईस असिस्ट आहे, सनरूफ Altroz मध्ये प्रथमच, त्यात ब्लॅक-आउट सनरूफ आणि जेट ब्लॅक बोनेट आहे.

वाचा: स्वस्तात मस्त आणि 150km पेक्षा अधिक रेंज देणारी ‘RV400 BRZ’, रिव्होल्टची बाईक टॉर्क क्रॅटोस वर पडणार भारी

कारच्या सेंटरमध्ये डबल लाईन पांढरे पट्टे, जेट ब्लॅक रंगाचं बोनेट,ब्लॅक-आउट हूड आणि कोरे-करकरीत 16-इंच मल्टी-स्पोक अलॉय व्हील, 5 स्टार क्रॅश सेफ्टी, पॉवरफुल इंजिन, 6 एअरबॅग्ज, लार्ज टचस्क्रीन इन्फोटेनमेंट या कार मध्ये मिळतात. समोरच्या फेंडरवर ‘रेसर’ बॅजिंग मुळे लुक एकदम भन्नाट उठून दिसतो. रेसरला शार्क फिन अँटेना आणि मागील स्पॉयलर या कारमध्ये दिले गेले आहेत.

अल्ट्रोझ रेसर आतील फीचर्स

टाटा अल्ट्रोझ रेसर च्या आतल्या बाजूला ऍडवान्सड फिचर मध्ये, 2-स्पोक स्टीयरिंग व्हील,टच आणि स्टाइल क्लाइमेट कंट्रोल पॅनेल याचसोबत इलेक्ट्रिक सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा,सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस चार्जर, HUD (Head-up display), सात-इंच डिजिटल क्लस्टर, कॉन्ट्रास्ट ऑरेंज स्टिचिंग, हेडरेस्ट्सवर ‘रेसर’ एम्बॉसिंग, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, मागच्या बाजूस एसी व्हेंट्स आणि ॲम्बियंट लाइटिंग यांचा समावेश आहे.

वाचा: Kinetic Luna Electric: चल मेरी लुना! ₹५०० रुपयांत बुक करा ई-लुना, किंमत फक्त

टाटा अल्ट्रोझ रेसरचे इंजिन

नाव रेसर असल्याने टाटा अल्ट्रोझ रेसरला प्रचंड शक्तिशाली इंजिन मिळालं आहे; हे इंजिन 1.2-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे, ज्याची 120Ps पॉवर आणि 170Nm टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स या कारमध्ये मिळतात.

पण याच तुलनेत टाटा Altroz च्या इंजिन बद्दल माहिती द्यायची झाल्यास, Altroz मध्ये 1.2-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन दिल गेलं आहे ज्याची 110Ps पॉवर आणि 140Nm टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. शिवाय अल्ट्रोझमध्ये 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळतात.

टाटा अल्ट्रोझ रेसर किंमत

टाटा अल्ट्रोझ रेसर ची लांबी 3,990 मिमी, रुंदी 1,755 मिमी , उंची 1,523 मिमी आणि व्हीलबेस 2,501 मिमी इतका आहे. अंदाजे 20 मार्च 2024 या दिवशी टाटा अल्ट्रोझ रेसर लॉन्च होण्याची अपेक्षा मांडली जातेय, सोबत या कारची अपेक्षित किंमत अंदाजे रु. 10 लाख रुपये असू शकते. या गाडीचा Hyundai i20 N Line प्रतिस्पर्धी असू शकतो.

टाटा अल्ट्रोझ रेसर Vs ह्युंदाई i20 N-Line

टाटाच्या अल्ट्रॉस रेसर ची तुलना करायला गेलं तर टाटा अल्ट्रोझ रेसरची उंची १८ मिमीने Hyundai i20 N लाइन पेक्षा जास्त आहे, तसेच टाटाच्या अल्ट्रॉस रेसर 1.2-लिटर, तीन-सिलेंडर टर्बो-पेट्रोल इंजिन आहे, त्याच तुलनेत 1-लिटर, तीन-सिलेंडर टर्बो-पेट्रोल Hyundai i20 मध्ये मिळतं, मात्र Hyundai i20 N लाइन मध्ये टॉर्क जनरेट करण्याची क्षमता 172Nm इतका आहे,जो टाटाच्या या कारपेक्षा जास्त आहे.

Hyundai i20 N लाइनमध्ये टाटा अल्ट्रोझ रेसर तुलनेत अजून काही अशी वैशिष्ठे आहेत; जसं इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC), चामड्याने गुंडाळलेले स्टीयरिंग व्हील आणि गियर नॉब,मागील डिस्क ब्रेक आणि डिजीटाइज्ड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 
Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment