‘बिझिनेसवाल्यांची स्कूटर’ ओलाची नवीन स्कुटर मिळणार फक्त B2B साठी, काय आहे हे B2B?

इलेक्ट्रिक स्कुटर च्या सेगमेंट मध्ये ‘ओला इलेक्ट्रिक स्कुटर’ चं नाव टॉप 10 मध्ये आवर्जून घेतलं जातं, आणि आता पुन्हा सगळीकडे चर्चा होतेय, नुकतीच ओला च्या नवीन इलेक्ट्रिक स्कुटर शी निगडित एक महत्वाची बातमी बाहेर पडली आहे; ती म्हणजे ओला इलेक्ट्रिकची नवीन स्कुटर लॉन्च होण्याच्या मार्गावर आहे, जी single-seater असणार आहे; शिवाय हि नवीन e-स्कुटर फक्त B2B असणार आहे, म्हणजेच हि स्कुटर खाजगी वापरापेक्षा व्यावसायिक क्षेत्रात लोंग रेंज मिळवण्यासाठी जास्त वापरली जाणार आहे.

ओला B2B इलेक्ट्रिक स्कूटर तपशील

२०२५ पर्यंत लॉन्च होणाऱ्या ओला commercial इलेक्ट्रिक स्कुटर च्या पेटंट बद्दल काही माहिती बाहेर पडली आहे. ओला ई-स्कुटर ‘Business साठी होणारा’ वापर हा दृष्टीकोन समोर ठेऊनच बनल्याने या इलेक्ट्रिक स्कुटरला आकर्षक लुक, हट्टीकट्टी बॉडी आणि long range सारखे अनेक फीचर्स, या स्कुटर ला मिळणार आहेत.

वाचा: Download Hyundai Creta 2024 Facelift Brochure PDF

B2B ओला इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये नवीन काय मिळणार?

मोठ्यात-मोठे वजन उचण्याची क्षमता या स्कुटर ला मिळावी आणि ह्या वजनासोबत स्कुटरने लांबचा पल्ला गाठावा अश्या प्रकारे ह्या ओला इलेक्ट्रिक स्कुटरची रचना अशी केली आहे, खास व्यावसायिक कामासाठी बनवलेल्या आगामी ई-स्कूटर मध्ये टेलिस्कोपिक सस्पेंशन आणि मागील बाजूस कन्वेशनल शॉक अब्जोर्बर दिले गेले आहेत.  फ्रंट फेअरिंग, वाईड फ्लोअरबोर्ड,बेअर बोन चेसिस अंडरपिनिंग, सिम्पल हेडलाइट, मोठी चाके जी S1 Air आणि S1 सारखी आहेत आणि ड्रम ब्रेक दिले गेले आहेत. फ्रंट फेअरिंग आणि स्मॉल फ्रंट फैरींग सोबत एक्सपोज्ड हँडलबार मिळत आहे. ओलाच्या इतर स्कुटर मध्ये तुम्हाला ड्राइवर ला लागूनच मागच्या प्रवाश्यासाठी सीट ऑफर केली जाते पण हि आगामी ई-स्कूटर सिंगल-सीटर आहे, मागच्या सीट ऐवजी रॅकला replace करण्यात आला आहे. 

वाचा: ‘छोटा पॅकेज- बडा धमाका’ 300 km पेक्षा जास्त रेंज देणारी ‘स्वस्त इलेक्ट्रिक नॅनो’

ओला B2B इलेक्ट्रिक स्कूटर बॅटरी

ओला electric च्या नव्या स्कुटरमध्ये बॅटरीची जागा पुढच्या सीटखाली देण्यात आली आहे, व्यवसायामध्ये होणाऱ्या continue वापरामुळे आणि वेळेची बचत होण्यासाठी ह्या स्कुटरच्या हब-माउंट केलेल्या इलेक्ट्रिक मोटरसाठी विद्यमान बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो किंवा ह्या स्कुटरची बॅटरी स्वॅपेबल म्हणजे काढ-घालीची असण्याची शक्यता आहे.

ओला B2B ई-स्कूटर किंमत

या electric स्कुटर बाबतीतली जास्त माहिती जसं, इलेक्ट्रिक फीचर्स, इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये उपलब्ध होणारे रंग, अचूक बॅटरी अथवा अचूक मोटर, मिळणारी अचूक रेंज तूर्तास तरी बाहेर पडली नसली व्यवसायासाठी बनवलेली स्कुटर कमी खर्चिक असू शकते, अंदाजे 89,999 रुपये एक्स-शोरूम इतकी या स्कुटरची किंमत असण्याची शक्यता आहे.

B2B EV म्हणजे काय?

B2B फुल फॉर्म बिझनेस-टू-बिझनेस असा आहे, याचा अर्थ भिन्न व्यवसायात व्यवसायिकांनी एकमेकाना केलेला देवाणघेवाणीचा व्यवहार, नवीन ओला इलेक्ट्रिक स्कूटर B2B असणार याचाच अर्थ, हि स्कुटर केवळ व्यावसायिक वापरासाठी म्हणजेच business purpose साठी जास्त प्रमाणात विकली जाणार आहे. याआधी Gogoro ने सुद्धा B2B साठी इलेक्ट्रिक स्कूटर बनवून त्यांची विक्री केली होती. डॉमिनोझ सारख्या बड्या उद्योगक्षेत्रात सुद्धा इलेक्ट्रिक स्कुटर यांचा वापर B2B साठी वापरला आहे. डॉमिनोजचे तयार होणारे उत्पादन लोकांपर्यंत पुरवण्यासाठी इलेक्ट्रिक स्कुटरचा वापर झाला आहे. अश्या इलेक्ट्रिक स्कुटर्सना game- changer म्हणून ओळखलं जात, कारण बिझनेस मध्ये इंधन वाहनाच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनाचा, इलेक्ट्रिक स्कुटर्सचा वापर केला तो तो व्यवसाय आर्थिकदृष्टया अधिक फायदेशीर ठरण्याचे चान्सेस जास्त असतात.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment