Domino’s fastest delivery : सर्वांच्या आवडीचं डॉमिनोझ पुन्हा एकदा नव्याने चर्चेत आलंय, तेपण त्यांच्या टेस्टी पिझ्झा साठी नव्हे तर त्यांच्या नव्या ‘पिझ्झा डिलिव्हर करणाऱ्या बाईकसाठी…!’ बऱ्याच जणांच्या तक्रारी असतात कि, डॉमिनोझ कडून होम-डिलीव्हरी मागितली, कि ‘पिझ्झा हा गार खायला मिळतो’. काही लोक पिझ्झा मागवतानासुद्धा ‘Dominoes near me‘ असं सर्च करतात, कारण लवकरात-लवकर गरम पिझ्झा खायला मिळवा म्हणून, पण आता असं दिसतंय कि, डॉमिनोझने फुडी लोकांची हि तक्रार मनावर घेऊन ह्या खवय्यांना ‘पिझ्झा अगदी, त्याच्या घरात गरम-गरमच सर्व्ह केला जाईल, अशी Domino’s fastest delivery बाईक’ आणली आहे, हि बाईक ‘dxb बाईक’ म्हणून ओळखली जाते. ह्या बाइकबद्दलची संपूर्ण माहिती म्हणजे ह्या बाईकचे फीचर्स ,ज्यामुळे तुमची pizza delivery किती फास्ट होऊ शकते ते बाईक ची बॅटरी, चार्जिंग व्यवस्था सगळी माहिती खालील लेखात. Domino’s dxb e-bikes for fastest delivery
Domino’s dxb e-bikes: फीचर्स
बऱ्याच वेळा लोक स्टोअर मध्ये जाऊन पिझ्झा खाण्यापेक्षा घरात ऑनलाईन पिझ्झा ऑर्डर करून खाणं, यालाच प्राधान्य देतात. आणि यामुळेच डॉमिनोझने पिझ्झा होम डेलिव्हरी हा पर्याय आवडीने स्वीकारला. पण शहरी भागात पिझ्झाप्रेमींच्या ऑर्डर डिलिव्हरी करण्याच्या तुलनेत शहरापेक्षा लांब असणाऱ्या भागात गरम आणि फ्रेश पिझ्झाची डिलिव्हरी कारण डॉमिनोज ला अवघड जायला लागलं. पिझ्झा ऑर्डर तर ठरलेल्या ठिकाणी पोहोचायचीच पण पिझ्झा मात्र तोपर्यंत गार व्हायचा. म्हणूनच डॉमिनोसने ह्या dxb e-bikes आणलं, ह्या बाइकच्या मागच्या बाजूला फॅन-फोर्स्ड पिझ्झा ओव्हन आहे, ज्यामुळे पिझ्झा तुम्ही ऑर्डर केलेल्या ठिकाणापर्यंत गरम,फ्रेश आणि चीझी सर्व्ह केला जाईल. बाईकला सस्पेन्शन असे मिळाले आहेत कि,रोड कितीही खराब असला, तरी तुमच्या पिझ्झाचे टॉपिंग्स अथवा चीझ जागचं हलणार नाही, ह्या सस्पेन्शनला ‘स्पेस-एज-सस्पेन्शन’ म्हणतात. सोबत ह्या बाइकमध्ये स्ट्रीट टायर, डाउनट्यूब-इंटिग्रेटेड बॅटरी दिली गेलेली आहे.
👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप
Domino’s ई-बाईक-Domino’s fastest delivery
ह्या ई-बाईकच स्ट्रक्चर सांगायचं झालं तर यामध्ये of insulated soft-sided cargo areas म्हणजेच डोमिनोजच्या हीटवेव्ह बॅग, पेये, बाजू आणि डिपिंग कप या गोष्टी ठेवण्याची जागा,सोबत अगदी मोठे १२ पिझ्झा एकावेळी मावतील इतकी जागा मिळतेय. ह्या बाईक एका चार्जमध्ये 40-65 किमी इतकं मायलेज देऊ शकतात. Domino’s dxb e-bikes for fastest delivery
VIP Number Plate:वाहनासाठी फॅन्सी व्हीआयपी क्रमांक कसा मिळवायचा
‘टॉप 5’ इलेक्ट्रिक स्कूटर तुम्ही भारतात ‘विना लायसेन्स’ चालवू शकता (License-free scooters)