VIP Fancy Number Plate: तुमच्या वाहनासाठी ‘फॅन्सी नंबर प्लेट 4444 नंबर प्लेट,1111 नंबर प्लेट,VIP नंबर,1 नंबर प्लेट किंवा 007 नंबर प्लेट ‘ कशी मिळवायची? त्याचे किती पैसे आकारले जातात? याची संपूर्ण माहिती खालील लेखात देत आहे.VIP Fancy Number Plate
गाडीची नंबर प्लेट म्हणजे गाडीची ओळख असते, थोडक्यात तुम्हाला जसे समाजात नावाने ओळखतात तसंच गाडीला सुद्धा असणाऱ्या नंबरने ओळखलं जात. आणि हा गाडीचा असणारा नंबर काही आपल्याला आवडेल किंवा आकर्षक असेल असा स्वतःहून काही निवडता येत नाही, भारतीय नियमाप्रमाणे गाडीचा असणारा नंबर हा केवळ आरटीओ कडूनच मिळवला जातो जो ठराविक चार अंकाचा असतो.तो ठराविक अंक मिळवण्यासाठी काही नियमात होणारी प्रक्रिया असते.
कार/बाईकसाठी फॅन्सी व्हीआयपी क्रमांक कसा मिळवायचा?
२०२३ सालात बरेच हौशी मंडळी स्वतःच्या आवडीनुसार, लकी नंबर-लकी साल या अंकांना प्राधान्य देत, तो अंक अथवा नंबर स्वतःच्या गाडीला देतात,आणि हा अंक- नंबर स्वतःहून असा देता येत नाही, अथवा अश्या व्यक्तींना कायदेशीर कारवाईतून जावे लागते.मग ज्यांना स्वतःच्या आवडीनुसार वाहनाच्या नंबरप्लेटला VIP Fancy Number Plate अंक द्यायचा आहे, त्यांनी कायदेशीर प्रोसेस पूर्ण करायची आहे.
👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप
- सगळ्यात आधी तुम्हाला रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय म्हणजेच MoRTH च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन सार्वजनिक वापरकर्ता म्हणून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
- तुमचं अकाउंट sign up झाल्यावर,तुम्ही तुमची इच्छित फॅन्सी नंबर प्लेट निवडायची आहे.
- तुम्ही इच्छुक असलेल्या VIP नंबरसाठी अकाउंट रजिस्ट्रेशन म्हणजेच आवश्यक नोंदणी आणि बुकिंग फी भरायची आहे.
- नोंदणीपत्रात सांगितलेल्या प्रमाणे फी भरून ,तुम्हाला जो नंबर विकत घ्यायचा आहे, त्याची बोली लावण्यासाठी बोली प्रक्रियेत सहभागी व्हावं लागेल.
- बोली प्रक्रियाच्या लिलाव निकालानंतर तुम्ही लिलाव जिंकला, तर त्याच वेळी , उर्वरित शिल्लक रक्कम भरायची आहे.
- बोली प्रक्रिया लिलाव निकालानंतर जेव्हा तुम्ही बोली जिंकाल त्याचवेळी तुम्हाला सर्व थकबाकी रक्कम जमा करायचं आहे, त्यांनतर तुम्हाला एक वाटप पत्र मिळेल.
- काही कारणास्तव जर तुमची बोली तुमच्या बाजूने लागली नाही तर थकीत रक्कम जमा करावी लागेल.
फॅन्सी नंबर प्लेटसाठी नोंदणी आणि शुल्क-VIP Number Plates charges
स्वतःच्या आवडीनुसार वाहनाच्या नंबर प्लेटला अंक (VIP Fancy Number Plate) द्यायचा असल्यास, काही शुल्क म्हणजेच प्रोसेस फी आकारली जाते, आणि हि प्रोसेस फी प्रत्येक राज्यात वेगवेगळी आणि नॉन रिफंडेबल असू शकते. हि फी अंकांवर म्हणजेच नंबर प्लेट डिजिट वर अवलंबूनसुद्धा असते.