स्वस्तात मस्त आणि 150km पेक्षा अधिक रेंज देणारी ‘RV400 BRZ’, रिव्होल्टची बाईक टॉर्क क्रॅटोस वर पडणार भारी

Revolt RV400 BRZ : तुम्ही जर 150km पेक्षा अधिक रेंज देणाऱ्या आणि परवडणाऱ्या इलेक्ट्रिक बाईकच्या शोधात असाल तर, तुमच्यासाठी Revolt Motors- RV400 BRZ इलेक्ट्रिक बाइक हा पर्याय चांगला ठरू शकतो.

नुकताच Revolt Motors ने RV400 BRZ इलेक्ट्रिक मोटरसायकल लाँच केली आहे, जी Ather 450X , इलेक्ट्रिक TVS iQube आणि बजाज चेतक ला टक्कर देत, तुमच्यासाठी चांगला परफॉर्मेन्स, गरजेचे फीचर्स आणि उत्तम रेंज सादर करू शकते. चला जाणून घेऊया या इलेक्ट्रिक बाइक चे डिझाइन, वैशिष्ट्ये आणि किंमत

रिव्हॉल्ट आर ४०० बीआरझेड फीचर्स

RV400 BRZ च्या वैशिष्ट्यांच्या बाबतीत माहिती देता, या इलेक्ट्रिक आणि स्पोर्ट्स  बाइक मिड ड्राइव्ह प्रकारातुन आहे; मागील ब्रेक डिस्क आहे. बाइकमध्ये तुम्हाला डिजिटल डिस्प्ले इन्स्ट्रुमेंट कन्सोल मिळेल जिथे, डिजिटल वॉच, डिजिटल स्पीडोमीटर,डिजिटल ट्रिपमीटर, डिजिटल ओडोमीटर असेल. सोबत या डिस्प्ले मध्ये तुम्हाला रिअल टाइमटेम्परेचर ,बॅटरी लेव्हल ची सुद्धा माहिती मिळू शकणार आहे. साइड स्टँड सेन्सर आणि ब्रेकिंग कॉम्बिनेशन ब्रेकिंग सिस्टम (CBS) सारखे फिचर असणाऱ्या या बाइकमध्ये कमी किमतीमुळे स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीचा किंवा फोन ॲप कनेक्टिव्हिटी पर्याय टाळण्यात आला आहे.

इलेक्ट्रिकल्स फीचरमधून या बाइकमध्ये, एलईडी हेडलाइट,टेललाईट ,टर्न सिग्नल लॅम्प आणि लो बॅटरी इंडिकेटर मिळतात.

वाचा: हिरो मेवरिक 440: हंटर 350 ची छुट्टी करायला, हिरोची ‘क्रूझर बाईक’ लाँच

रिव्हॉल्ट आर ४०० बीआरझेड राइडिंग मोड आणि बॅटरी

रिव्हॉल्टच्या ही इलेक्ट्रिक बाइक इग्निशन लॉक-मेकॅनिकल की (चावी) वापरून पुश बटन स्टार्ट म्हणजे बटन दाबून स्टार्ट करता येत असून, या बाइकमध्ये मध्ये तीन मोड देण्यात आले आहेत; इको मोड ज्यामध्ये 150 किमी रेंज मिळते, नॉर्मल मोड ज्यामध्ये १०० किमी रेंज मिळते आणि स्पोर्ट मोड ज्यामध्ये 80 किमी किमी रेंज मिळते. थोडक्यात हि इलेक्ट्रिक बाईक एका चार्जमध्ये 80-150 किमी अंतर पार करते.

वाचा: i-phone सोबत आता ‘इलेक्ट्रिक सेल्फ-ड्रायव्हिंग कार’ बनवणार ऍपल कंपनी

या बाइकमध्ये 3.24kWh लिथियम-आयन बॅटरी दिली गेली आहे. जी पूर्ण चार्ज 4.5 तासात होते. बाईकची मोटर 3kW ची असून या बाइकमध्ये रीजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम देण्यात अली आहे.

RV400 चार्जिंग व्यवस्था

तुम्ही घरी चार्ज करण्यासोबत, तुम्ही हि स्कुटर चार्जिंग स्टेशनवर सुद्धा चार्ज करू शकता. चार्जिंग नेटवर्क , बॅटरी स्वॅपिंग नेटवर्क हे पर्याय तुम्हाला या स्कुटरमध्ये मिळतात. बाईकच्या पुढील बाजूस अपसाईड डाउन फोर्क त्याचसोबत मागील बाजूस अडजस्टेबल मोनोशॉक आहेत. अलॉय व्हील्स आणि ट्यूबलेस टायर या बाइकमध्ये मिळतात.

या बाईकची बॅटरी मोबाईल अँप्लिकेशनद्वारे हाताळता येते. मोबाईल अप्लिकेशनमध्ये चार्जिंग स्टेशन लोकेटरआणि कमी बॅटरी अलर्ट याचीसुद्धा माहिती मिळते. या इलेक्ट्रिक स्कुटरची बॅटरी वॉरंटी 75,000 किमीचा पल्ला स्कुटर गाठूपर्यंत अथवा 5 वर्षाची इतकी आहे. बाईकच्या चार्जरची वॉरंटी 2 वर्ष आहे.

RV400 च्या तुलनेत असं काय आहे RV400 BRZ मध्ये ?

Revolt ने भारतात Revolt RV400 इलेक्ट्रिक दुचाकी लॉन्च केली, जिची किंमत रु.1.17 ते रु. 1.32 लाख इतकी असून, या इलेक्ट्रिक बाईकचे 4 प्रकार आणि 11 रंग उपलब्ध आहे. 4.5 तासात चार्ज होणारी आणि 80 किमीचे टॉप स्पीड असणारी रिव्हॉल्ट RV400 एका चार्जमध्ये 80 किमी अंतर पार करू शकते.

त्याचतुलनेत, रिव्हॉल्ट RV400 BRZ हे Revolt RV400 चेच व्हर्जन असून या इलेक्ट्रिक स्कुटरची किंमत 1.17 लाख इतकी आहे या इलेक्ट्रिक बाईकमध्ये 5 रंग उपलब्ध आहेत. रिव्हॉल्ट RV400 एका चार्जमध्ये 80-150 km पर्यंत रेंज देऊ शकते.

रिव्हॉल्ट आर४०० बीआरझेड मध्ये गडद लुनार ग्रीन, कॉस्मिक ब्लॅक, डार्क सिल्व्हर, पॅसिफिक ब्लू, रिबेल रेड हे रंगाचे पर्याय उपलब्ध आहेत. Revolt RV400 BRZ ची किंमत 1.17 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. कमी किंमतीत हि इलेक्ट्रिक बाईक चांगले फीचर्स चांगली रेंज देत असल्याने तुमच्यासाठी हि इलेक्ट्रिक बाईक उत्तम पर्याय ठरू शकतो.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment