i-phone सोबत आता ‘इलेक्ट्रिक सेल्फ-ड्रायव्हिंग कार’ बनवणार ऍपल कंपनी

Apple self driving EV: मोबाईलच्या नामांकित कंपनी Apple ने जर मोबाईलसोबत, आता इलेक्ट्रिक कारची जाहिरात केली; तर अजिबात आश्चर्यचकित होऊ नका कारण, आता iphone सोबत ऍपल कंपनी स्वतःच्या इलेक्ट्रिक वाहन (EV) ला घेऊन इलेक्ट्रिक वाहन उद्योगात प्रवेश करत आहेत. ही कार ‘self driving cars’ असून Xiaomi, Sony, Huawei या नामांकित कंपन्यांनी मोबाइलसोबत इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत प्रवेश करण्याच्या यादीत हजेरी लावली असताना, आता लोकप्रिय ऍपल सुद्धा iPhone, Watch, iPad, TV, iOS, macOS, AirTag नंतर स्वतःची नवीन ‘Apple EV car’ मार्केटमध्ये आणून लोकांना वेडं करणार आहे, यात काही शंकाच नाही.

ऍपल ईव्ही- ऍपल इलेक्ट्रिक कार

आयफोन सिरी द्वारे होणार इलेक्ट्रिक ऍपल कारची कामे

याआधी Siri फक्त तुमच्यासाठी काम करायची, जसं की दैनंदिन कामे पूर्ण करणे किंवा महत्त्वाचे टायमर सेट पण भविष्यात तुम्ही चक्क ह्याच आयफोन सिरी कडून तुमची ईव्ही पार्क करून घेऊ शकता किंवा तुमची कार कुठे पार्क आहे, ह्याची चौकशी करू शकता.

वाचा : Hero Xtreme 125R: एकदा पेट्रोल टाकले की 660 किमी चालते किंमत फक्त 95 हजार

ऍपल इलेक्ट्रिक सेल्फ-ड्रायव्हिंग कार

हि कार इलेक्ट्रिक सेल्फ-ड्रायव्हिंग कार असून, युसर्सना कारमार्फत नवी सुविधा आणि नवे फीचर्स देण्यासाठी ‘इलेक्ट्रिक सेल्फ-ड्रायव्हिंग कार’ वर काम करत आहे. या कारमध्ये एक खास ऑपरेटिंग सिस्टम तयार करण्यात आली आहे, जिचं नाव ‘कस्टम-मेड carOS’ म्हणत जातं, शिवाय Apple सेल्फ-ड्रायव्हिंग कार, हि लेव्हल 2+ सिस्टिम ने ऑपरेट केली जाणार आहे, ‘लेव्हल 2+ सिस्टिम’ म्हणजे ‘ऑटोनॉमस लेन सेंटरिंग आणि अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल’ या दोन्ही गोष्टी वापरकर्ता एकाच वेळी वापरू शकणार आहे.

Apple EV कार कधी येईल?

या ब्रँडची हि कार इलेक्ट्रिक सेल्फ-ड्रायव्हिंग कार वर 2014 पासून केलं जातंय, नवनवीन बदल आणि फीचर्स साकारत हि कार 2025 मध्ये बाजारात येऊ शकते.

वाचा : TATA Nexon सोबत वाढली, टाटाच्या ‘या’ टॉप गाड्यांची किंमत

ऍपल ईव्ही फॅक्टरी बनणार ‘या’ भागात

Apple EV factory तयार करण्यासाठी भारतामधल्या इलेक्ट्रिक वाहन (EV) तामिळनाडू ,महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश यासारख्या प्रदेशांचा विचार केला जातोय. ऑटो मॅन्युफॅक्चरिंग हब असणाऱ्या प्रदेशांमध्ये EV factory बनवण्यास अधिक प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे.

ऍपलची उत्पादने ज्यांनी जग बदलले

या लोकप्रिय आणि नामांकित ब्रँडचे प्रॉडक्ट्स आणि वापरकर्ते यांची संख्या अनगिणत आहे; हे काही नव्याने सांगायची गरज नाहीये. या ब्रँडच्या लोकप्रिय प्रोडक्टसमध्ये मॅक, आयपॅड, आयफोन, वेअरेबल्स,एअरपॉड्स, होम ऍक्सेसरीज  समावेश आहे.

ऍपलचे टॉप १० प्रॉडक्ट्स

Apple EV ची जशी आता चर्चा होत आहे, त्याचप्रमाणे इतरही काही या ब्रँडचे प्रोडक्टस आहेत; जे चर्चेत आणि प्रसिद्ध आहेत.

  1. आयफोन 15 सिरीज
  2. आयफोन 14 सिरीज
  3. मॅकबुक एअर 2022
  4. मॅकबुक प्रो 16-इंच 2023
  5. आयपॅड प्रो 6 वी जनरेशन
  6. आयपॅड एअर 2022
  7. ऍपल वॉच सिरीज 6
  8. ऍपल वॉच सिरीज 9
  9. एअरपॉड्स प्रो 2
  10. ऍपल एअरपॉड्स मॅक्स

वाचा : ‘या’ कंपनीची इलेक्ट्रिक स्कुटर पेटल्याने ग्राहकाला मिळणार १४ लाख नुकसान-भरपाई

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment