Hero Xtreme 125R: एकदा पेट्रोल टाकले की 660 किमी चालते किंमत फक्त 95 हजार

Hero Xtreme 125R Price – नवीन 125cc इंजिनद्वारे प्रणालीने सुसज्ज, सर्व-एलईडी लँप्स आणि दोन मॉडेल्स मध्ये उपलब्ध आहे. Hero Xtreme 125R या कम्यूटर बाईक मध्ये कंपनीने अनेक फीचर्स जोडले आहेत जे सेग्मेंटमध्ये प्रथम आहेत. याशिवाय hr दावा आहे की, इंजिन स्मूथ, रिस्पॉन्सिव आणि इंस्टेंट टॉर्क निर्माण करते. गाडीत ख़ास इंजन बालन्सर तंत्रज्ञान (EBT) दिले आहे.

ऑनलाईन इमेज लीक झाल्यानंतर हिरो मोटो कॉर्प ने नवीन जनरेशन Xtreme 125R भारतीयांसाठी फक्त 95 हजारां च्या किंमतीत लाँच केली आहे. नवीन एक्स्ट्रिम 125R ची फॅक्टरी किंमत कंपनीच्या इतर 125 सीसी बाईक प्रमाणे Rs 95,000-99,500 दरम्यान आहे. परंतु Xtreme 125R प्रिमिअम आणि जबरदस्त स्पोर्टी आहे. गाडीत किमती मध्ये फरक ठेवण्याकरिता ABS ब्रेक्स ऑप्शन दिला आहे. गाडीच्या टॉप मॉडेल मध्ये single-channel ABS आणि LED लाईटनिंग असे फीचर्स दिले आहेत.

37 एमएम टेलिस्कोपिक फोर्क आणि प्रीलोड-अॅडजस्टेबल मोनोशॉक ने सुसज्ज नवीन Xtreme 125R मध्ये डायमंड फ्रेम दिली आहे. पाठीमागच्या चाकाला ड्रम ब्रेक आणि पुढे 276 मिमी फ्रंट डिस्क दिले आहेत. ब्लू, रेड आणि ब्लैक असे तीन कलर ऑप्शन दोन्ही मॉडेल्स मध्ये देण्यात आले आहेत.

Hero Xtreme 125R: जबरदस्त मायलेज

Xtreme 125R बाईक मध्ये नवीन all-new air-cooled,125cc, सिंगल सिलेंडर इंजिन दिले जाईल जे सरकारच्या नवीन इमिशन नॉर्मला पूर्णं करेल. हे इंजिन11.4BHP @ 8250 RPM आणि 10.5NM @ 6000 RPM इतकी जबरदस्त पॉवर निर्माण करते. हिरो एक्सट्रिम 125 आर मध्ये 66 किलोमिटर प्रती लिटर इतके मायलेज क्लेम केले आहे. 10 लिटर पेट्रोल टैंक या गाडीत देण्यात येईल, म्हणजे एकदा टाकी फूल केली की ही बाईक 660 किमीचा प्रवास करेल.

वाचा – ‘या’ कंपनीची इलेक्ट्रिक स्कुटर पेटल्याने ग्राहकाला मिळणार १४ लाख नुकसान-भरपाई

Hero Xtreme 125R: प्राईज आणि डिलीवरी

हिरो एक्सट्रिम 125 आर ग्राहकांसाठी 20 फेब्रुवारी 2024 पासून डीलर कडे उपलब्ध होणार आहे. एक्सट्रिम 125 आर IBS ब्रेक्स आणि ABS ब्रेक्स (रु. 99,50) या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये IBS ची एक्स शोरुम किंमत रु.95,000 आणि टॉप मॉडेल ABS ची एक्स शोरुम किंमत रु.99,500 आहे. Xtreme 125R ची किंमत बजाज पल्सर NS125 आणि TVS Raider NS12 पेक्षा कमी आहे पण होंडा SP125 पेक्षा जास्त आहे.

Bike Price in Maharashtra:

व्हेरिएंटकिमती (एक्स-शोरूम)
Xtreme 125R IBS95,000 रुपये
Xtreme 125R ABS99,500 रुपये

 

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment