‘या’ कंपनीची इलेक्ट्रिक स्कुटर पेटल्याने ग्राहकाला मिळणार १४ लाख नुकसान-भरपाई

बेनलिंग इंडिया इलेक्ट्रिक स्कूटर आग प्रकरण: इव्ही स्कुटरला अचानक आग लागणं हि गोष्ट आता काही नवी नाहीये, तरीही आता एका इव्ही आगीच्या चर्चेला उधाण आले आहे, ज्यात चीन निर्मिती असणारी बेनलिंग कंपनीची स्कुटर भारतातील तेलंगणा इथं पेटली, आणि ह्यात चर्चेचा मुद्दा हा कि, या ‘इ-स्कुटर डीलरला चक्क रु. 10 लाखाची नुकसानभरपाई रक्कम देण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत.’

इलेक्ट्रिक स्कूटर

नक्की कशामुळे लागली बेनलिंग इंडिया इलेक्ट्रिक स्कूटरला आग?

बेनलिंग कंपनी हि मूळची चीनची असून भारतामध्ये बेनलिंग इंडिया ही बेनलिंगची उपकंपनी आहे . बेनलिंग ई-स्कूटरला गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये बॅटरीचा स्फोट झाला होता, ज्यात हि स्कुटर संपूर्ण जाळून खाक झाली म्हणून जळालेल्या इ-स्कुटरच्या मालकाने या इव्हीच्या डीलरला आणि बेनलिंग इंडिया कंपनीला इलेक्ट्रिक स्कूटर बदलण्यास सांगितले आणि जर ते शक्य नसल्यास स्कूटरची खरेदी किंमत आणि वर्षाला 18% व्याजासोबत परत करण्याची मागणी केली, मात्र मूळ कंपनीसोबत डिलरनेही या प्रकरणावर लक्ष न घातल्याने आणि बॅटरीचा स्फोट होण्याची कारण जाणून न घेतल्याने ग्राहक आयोगा तेलंगणा यांनी इव्हीच्या डीलरला आणि बेनलिंग इंडिया कंपनीला 10 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.

वाचा: ‘5 गॅरेंटेड टिप्स’ ज्यामुळे वाढेल, तुमच्या इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज

पीडितांसाठी ग्राहक कायद्याच्या कलम 84 ते 86 अंतर्गत दावा

ग्राहक कायद्याच्या कलम 84 ते 86 अंतर्गत दावा एखाद्या उत्पादनामध्ये उत्पादन दोष आहे, उत्पादन एक्सप्रेस वॉरंटीशी बनवली गेली नसेल अथवा उत्पादन वापरताना हानी न होण्याची काळजी सूचना अथवा माहिती दिली नसल्यास तक्रारदारी त्या उत्पादनासाठी मूळ मालकाला जबाबदार ठरवू शकतो.

वाचा: Hyundai Creta 2024: क्रेटाच्या सर्व मॉडेल्सच्या महाराष्ट्रातील ऑन रोड किमती, संपूर्ण लिस्ट

१४ लाखात महाग पडली चीनची बेनलिंग कंपनी स्कुटर

तामिळनाडू आयोगाने बेनलिंग इंडिया आणि डीलरला स्कूटर बदलण्याचा किंवा नुकसानभरपाई म्हणून 10 लाख रुपये आणि  खटल्याच्या खर्चासाठी 10,000 रु. भरण्याचा आदेश देऊनही उत्पादकाने या प्रकारांची काळजीपूर्वक जबाबदारी घेतली नाहीये, परिणामी हे प्रकरण लांबत जाऊ शकण्याची शक्यता मांडली जातेय.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment