Hyundai Creta 2024: क्रेटाच्या सर्व मॉडेल्सच्या महाराष्ट्रातील ऑन रोड किमती, संपूर्ण लिस्ट

Hyundai Creta 2024 Facelift On Road Prices in Maharashtra – नुकतीच ह्युंदाई कंपनीने त्यांची कॉम्पॅक्ट एसयूव्ही, क्रेटाचे नवीन व्हर्जन लाँच केले आहे. या नवीन गाडीच्या किंमती ११ लाख रुपयां पासून सुरु होतात. या लेखात जाणून घेऊया ह्युंदाई क्रेटा २०२४ च्या महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, लातूर, बीड, नागपूर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, मुंबई, सोलापूर, बारामती किंवा इतर या शहरांतीलसर्व मॉडेल्सच्या ऑन रोड किमती.

Hyundai Creta 2024 – ऑन रोड किमती

व्हेरिएंट ट्रिमएक्स-शोरूम प्राईजऑन रोड प्राईज
पेट्रोल मॉडल
1.5 MPi MT – E₹10,99,900₹13,23,034
1.5 MPi MT – EX₹12,17,700₹14,60,034
1.5 MPi MT – S₹13,39,200₹16,01,339
1.5 MPi MT – S(O)₹14,32,400₹17,09,732
1.5 MPi iVT – S(O)₹15,82,400₹18,84,182
1.5 MPi MT – SX₹15,26,900₹18,19,635
1.5 MPi MT – SX DT₹15,41,900₹18,37,080
1.5 MPi MT – SX TECH₹15,94,900₹18,99,663
1.5 MPi MT – SX TECH DT₹16,09,900₹19,17,108
1.5 MPi iVT – SX TECH₹17,44,900₹20,74,114
1.5 MPi iVT – SX TECH DT₹17,59,900₹20,91,559
1.5 MPi MT – SX(O)₹17,23,800₹20,49,574
1.5 MPi MT – SX(O) DT₹17,38,800₹20,67,019
1.5 MPi iVT – SX(O)₹18,69,800₹22,19,373
1.5 MPi iVT – SX(O) DT₹18,84,800₹22,36,818
1.5 TURBO DCT SX(O)₹19,99,900₹23,70,679
1.5 TURBO DCT SX(O) DT₹20,14,900₹24,08,676
डिझेल मॉडल
1.5 CRDi MT – E₹12,44,900₹15,20,251
1.5 CRDi MT – EX₹13,67,700₹16,65,573
1.5 CRDi MT – S₹14,89,200₹18,09,356
1.5 CRDi MT – S(O)₹15,82,400₹19,19,649
1.5 CRDi AT – S(O)₹17,32,400₹20,98,339
1.5 CRDi MT – SX TECH₹17,44,900₹21,13,132
1.5 CRDi MT – SX TECH DT₹17,59,900₹21,30,883
1.5 CRDi MT – SX(O)₹18,73,900₹22,65,790
1.5 CRDi MT – SX(O) DT₹18,88,900₹22,63,541
1.5 CRDi AT – SX(O)₹19,99,900₹24,14,899
1.5 CRDi AT – SX(O) DT₹20,14,900₹24,53,202

 

नोट – सदर किमती प्रत्येक शहरात बदलू शकतात.

वाचा – पहा किया सॉनेट २०२४ च्या महाराष्ट्रातील सर्व व्हेरिएंट्सच्या ऑन रोड प्राईज

फिचर्स

गाडीमध्ये ४३३ लिटर” इतका बूट स्पेस दिला जातो. स्टोरेज वाढवण्यासाठी ६०-४० स्प्लिट सीट्स दिले जातात. टायर इथे २१५/६० R १७ इंच दिलेले आहेत. खालच्या ट्रीम्स मध्ये १६ इंच दिले जातात. फ्रंट बंपरवर ४ अल्ट्रासॉनिक पार्किंग सेन्सर्स दिले आहेत. रडार बेस कॅमेरा दिला असल्याने स्किड प्लेटच्या वर रडार दिला आहे, रडारला कॅमेरा सपोर्ट देखील आहे तो फ्रंट विंड शीएल्ड वर दिला जातो. ग्राऊंड क्लिअरन्स १९० एमएम दिला आहे. गाडीमध्ये ४ स्पोक डी कट स्टेरिंग दिले आहे ज्याला लेदर रैप केलेले आहे. स्टेरिंग वर-खाली, आत-बाहेर एडजस्ट करता येते. ड्रायव्हर सिट ८ वे एडजस्ट होते. गाडीमध्ये ऍडास लेव्हल २ ऍडासचे १९ स्मार्ट सेन्स सेफ्टी फिचर आल्याने ड्रायव्हरचा ताण कमी होणार आणि तुमचा प्रवास सुखकर होणार आहे. इंस्ट्रूमेंट डिस्प्ले १०.२५ इंच साईज चा दिला आहे. १इन्फोटेन्मेंट १०.२५ इंच डिस्प्ले दिला आहे, हा डिस्प्ले आणि क्लस्टर डिस्प्ले Integrated आहेत ज्यामुळे लुक वाईज जबरदस्त वाटते. इन्फोटमनेत डिस्प्ले च्या माध्यमातून मनोरंजना व्यतिरिक्त ७० प्लस ब्लू लिंक फिचर्स दिले आहेत. इन बिल्ट नॅविगेशन आणि जिओ सावन दिले आहे. यात भारतीय भाषेंचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. वायरलेस चार्जिंग पैड क्रेटा मध्ये दिले आहे.

इंजिन पॉवरट्रेन

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट मध्ये २ पेट्रोल इंजिन ऑप्शन्स आणि १ डिझेल इंजिन ऑप्शन दिलेला आहे. दोन्ही इंजिनसोबत ५ ट्रांसमिशन ऑप्शन्स दिले गेले आहेत. क्रेटा सोबत १.५ लिटर नॅचूरली अस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिले जाते ज्यामध्ये ६ स्पीड मैन्युअल आणि iVT गियरबॉक्स दिला असेल. दुसरे पेट्रोल इंजिन, १.५ लिटर टर्बो GDI इंजिन ज्यामध्ये ७ स्पीड DCT गियरबॉक्स दिले जाईल. तिसरे १.५ लिटर CRDi डिझेल इंजिन दिले जाईल ज्यामध्ये ६ स्पीड ऑटोमैटिक आणि ६ स्पीड मैन्युअल असे दोन गियरबॉक्स ऑप्शन मिळतील.

 

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment