हिरो मेवरिक 440: हंटर 350 ची छुट्टी करायला, हिरोची ‘क्रूझर बाईक’ लाँच

HERO MAVERICK 440 हिरो मोटोकॉर्प ची बहुचर्चित बाईक हिरो मेवरिक 440 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या HERO MAVERICK 440 बाईकला सगळ्यात पॉवरफुल आणि आकर्षक मानलं जातंय कारण, ही क्रूझर बाईक थेट रॉयल एनफील्ड शी स्पर्धा करते. चला जाणून घेऊया ह्या बाईकचे वेरिएंट्स, डिझाइन आणि इंजिनची माहिती

हिरो मेवरिक 440

Harley-Davidson X440 ची इनस्पायर्ड असणारी, हिरो मेवरिक 440 चे Hero World 2024 मध्ये अनावरण करण्यात आलं असून; या बाईकला रोडस्टर डिझाइन मिळाली आहे. या स्पोर्टी बाईकमध्ये स्पोक्ड व्हील्स, मिड आणि टॉप व्हेरियंट उपलब्ध आहेत, टॉप आणि मिड प्रकारामध्ये स्टायलिश अलॉय आणि मशीन अलॉय-व्हील दिले गेले आहेत.

वाचा: Hero Xtreme 125R: एकदा पेट्रोल टाकले की 660 किमी चालते किंमत फक्त 95 हजार

HERO MAVERICK 440: फिचर्स

बाईकच्या फिचर्सची माहिती देता, बाईक डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये डिजिटल टॅकोमीटर, स्पीडोमीटर,ट्रिपमीटर,ओडोमीटर, गियर पोझिशन इंडिकेटर, रेमेनिंग रेंज आणि मायलेज इंडिकेटर, साइड स्टँड अलर्ट आणि निगेटिव्ह LCD इन्स्ट्रुमेंट कन्सोल दिला गेला आहे. इंटरेस्टिंग फिचर्समध्ये कॉल आणि एसएमएस अलर्ट, डिजिटल वॉच, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, इस्टिमेट टाईम अराइवल (ETA), डिस्टन्स, फोन बॅटरी इंडिकेटर, USB-C चार्जिंग पोर्ट,आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी यांचा समावेश आहे.

या बाईकचा प्लस पॉइंट हा आहे की, याला ‘ई-सिम कनेक्टिव्हिटी’ पर्याय मिळतो, ज्याद्वारे चालक बाईकमध्ये दिलेल्या 35 वैशिष्ट्ये रिमोट द्वारे ट्रॅक करू शकतो.

वाचा: टाटा मोटर्स बाजारात आणणार CNG ऑटोमॅटिक कार, वाचा वैशिष्ठ्य

Hero Mavrick 440: स्पेसिफिशन्स

या बाईकवर बसताना कमांडिंग असा फील येतो, शिवाय टैंक सुद्धा एकदम मस्क्युलर आहे. बाईकच्या आकारबंध सिनले पीस सिट सोबत Y आकाराचा शेप असणारे, साईड पॅनल्स मुळे बाईक आकर्षक दिसते. हिरो मेवरिक 440 मध्ये H-आकाराचा LED DRL, राउंड शेपचे एलईडी हेडलॅम्प असून, बाईकच्या मागच्या बाजूस म्हणजे टेल सेक्शनमध्ये मोठी आणि लांब लायसन्स प्लेट होल्डर दिली गेली आहे, जी हार्ले एक्स 440 च्या लायसन्स प्लेट होल्डरच्या तुलनेत मोठी आहे.

बाईकची पुढची चाके डिस्क ब्रेक असून या बाईकमधला क्लच मल्टी प्लेट, वेट टाइप, असिस्ट आणि स्लिपर सिंगल सिलेंडर असून बाईकमध्ये अधिक फिचरसाठी गियर शिफ्ट इंडिकेटर मिळतो. बाईकमध्ये चालकासोबत मागच्या प्रवाश्याला रायीड सुखकर होण्यासाठी पॅसेंजर फूटरेस्ट सुद्धा देण्यात आला आहे.

हिरो मेवरिक 440: डायमेंशन आणि कॅपसिटी

191 किलो वजन असणाऱ्या, Hero Mavrick 440 ची 868 मिमी- रुंदी, 2100 मिमी -लांबी आणि 1112 मिमी- उंची असून, या क्रूझर बाईकचा 175 मिमी इतका ग्राउंड क्लिअरन्स तर 1388 मिमी इतका व्हीलबेस आहे. सस्पेन्शनची माहिती देता; पुढचं सस्पेन्शन- टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क तर मगच सस्पेन्शन- हायड्रोलिक रियर ट्विन शॉक्स स्विंगआर्म माउंट दिलं आहे.

या Hero Mavrick 440 बाईकमध्ये चार रंग पर्याय मिळतात ज्यामध्ये – शूटिंग नाईट स्टार,मॅट स्लेट ब्लॅक, मॅट स्लेट ब्लॅक आणि पर्ल रेड यांचा समावेश आहे.

वाचा: Hero Xtreme 125R: एकदा पेट्रोल टाकले की 660 किमी चालते किंमत फक्त 95 हजार

हिरो मेवरिक 440 : इंजिन आणि ट्रान्समिशन

440 सीसी चे, एअर-ऑइल कूल्ड, SOHC इंजिन असणाऱ्या बाईकची इंधन क्षमता 13.5 लिटर आहे.  27.36 PS @ 6000 rpm इतकी कमाल पॉवर या इंजिनमधून जनरेट होते. या बाईकचा 6 स्पीड गियरबॉक्स असून, बाईक मैन्युअल ट्रांसमिसन आहे. इंजिन व्हील सोबत चेनने जोडली गेली आहे.

Mavrick 440 हे रॉयल एनफील्ड क्लासिक 350 ला टक्कर देणार

या बाईकच्या, बेस व्हेरियंटची किंमत 2 लाख रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता मांडली जातेय. मेवरिक 440 ही बाईक रॉयल एनफील्ड क्लासिक 350 , होंडा H’ness CB350, येझदी रोडस्टर, ट्रायम्फ स्पीड 40 ,जावा 42 शी स्पर्धा करू शकते.

या बाईकला फेब्रुवारी 2024 मध्ये लाँच केले जाणार असून फेब्रुवारीमध्ये या बाईकच्या किंमतीसुद्धा जाहीर केल्या जाणार आहेत. या बाईक च्या लाँचिंग नंतर बुकिंग सुरू होईल. Mavrick 440 -डिलीवरी साठी मात्र एप्रिल 2024 पर्यंत वाट बघावी लागू शकते.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment