EV Sales Report October 2023: वाचा कोणती कंपनी कितव्या स्थानावर

दसरा-नवरात्र यामुळे भारतीय बाजार पेठेत इलेकट्रीक स्कूटरचे मार्केट तेजीत असल्याचे पाहायला मिळाले पण गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी फेम २ सबसिडी कमी झाल्याने सेल कमी झाल्याचे पाहायला मिळाले. आज बघुयात अथर, ओला इलेकट्रीक, हिरो विदा, बजाज ऑटो आणि टीव्हीएस मोटर्सने ऑक्टोबर २०२३ या महिन्यात किती इलेक्ट्रिक स्कूटर्स विक्री केल्या आहेत.

ऑक्टोबर २०२३ ईव्ही स्कूटर सेल रिपोर्ट

Electric Scooter sales October 2023: Ola Ather, Bajaj, TVS & Hero vide

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ईव्ही स्कूटरच्या 77,200 पेक्षा जास्त युनिट्सची विक्री झाली होती, परंतु या ऑक्टोबर 2023 मध्ये इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री केवळ 74,000 युनिट्सच्या पुढे गेली आहे. सप्टेंबर महिन्यात एकूण 63,500 हून अधिक युनिट्सची विक्री झाली होती, मात्र सणानिमित्त ईव्ही स्कूटर्सच्या विक्रीत केवळ 17 टक्क्यांनी वाढ झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 7 ते 8 टक्क्यांनी घसरण झाली आहे.  टॉप 10 इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीची माहिती तुम्ही दर महिन्याला पहावी कारण ती तुम्हाला बाजाराची कल्पना देईल आणि तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर बाजाराच्या ट्रेंडनुसार घेऊ शकता.

10 वे स्थान: जॉय ई-बाईक

या कंपनीला वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स म्हणतात. जॉय कंपनीने सप्टेंबर महिन्यात 686 युनिट्सची विक्री केली आणि ऑक्टोबर महिन्यात 907 युनिट्सची विक्री केली, एकूण 221 युनिट अधिक.

वाचा – आयफोन पेक्षा स्वस्त असणारी Techo Electra Emerge इलेकट्रीक स्कूटर देते १०० किमी रेंज!

9 वे स्थान: LECTRIX EV PVT LTD

या कंपनीने सप्टेंबरमध्ये 735 युनिट्स आणि ऑक्टोबरमध्ये 1,877 युनिट्सची विक्री केली. ऑक्टोबर फेस्टिव्हलमध्ये एकूण 1,142 युनिट्सची विक्री झाली.

8 वे स्थान: BGAUSS ऑटो प्रायव्हेट लिमिटेड

आरआर केबल्स यांची BGAUSS चांगली वाढत आहेत. त्यांनी सप्टेंबरमध्ये 936 वाहने आणि ऑक्टोबरमध्ये 1,169 वाहनांची विक्री केली, जी गेल्या महिन्याच्या तुलनेत एकूण 233 युनिट्स अधिक आहे.

7 वे स्थान: ओकिनावा ऑटोटेक प्रायव्हेट लिमिटेड

हा ब्रँड कधीतरी टॉप 3 मध्ये होता आणि आजकाल खूपच तोट्यात आला आहे. फेम २ सबसिडी साठी बॅन केल्याने यांच्या स्कूटर्स महाग झाल्या, त्यामुळे सप्टेंबरमध्ये एकूण 1774 युनिट्स विकल्या गेल्या, परंतु फेस्टिव्ह सीझनमध्ये, ऑक्टोबर 2023 मध्ये, कंपनीने फक्त 1,474 युनिट्स विकल्या. 300 युनिटची विक्री कमी झाली आहे.

6 वे स्थान: हिरो विडा (Hero Vide V1 Pro Sale)

सहाव्या स्थानापासून वर तुम्ही कोणत्याही कंपनीची तुम्ही स्कूटर खरेदी करू शकता कारण, टॉप ६ मध्ये काही सर्वोत्तम कंपन्या आहेत. HERO VIDA ने सप्टेंबर 2023 मध्ये फक्त 530 युनिट्स विकल्या, परंतु ऑक्टोबर 2023 मध्ये 1,923 युनिट्स विकल्या, एकूण 1393 युनिट्स चा सेल वाढला आहे. हिरो विडा आता Flipkart वर देखील उपलब्ध आहे त्यामुळे नोव्हेंबर 2023 मध्ये दिवाळीत गाडीची विक्रीत तेजी घेईल अशी अपेक्षा आहे.

वाचा – ओला इलेकट्रीक स्कूटरला आग, कंपनीने काय दिल स्टेटमेंट वाचा

5 वे स्थान: ग्रीव्स इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड (Amepre Scooter sale)

ग्रीव्ह्स इलेक्ट्रिक मोबिलिटी अँपिअरने सप्टेंबर 2023 मध्ये 4135 युनिट्स आणि ऑक्टोबर 2023 मध्ये 4,525 युनिट्स विकल्या. गेल्या महिन्याच्या तुलनेत 390 अधिक युनिट्स विकल्या गेल्या.

4 थे स्थान: एथर एनर्जी प्रा. लि (Ather 450s – 450x Sale)

एथरने सप्टेंबर महिन्यात 7135 तर ऑक्टोबरमध्ये 8335 स्कूटर ची विक्री केली होती. सणासुदीच्या काळात संपूर्ण भारतात केवळ 1200 युनिट्सची ज्यादा विक्री झाली. याचा अर्थ येत्या काही दिवसांत सेलमध्ये कमी होण्याची शक्यता आहे. Ather कडे आता 3 मॉडेल्स उपलब्ध आहेत. बऱ्या पैकी सर्विस स्टेशन्स देखील आहेत परंतु विक्रीनंतरच्यामहाग पार्ट आन मेंटेनन्स यामुळे लोक Ather पासून दूर राहतात. फरक हा आहे की स्कूटर मजबूत आहे आणि अॅल्युमिनियम फ्रेम आहे. स्कूटर मजबूत आणि रिलायबल आहे परंतु इतरांच्या तुलनेत हि ईव्ही महाग आहे. कंपनीचे आणखी एक मॉडेल लवकरच बाजारात येत आहे.

3 रे स्थान: बजाज ऑटो लि (Bajaj Chetak Sale)

बजाजकडे सध्या फक्त एकच स्कूटर आहे आणि सप्टेंबर 2023 मध्ये 7087 युनिट्सची विक्री केली आणि ऑक्टोबर 2023 मध्ये त्याची सुमारे 9,838 युनिट्सची विक्री झाली. फरक असा आहे की गेल्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यात 2,751 युनिट्सची वाढ झाली आहे. ही कंपनी 7 व्या स्थानावर होती पण हळू हळू आज तिसऱ्या स्थानावर आली. बजाज, इलेक्ट्रिक स्कूटर्सची मागणी गांभीर्याने घेत आहे आणि त्यांनी आणखी शोरूम्स देखील उघडले आहेत. येत्या काळात BLDC व्हेरिएंट देखील येईल जे आणखी स्वस्त असेल ज्यामुळे सेल्स च्या आकड्यात उसळी घेतल्याचे पाहायला मिळेल.

2 रे स्थान: TVS मोटर कंपनी लि (TVS iQube Sale)

tvs ने सप्टेंबर 2023 मध्ये iQube च्या 15576 युनिट्स आणि ऑक्टोबर 2023 मध्ये 16,391 युनिट्स विकल्या. सुमारे 815 युनिट्स जास्त ऑक्टोबर मध्ये विकल्या गेल्या. TVS त्यांच्या १ स्कूटर आणि २ व्हेरिएंट्ससह खूप चांगली विक्री करत आहे.

1 ले स्थान: ओला इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (Ola Scooter Sale)

Ola ने सप्टेंबर 2023 मध्ये एकूण 18,615 युनिट्सची विक्री केली परंतु ऑक्टोबर 2023 मध्ये 23,781 युनिट्सची विक्री करून पहिल्या क्रमांकावर राहिली. सणा-सुदिच्या महिन्यात कंपनीने एकूण 5166 युनिट्सची ज्यादा विक्री केली. बर्‍याच दिवसांपासून ओला नंबर 1 चा मुकुट घालून बसली आहे आणि जेन 2 मुळे तो तसाच राहील अशी अपेक्षा आहे. सध्या ओला स्कूटरवर खूप ऑफर्स आहेत. दिवाळीच्या महिन्यात कोणत्या स्कूटरवर काय ऑफर आहे तो तुम्ही वाचू शकता.

 

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment