आयफोन पेक्षा स्वस्त असणारी Techo Electra Emerge इलेकट्रीक स्कूटर देते १०० किमी रेंज!

मुलांना शाळेत सोडण्यासाठी, भाजीपाला आणण्यासाठी किंवा जवळच ऑफीला जाण्यासाठी तुम्ही एखादी इलेकट्रीक स्कूटर शोधात आहात तर एकदा Techo Electra Emerge बद्दल विचार करायला हरकत नाही.

टेको इलेक्ट्रा ईमर्ज

दिवाळीच्या तोंडावर इलेकट्रीक स्कूटरची मागणी बरीच वाढली आहे. सध्या भारतीय मार्केट मध्ये बजेट सेगमेंट मध्ये म्हणजेच ६० हजार ते १ लाख रुपयांच्या किंमतीत स्कूटर खरेदी कारण हे आपल्या लोकांचं धोरण असत त्यामुळे छोट्या कंपन्या किंवा स्टार्टअप्स हाच सेगमेंट टार्गेट करतात. साध्याच एक कंपनीने आकर्षक  प्रॅक्टिकल स्कूटर लाँच केली आहे, मी बोलतोय Techo Electra Emerge या स्कूटर बद्दल. हि स्कूटर लांब रेंज देतेच पण अजून या गाडीत काय खास आहे जाणून घेऊया आजच्या लेखात.

Techo Electra Emerge: बॅटरी पॅक आणि मोटर

टेको इलेक्ट्रा ईमर्ज या स्कूटर मध्ये १.८ kwh क्षमतेची लिथियम अयान बॅटरी दिली आहे ज्यामुळे १०० किलोमीटर सर्टिफाईड रेंज हि गाडी प्रदान करते. चाकाला पॉवर देण्यासाठी २५० वॅट क्षमतेची बीएलडीसी मोटर दिली जाते ज्यामुळे स्पीड २५ किलोमीटर प्रति तास मिळतो. एक लक्ष्यात घेण्यासारखी गोष्ट आहे कि या गाडीला रजिस्ट्रेशन व लायसन्स ची गरज नाही. बॅटरी पॅक ला चार्ज होण्याकरिता ३ ते ४ तास लागतात. मोटर वर कंपनीने १.५ वर्षे तर बॅटरी पॅक वर ३ वर्षे वॉरंटी दिली आहे.

वाचा – Honda Activa Electric : होंडाने सादर केली नवीन ऍक्टिवा इलेक्ट्रिक ई-स्कूटर, पाहा डिटेल्स

टेको इलेक्ट्रा ईमर्ज ब्रेकिंग आणि सस्पेंशन

जरी टेको इलेक्ट्रा ईमर्ज एक स्लो स्पीड स्कूटर  कंपनीने ब्रेकिंग बाबतीत चांगले ऑपशन्स दिले आहेत. पुढच्या चाकाला डिस्क आणि पाठीमागे ड्रम ब्रेक दिल्याने रस्त्यावर धावत असताना गाडीवर आपले नियंत्रण राहते. चांगले सस्पेन्शन मिळावे यासाठी पुढे टेलेस्कोपिक आणि पाठींमागे अड्जस्ट होणारे स्प्रिंग शॉक अब्जोबर्स दिलेले आहेत.

वाचा – Rivot NX100: मराठी माणसाने बनवलेली एका चार्ज मध्ये 500 किमी धावते हि ई-स्कूटर, पहा तपशील

टेको इलेक्ट्रा ईमर्ज फीचर्स व स्पेसिफिकेशन

इलेकट्रीक स्कूटर म्हटलं कि त्यामध्ये असणारे फीचर्स ग्राहकांना खास आकर्षक वाटतात. टेको इलेक्ट्रा ईमर्ज मध्ये डिजिटल इन्ट्रुमेन्ट क्लस्टर, डिजिटल ओडो, ट्रिप, स्पीडो मीटर दिला आहे. लो बॅटरी अलर्ट, पुश स्टार्ट स्टॉप बटण, रिवर्स स्वीच, सेंट्रल लॉकिंग, हाय पास स्विच, एलईडी हेड-टेल लॅम्प, १७ लिटर अंडर सीट बूट स्टोरेज सारखे फीचर्स दिली आहेत.

वाचा – 60 हजारात ११२ किमी रेंज, गोगोरोची स्वस्तात मस्त ई-स्कूटर, वाचा किंमत आणि लाँच तारीख

टेको इलेक्ट्रा ईमर्ज किंमत

टेको इलेक्ट्रा ईमर्ज ची किंमत हा आपला सगळ्यात शेवटचा भाग आहे. हि गाडी सामान्यांच्या खिशाला परवडणारी असून खरेदी केल्यावर सुद्धा गाडी चालवण्यासाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत. टेको इलेक्ट्रा ईमर्ज ची एक्स शोरूम किंमत ८०,९९० रुपये आहे जर ऑन रोड calculate केली तर ८३,००० रुपयांपर्यंत जाते. यामध्ये दिवाळी निमित्त सध्या ऑफर्स मिळू शकते.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment