गोगोरो तैवान बेस इलेकट्रीक मोबिलिटी कंपनीच्या बॅटरी स्वॅप बद्दल तुम्ही खूप ऐकलं किंवा वाचलं असेल. हि कंपनी आपली नवीन इलेकट्रीक स्कूटर भारतीय बाजारपेठेत लाँच करणार आहे. मिळालेल्या माहिती च्या रिपोर्ट नुसार गोगोरो 60 रुपयांच्या किंमतीत 112 किलोमीटर रेंज प्रदान करणारी प्रॅक्टिकल स्कूटर लाँच करण्याच्या तयारीत आहेत. का गोगोरोच्या या स्वस्त आणि मस्त इलेकट्रीक स्कूटर ची इतकी हाइप झाली आहे, असं काय या स्कूटर मध्ये खास आहे जाणून घेऊया.

गोगोरो GX250 मधील 1.6 kWh लिथियम अयान बॅटरी स्वॅपेबल असेल जी एका चार्ज मध्ये 112 किमी रेंज ची हमी देते
गोगोरो इंडिया ने आता पर्यंत भारतीय ग्राहकांसाठी तयार केलेल्या कॅटलॉग मधील २ वाहनांची झलक दाखवली आहे ज्यामध्ये सुपर स्पोर्ट आणि २ सिरीज सहभागी होत्या. गोगोरोच्या आगामी पोर्टफोलिओ मध्ये गोगोरो डिलाईट, सुपरस्पोर्ट, व्हिवा आणि S1 वाहने देखील आहेत. या सर्व शक्तिशाली स्कूटर असून यामध्ये ७ kw पेक्षा जास्त पॉवर असलेल्या मोटर आणि टॉप ऑफ द लाईन फीचर्स सह येतात. पण या सर्व कॅटलॉग ला बाजूला सारून गोगोरो नवीन वाहनावर काम करत असून भारतीय बजेट सेगमेंट मध्ये प्रथमतः घुसण्याची तयारी गोगोरो करत असल्याचे समोर आले आहे. कंपनीच्या सर्व लाईन अप मध्ये GX250 हि इलेकट्रीक स्कूटर सर्वात स्वस्त पण चांगली रेंज देणारी असेल.
वाचा – बजाज प्लॅटिना सीएनजी टू-व्हिलर येणार
👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप
फीचर्स
मोटर:
गोगोरो GX250 हे बॅटरी आधारित वाहन, सरकारच्या वाहन वेबसाईट अनुसार L1 श्रेणीतील वाहनअसून याचा तशी कमल वेग 45 किमी/तास इतका असेल. वाहनात वापरलेली 2.471 kW मोटर FIEM द्वारे उत्पादित बीएलडीसी तंत्रज्ञानाची असेल. गोगोरोने 24 km/h वेगाने 2.471 kW पर्यंतच्या पीक पॉवरसाठी आणि , 54.8 किमी/ताशी 2.29 kW कमाल 30 मिनिटे पॉवर साठी GX250 वाहन सर्टिफाय केले आहे.
बॅटरी:
बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, ही एकूण क्षमतेच्या 1.6126 kWh सह 37.2 Ah Li-ion बॅटरी आहे. या बॅटरीमधून, AIS040 (Rev 1) नुसार, गोगोरो एका चार्जवर 112 किमीरेंज प्रदान करण्याचे आश्वासन देते. बॅटरीचे वजन एकूण 10.3 किलोग्रॅम आहे. गोगोरो GX250 मध्ये 1425 मिमी लांब व्हीलबेस, 650 मिमी रुंदी, 1980 मिमी लांबी आणि 1165 मिमी उंची आहे. गाडीचे एकूण वाहन वजन (GVW) 272 किलो आहे आणि एकूण 2 व्यक्ती प्रवास करू शकतात.
मार्केट अपेक्षा:
Gogoro GX250 ही कमी स्पीड असणारी इलेक्ट्रिक स्कूटर असण्याची शक्यता आहे ज्यामध्ये 25 किमी/ताशी टॉप स्पीड आहे. हि ईव्ही जवळपासच्या प्रवास करणाऱ्या ग्राहकांना टार्गेट करणारी असेल तर गोगोरोच्या बॅटरी स्वॅपिंग इन्फ्रास्ट्रक्चर मुळे हि गाडी शहरी मार्केट मध्ये किंग बनण्याची चिन्हे आहेत.
किंमत:
भारतीय लोकांचा बजेट ताळमेळ लक्ष्यात घेता गोगोरो या गाडीची किंमत रुपये ६०,००० (एक्स-शोरूम) इतकी ठेऊ शकते आणि गाडी 2024 च्या मध्या पर्यंत लाँच होऊ शकते.