बजाज प्लॅटिना सीएनजी टू-व्हिलर येणार

भारतात चार चाकी वाहनांची वाढती मागणी आणि पर्यावरण पूरक अश्या कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी ) च्या पेट्रोल पेक्ष्या कमी असणाऱ्या किमती यामुळे बजाज आपले नशीब टू-व्हीलर सीएनजी लाँच करून अजमावणार आहे. भारतातील दुसरी मोठी दुचाकी निंर्मिती आणि विक्री करणारी बजाज ऑटो कोणत्या प्रकारात सीएनजी गाडी लाँच करणार आहे जाणून घेऊया.

bajaj platina cng

भारतात अनेक कंपन्या सीएनजी चारचाकी विकत आहेत आणि पेट्रोल किंवा डिझेल पेक्षा या इंधनाकडे ग्राहकांचा काळ जास्त असल्याने जास्त मागणी आहे. दुचाकी औद्योगिक क्षेत्रात पेट्रोल ला पर्याय म्हणून इलेकट्रीक वाहनांचे तंत्रज्ञान विकसित येत आहे. बजाज स्वतः बीएलडीसी चेतक आणि बजाज ईव्ही सनी वर काम करत असून लवकरच ती वाहन बाजारात येईल, एकीकडे जग इलेकट्रीक वाहनांना भविष्य म्हणून बघत असताना बजाज मात्र आपली पहिली सीएनजी प्लॅटिना लाँच करण्याच्या तयारीत आहे. सीएनजी इंधनावर धावणारी दुचाकी डेव्हलप करणारी बजाज ऑटो पहिलीच ऑटो मेकर कंपनी असेल.

बजाज ११० सीसी सीएनजी बाइकचे काम सुरू आहे

नुकत्याच समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट नुसार, बजाज 110cc बाईकवर काम करत आहे जी CNG वर चालेल. रिपोर्ट मध्ये म्हटले आहे कि या दुचाकीला “Bruzer E101” हे कोडनेम दिले असून गाडीचे ११० सीसी चे प्रोटोटाईप टेस्टिंग आणि डेव्हलोपमेंट अंतिम टप्प्यात आले आहे. चार चाकी वाहन प्रमाणे हि गाडी सीएनजी आणि पारंपारिक पेट्रोल इंधनामध्ये स्विच करण्यास सक्षम असेल.

दर वर्षी सुमारे १ ते १.२० लाख सीएनजी बाईक निर्मित करण्याची योजना कंपनीने आखली होती पण वाढते पेट्रोल भाव आणि मार्केटचा अंदाज यामुळे क्षमता वाढवून २ लाख युनिट्स पर्यंत करण्यात आली आहे. हे आगामी वाहन भारतीय बाजारपेठेत पुढील ६ ते १२ महिन्यांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध केले जाऊ शकते. Bruzer E101 CNG बाईक लाँच झाल्यावर प्लॅटिना या नावाने विकली जाऊ शकते.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment