बजाज सनी लवकरच भारतीय मार्केट मध्ये लाँच होण्याचे संकेत आहेत ऑटोकार नावाच्या एका न्युज पोर्टल ने नुकतेच गाडीचे स्पाय शॉट्स लीक केले आहेत. या लेखात जाणून घेऊ डिजाईन आणि संभाव्य फीचर्स बाबत.

Bajaj Sunny Electric Scooter Sy Shots: काही दिवसांपूर्वी आपल्या टीम ने बजाज चेतक बीएलडीसी मोटर्स सह टेस्टिंग होताना स्पाय शॉट्स कैद केले होते त्या नुसार समजले होते कि बजाज चेतक चे स्वस्त मॉडेल भारतीय बाजारात येणार आहे. त्यानंतर आता बजाज अजून एक वाहन इलेकट्रीक अवतारात लाँच करण्याच्या तयारीत असल्याचे निदर्शनास आले आहि. बजाज सनी या मॉडेल चे कंपनी इलेक्टरीफिकेशन करत आहे आणि सध्या गाडी टेस्टिंग फेज मध्ये आहे.
बजाज सनी इलेक्ट्रिक स्कूटर टेस्टिंग फोटोज
१९९० च्या दशकात बजाज सनी हि एक छोटी स्कूटर खूप प्रसिद्ध झाली होती. २० – ३० किमी लोकल फिरण्यासाठी या गाडीचा उपयोग केला जात असे, खास करून शाळेला जाणाऱ्या मुलांना सोडण्यासाठी पालक या गाडीचा उपयोग करत असे. लोकल कम्युटिंग साठी प्रसिद्ध असलेले सनी मॉडेल पुन्हा एकदा इलेकट्रीक अवतारात जिवंत केले जाणार आहे.
👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप
डिजाईन
प्रसिद्ध झालेल्या फोटोज नुसार जुन्या मॉडेलची डिजाईन पॅटर्न नवीन जनरेशन मध्ये कॅरी फॉरवर्ड केली जाईल. गोल हेडलॅम्प दिले जातील, समोरचा फेंडर मोठा असेल, पाय ठेवायची जागा सपाट आणि स्लिम दिली जाईल, पाठीमागचा दिवा म्हणजे टेल लॅम्प मूळ कराचाच असेल पण एलईडी टेक्नोलोंजि मध्ये रूपांतरित केला जाईल. टेस्टिंग इमेज नुसार डिजाईन पूर्वी प्रमाणेच छोटी आणि गोंडस ठेवण्यात येईल, सीट्स ची डिजाईन आणि ग्रॅब हॅन्डल सुद्धा संक्षिप्त सनी प्रमाणेच असणार आहे फक्त स्टेपनी चाक दिले जाणार नाही. पुढच्या चाकाची डिजाईन तीन स्पोक असणारी असेल तर पाठीमागे बीएलडीसी मोटर फिट केली जाईल, ब्रेक हे लायनर ड्रम या पॅटर्न चे असतील. पुढचे सस्पेन्शन टेलेस्कोपिक तर पाठीमागे मोनो स्प्रिंग सस्पेन्शन दिले जाणार आहे.

बजाज सनी मध्ये फरक असणार आहे तो म्हणजे उजव्या बाजूला असणारा धूर सोडणार पाईप नसेल. इमेज मध्ये उंची बघू शकता कि हि संपूर्ण गाडी सध्या टेस्टिंग फेज मध्ये असून जुन्या मॉडेलला इलेकट्रीक मध्ये कन्व्हर्ट केले आहे. हि गाडीची अगदी सुरवातीची चाचणी आहे.
मूळ बजाज सनी मध्ये पेट्रोल इंधनावर चालणारे ६० सीसी टू – स्ट्रोक इंजिन दिले जायचे जे ३ एचपी पेक्षा कमी पॉवर निर्माण करत असे. गाडीची कामगिरी त्याकाळी लोकल फिरण्यासाठी उत्तम होती, कितीही भार असुद्या वाहून नेण्यासाठी हि गाडी सक्षम होती त्या प्रमाणेच हे इलेकट्रीक मॉडेल सुद्धा ताकदवर असावे अशी अपेक्षा.
बजाज चेतकपेक्षा हि इव्ही पूर्णपणे वेगळ्या प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. नवीन बजाज सनी इलेकट्रीक लाँच होताना युलू या प्लॅटफॉर्म वर लाँच होण्याची शक्यता आहे. Yulu प्लॅटफॉर्म सध्या Dex GR वर वापरला जातो. युलू हा प्लॅटफॉर्म कमी वेग असणाऱ्या वाहनांसाठी तयार केला असला आणि सनी मध्ये वापरण्यात येणार असला तरी सनी २५ किमी टॉप स्पीड वर कॅप कारणात येणार नाही कारण न्यूज पब्लिश केलेल्या पोर्टल नुसार टेस्ट करते वेळी गाडीचा तशी वेग ४० ते ५० किमी इतका होता.
किंमत
बजाज सनी फेम ३ सबसिडी लागू झाल्यावर मार्केट मध्ये येऊ शकते आणि हे मॉडेल एन्ट्री लेव्हल असेल त्यामुळे किंमत अंदाजे ७० ते ८० हजार रुपयांच्या दरम्यान असण्याचे चिन्ह आहेत.

बजाज ऑटो हे वाहन कधी भारतात लाँच करेल किंवा स्पेसिफिकेशन्स काय असतील या बाबत सध्या माहिती समोर आलेली नाही पण फेम २ सबसिडी मध्ये कपात झाल्यापासून इलेकट्रीक वाहनाच्या किमती वाढल्याने कंपन्या कमी किमतीत वाहन लाँच करण्याचे प्रयत्न करत आहेत. हि गाडी अंदाजे येत्या १.५ ते २ वर्ष्यात लाँच करेल अशी अपेक्षा आहे.