स्वस्त Bajaj Chetak BLDC मोटर सह बाजारात येणार, टेस्टिंग दरम्यान कॅमेरात कैद

मंडळी टेस्टिंग गाडीचे दर्शन होऊन 1 वर्ष पूर्ण झाले असून वीडियो मध्ये दिसणाऱ्या दुसऱ्या बजाज चेकत ला 2901 या नावाने गेल्या काही महिन्यांपूर्वी लाँच केले.

Published:

बजाज चेतक बीएलडीसी हब मोटर सह जुन्या मुंबई पुणे महामार्गावर टेस्टिंग दरम्यान कॅमेरात कैद झाली आहे. ऑटो हेल्पर इंटरनेटवर सर्वात प्रथम ही माहिती देत आहे. आपले लेखक अजिंक्य सिदवाडकर यांनी हे फोटोज आणि व्हिडीओस काढले आहेत.

1000039212

New Bajaj Chetak with BLDC motor

एखाद्या टू व्हीलरचा सर्वात महाग पार्ट त्या गाडीचा बैटरी पॅक आणि मोटर हा असतो. राज्य सरकार ने सबसिडी बंद केल्याने आणि केंद्र सरकार ने फेम 2 सबसिडी कमी केल्याने इलेक्ट्रिक टू व्हीलर च्या किमती कमालीच्या वाढल्या आहेत. बजाज चेतकला सुधा किंमत वाढल्यामुळे सेल्स कमी होण्याचा फटका बसला आहे.

सेल्स वाढवण्यासाठी आणि कमी बजेट सेगमेंट मध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी चेतक चे bldc मोटरचे वर्जन लवकरच लाँच होण्याची चिन्हे आहेत.

सध्या चेतकच्या BLDC मोटर असलेल्या मॉडेल ची चाचणी सुरू आहे. 2024 च्या पहिल्या तिमाही मध्ये नवीन variant लाँच होऊ शकते.

नवीन बजाज चेतक: डिझाईन

1000039207

टेस्ट दरम्यान आपल्या कॅमेरात कैद झालेल्या फोटो आणि व्हिडिओ नुसार समजते की बजाज चेतक मध्ये लोअर ट्रिम मध्ये PMS मोटर ऐवजी BLDC मोटर दिली जाणार आहे. डिझाईनच्या अनुषंगाने पाहिले तर pmsm मोटर असलेल्या आणि नवीन bldc मोटर चेतक च्या डिजाइन मध्ये फारसा फरक दिलेला नसेल फक्त पाठीमागे आलोय ऐवजी bldc युनिट फिट केले जाणार असल्याचे फोटो मध्ये दिसते.

1000039206

Upcoming चेतक मध्ये dashbord कंसोल ब्लॅक अँड व्हाईट असेल त्यामध्ये जास्त बदलाव केलेला नाहीये.

नवीन बजाज चेतक: मोटर आणि बॅटरी

1000039208

सध्याच्या चेतक मध्ये 3.8 kw ची ac pmsm मोटर दिली जाते ज्यामुळे 70 किमी चे टोपस्पीड मिळते, तर येणाऱ्या नवीन चेतक मध्ये चाकावर फिट केलेली bldc मोटर देण्यात येईल हीचे टॉप स्पीड तितकेच असू शकते. या छोट्याश्या बदलावा मुळे गाडीची किंमत कमी होईल ज्याने कमी बजेट असणारे ग्राहक सुधा खरेदी करू शकतील.

बॅटरी पॅक मध्ये बदलाव होईल याबद्दल ठोस असा पुरावा आमच्याकडे नाही पण किंमत कमी करण्यासाठी कंपनी पूर्वी पेक्षा बॅटरी पॅक थोडा कमी करू शकते अशी अपेक्षा आहे. सध्या प्रीमियम चेतक मध्ये 3 kwh चा लिथियम अयन बॅटरी पॅक दिला जातो ज्यामुळे 90 ते 95 किमी ची रेंज ग्राहकांना ऑन रोड मिळत आहे.

न्यू बजाज चेतक: किंमत आणि लाँच डेट

BLDC hub मोटर असणारी बजेट चेतक ची किंमत आणि लाँच डेट या बद्दल काहीही ठोस पुरावे नाहीत परंतु आम्ही लवकरच याबद्दल लिक्स मिळवून या पेज वर अपडेट करू.

नवीन अपडेट 2024

मंडळी टेस्टिंग गाडीचे दर्शन होऊन 1 वर्ष पूर्ण झाले असून वीडियो मध्ये दिसणाऱ्या दुसऱ्या बजाज चेकत ला 2901 या नावाने गेल्या काही महिन्यांपूर्वी लाँच केले. आम्हाला मिळालेल्या माहिती नुसार बीएलडीसी मोटर असणारी चेतक काही महिन्यातच लाँच होण्याची शक्यता आहे. इतर वाहनांची माहिती वाचण्यासाठी कृपया ऑटो हेल्पर मराठी न्यूज़ च्या होम पेज ला भेट द्या.

BLDC Bajaj Chetak leaked spy shot Video:

Disclaimer: This Leaked images & Videos are copyright by autohelper.co.in , you can use this (Website or YouTube) images with proper (https://autohelper.co.in) website source link.

Photo of author

Ajinkya Sid

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment