क्रेटा घेताय? जरा थांबा नवीन CRETA FACELIFT 2024 येतेय! जाणून घ्या वैशिष्ट्ये

Ajinkya Sidwadkar

i20 एन लाईन लाँच झाल्यानंतर लगेचच शेठ लोकांची गाडी “क्रेटा” आता नवीन अवतारात येणार असल्याची बातमी समोर आली आहे. क्रेटा २०२४ फेसलिफ्ट व्हर्जन चाचणी करते वेळी एका भारतीय युट्यूबर ने आपल्या कॅमेरात कैद करत सोशल मीडिया वर विडिओ सार्वजनिक केला आहे. माहिती नुसार अद्ययावत क्रेटा SUV मध्ये ऍडव्हान्स ड्रायव्हिंग असिस्टन्स सिस्टम (ADAS) आणि 360-डिग्री कॅमेरा यासारखी नवीन वैशिष्ट्ये देखील दिले जाऊ शकते.

creta 2024

किया सेलटॉसशी मिळती जुळती असेल अद्ययावत क्रेटाचे फीचर्स

Hyundai Creta कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये वर्चस्व गाजवत आहे. सर्वच स्थरातील लोकांना या गाडी बद्दल आकर्षण असते, पण आता २०२४ मध्ये येणाऱ्या Hyundai Creta Facelift 2024 मुळे फॅन्स मध्ये अजून भर पडेल असे वाटत आहे. किया या सिस्टर कंपनी च्या सेलटॉस मधील सर्व फीचर्स आता क्रेटा मध्ये येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

2024 Hyundai Creta Facelift — एक्सटेरिअर

डिझाइनमधील बदलांच्या बाबतीत, क्रेटा फेसलिफ्ट सध्याच्या मॉडेलपेक्षा मोठ्या ग्रिल, स्प्लिट एलईडी हेडलाइट्स आणि एच-आकाराचे एलईडी डीआरएल ऑफर करण्याची शक्यता आहे. आजूबाजूला, ते छताच्या खाली शार्प आकार आणि नवीन अलॉय डिजाईन चा समावेश नवीन गाडीत दिला जाणार आहे. मागील बाजूस, नवीन क्रेटा फेसलिफ्टमध्ये एच-आकाराच्या लाइटिंग पॅटर्नसह अद्ययावत एलईडी टेल लाइट्स असू शकतात ज्यांना आपण नुकतीच लाँच झालेल्या एक्सटर मध्ये पहिल्या असतील.

creta

नवीन लीक विडिओ मध्ये समोरील बम्पर वर रडार सेन्सर दिल्याचे दिसून आले आहे यामुळे हे निश्चित होते कि नवीन क्रेटा फेसलिफ्ट लेव्हल-2 ADAS देऊ शकते ज्यात कॅमेरा आणि रडार चा उपयोग केला जाईल. 360-डिग्री कॅमेरा सिस्टम देखील गाडीत अद्ययावत केली जाईल हे या इमेज मध्ये स्पष्ट होते.

creta radar

2024 ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट – इंटिरियर आणि वैशिष्ट्ये

creta int

नवीन स्पाय शॉट्स मध्ये इंटेरिअर दिसत असले तरी ते स्पष्ट नाही पण एवढे समजते कि इंटीरियर सध्याच्या मॉडेल प्रमाणेच आहेत पण सीट अपहोल्स्ट्री आणि अंतर्गत रंग छटा आगामी फेसलिफ्टमध्ये बदलण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, क्रेटा फेसलिफ्ट स्पेस मॅनेजमेंट आणि स्पेसिफिकेशन बाबतीत कोणतेही मोठे बदल देईल अशी आम्हाला अपेक्षा नाही.

Level-2 ADAS आणि 360-डिग्री पार्किंग कॅमेरा व्यतिरिक्त, Creta फेसलिफ्ट नवीन पूर्ण-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि अपडेटेड 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम सारखी वैशिष्ट्ये देखील देऊ शकते. सध्या, क्रेटा वायरलेस फोन चार्जर, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, पॅनोरामिक सनरूफ, 6 एअरबॅग्ज आणि रिक्लिनिंग रियर सीट यांसारखी वैशिष्ट्ये ऑफर करते.

creta roof

2024 ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट पॉवरट्रेन

नवीन क्रेटा फेसलिफ्टमध्ये सध्याचे 1.5L सामान्य पेट्रोल आणि 1.5L टर्बो डिझेल इंजिन कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, Hyundai-Kia चे नवीन 1.5L टर्बो पेट्रोल इंजिन आता बंद झालेले 1.3L टर्बो पेट्रोल इंजिन बदलण्याची शक्यता आहे. 1.5L टर्बो पेट्रोल इंजिन आधीच Verna sedan आणि Alcazar SUV च्या टर्बो पेट्रोल इंजिनला पॉवर देते. हे इंजिन 5500rpm वर 160PS पॉवर आणि 1500rpm आणि 3500rpm दरम्यान 253Nm टॉर्क निर्माण करते. Verna आणि Alcazar मध्ये, हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल किंवा 7-स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या पर्यायासह येते.

2024 Hyundai Creta Facelift लाँच डेट

Hyundai 2024 च्या सुरुवातीला क्रेटा फेसलिफ्ट लाँच करण्याची शक्यता आहे. आणिअपेक्षित आहे की Hyundai डीलरशिप 2023 च्या अखेरीस Creta फेसलिफ्टसाठी अनधिकृत बुकिंग सुरू करतील आणि 2024 च्या सुरूवातीस किंवा त्यानंतर SUV लॉन्चकेली जाईल. Kia Seltos, Maruti Suzuki Grand Vitara, Toyota Urban Cruiser Hyryder, Volkswagen Taigun, Skoda Kushaq, MG Astor, आणि Honda Elevate सारख्या इतर C-सेगमेंट SUV ला नवीन Creta टक्कर देत राहील.

क्रेटाचा लीक झालेला विडिओ:

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 
Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment