भारतातील बेस्ट-सेलर ठरली टाटाची ही कार, मारुतीच्या कारला सुद्धा टाकले मागे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Aishwarya Potdar

Updated on:

भारतामध्ये नुकताच कार कंपनी कारचा विक्री-अहवाल जाहीर करत आहेत, यातील top car sales मध्ये मारुती सुझुकी ऑटोमोबाइल, ह्युंदाई, होंडा आणि टाटा मोटर्स सारख्या कारमेकर कंपन्यांचा समावेश आहे. पण ह्या सर्व Car Sales कंपनीच्या यादीत अव्वल नंबर मिळवालाय टाटा मोटर्सने!  टाटाच्या हॅरियर, सफारी, टियागो, नेक्सॉन या कारच्या तुलनेत tata punch bestseller बनली आहे.

यंदाच्या SUV सेगमेंटमध्ये top 5 best selling car in india यात टाटा मोटर्सच्या ‘पंच’ या कारची सर्वात जास्त विक्री झाली आहे. टाटा पंच नंतर मारुती सुझुकीची वैगन-आर, ब्रेझा, डिझायर आणि ह्युंदाई क्रेटा या ‘भारतात सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या 5 कार’ या यादीत आहेत. पंचचे ICE म्हणजेच इंटरनल कम्बुशन इंजिन आणि टाटा पंच ईव्ही हे दोन्ही वेरिएंट्स खूप लोकप्रिय आहेत. चला जाणून घेयूया या कारची संपूर्ण माहिती.

वाचा: Tata Punch EV Prices: पंच ईव्ही सर्व मॉडेल्सच्या महाराष्ट्रातील ऑन रोड किमती (फेब्रुवारी)

Tata Punch

मार्च 2024 मध्ये टाटाने पंचचे 17,547 तर 2024 एप्रिलमध्ये 19,158 इतके मॉडेल्स विकून कार-विक्रीच रेकॉर्ड ब्रेक केलं आहे. सिट्रॉन C3 आणि निसान मॅग्नाइटला टक्कर देणारी पंच पेट्रोल, सीएनजी आणि आता इलेक्ट्रिक वेरिएंट्समधून उपलब्ध आहे. कारच्या प्रमुख स्पेसिसिफेशनमध्ये कारचे ट्रांसमिशन मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक असून, 5 लोक आरामात प्रवास करू शकतील अशी ही SUV आहे. 1199 cc चे इंजिन असणारी ही कार एका लिटरमध्ये 26.99 किमी इतके मायलेज देते.

वाचा: Tata Punch EV: फक्त २१ हजारांत करा बुक, कलर्स आणि व्हेरिएंट्स तपशील लॉन्चपूर्वी उघड

भारतातील टॉप सेलर टाटा पंच इंजिन माहिती आणि फिचर्स

भारतीयांसाठी टाटाचे 3 मेन वेरिएंट्स उपलब्ध आहेत, ज्यामध्ये 1.2 लिटरचे नॅचूरली अस्पिरेट्ड पेट्रोल इंजिन (5 स्पीड AMT), 1.2 लिटरचे नॅचूरली नॅचूरली अस्पिरेट्ड पेट्रोल इंजिन (5 स्पीड AMT), 1.2 लिटरचे CNG इंजिन (5 स्पीड AMT) यांचा समावेश आहे. कारमध्ये असणारी इंधन टाकी 37 लिटरची तर बूट-स्पेस 366L इतकी आहे. 3 सिलेंडर असणारं इंजिन 1199 cc चे आहे. या कारच्या मॅन्युअल पेट्रोल वेरिएंटमधून 20.09 किमी इतके मायलेज, ऑटोमॅटिक पेट्रोल वेरिंटमधून 18.80 किमी आणि CNG मॅन्युअल मधून 26.99 किमी इतके मायलेज मिळते.

वाचा: टाटा पंचला बसला पंच, नक्की काय झालं स्टेडियममध्ये? जाणून घ्या स्टेडियममधल्या पंच ईव्हीची किंमत, फिचर्स

टाटा पंच किंमत आणि बुकिंग

या कारची किंमत वेरिएंट्सनुसार ठरते, जी 7.29 लाख ते 12.17 लाख या दरम्यानची आहे. Glabal NCAP द्वारे या कारला 5 स्टार रेटिंग मिळाले आहेत. कारच्या टॉप एडवांस्ड फिचर्समध्ये 7 इंचाची हरमन इन्फोटेन्मेंट सिस्टम, LED DRLS, ऑटो हेडलँप्स, क्लायमेट कंट्रोल, रूफ-टेल्स, रिव्हर्स कॅमेरा सारख्या फिचर्सचा समावेश आहे. तुम्हाला जर ह्या कारची टेस्ट-रायिड अथवा बुकिंग करायचे असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या टाटा मोटर्सच्या शोरूममध्ये भेट देऊ शकता.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 
Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment