टाटा पंचला बसला पंच, नक्की काय झालं स्टेडियममध्ये? जाणून घ्या स्टेडियममधल्या पंच ईव्हीची किंमत, फिचर्स सर्व काही

Aishwarya Potdar

Updated on:

Perry breaks the car window of Tata Punch EV : सध्याच्या सोशल मीडियावर एकच बातमी गाजत आहे जी क्रिकेटच्या संबंधित आहे; एलिस पेरी नावाची ऑस्ट्रेलियन क्रिकेटरच्या दिशेने चेंडू आल्यावर ती काहीशा अशा वेगाने ते चेंडूला बॅटने फेकते की तो चेंडू थेट स्टेडियम मध्ये उभारलेल्या आलिशान पंचच्या काचेला जाऊन धडकतो, या चेंडूच्या धडकल्यामुळे काचेचे तुकडे-तुकडे होऊन काच फुटते..! हो तुम्ही वाचताय ती माहिती अगदी खरी आहे; बऱ्याचशा मुलांचं बालपण हे क्रिकेट खेळताना गल्लीतील खिडक्या-गाड्यांच्या आरसे फोडण्यातच गेलेला आहे, पण आता ही गोष्ट फक्त गल्लीपुरती मर्यादित न राहता चक्क लाईव्ह क्रिकेट मॅचमध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेटरकडून घडलेली आहे.

नक्की काय झालं स्टेडियममध्ये?

टाटा पंचची काच फोडणारी ही व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ‘एलिस पेरी’ आहे, रॉयल चॅलेंजर बंगलोर तर्फे वुमन प्रीमियर लीगमध्ये खेळत असताना पेरीच्या दिशेने जेव्हा बॉल येतो, त्यावेळेस ती बॉलला काही अशा प्रकारे हिट करते, ज्यामुळे तो बॉल थेट स्टेडियम मध्ये उभारलेल्या टाटा पंचच्या खिडकीच्या दिशेने जाऊन चक्क खिडकीला हिट करतो आणि खिडकीच्या काचेचे क्षणातच तुकडे-तुकडे काही होतात. हे सगळं झाल्यानंतर मात्र टाटा पंच कडून एलिस पेरीला एक खास भेट मिळाली होती आणि ही भेट होती फुटलेल्या काचे तुकडे एकसंत लावून त्याची फ्रेम करून ती फ्रेम एलीसीला भेट म्हणून देण्यात आली होती, ही भेट तिने आपुलकीने स्वीकारलीसुद्धा आणि याचा व्हिडिओ आणि हीफ्रेम मात्र इंटरनेटवर सध्या मोठ्या प्रमाणात वायरल होतं. ही टाटा पंच कार इलेक्ट्रिक होती, चला जाणून घेऊया स्टेडियम मध्ये उभारलेल्या या टाटा पंचचे फीचर्स आणि ती किती किमतीत उपलब्ध आहे, याची संपूर्ण माहिती.

टाटा पंच इलेक्ट्रिक

क्रिकेटचे स्टेडियममध्ये उभारलेली टाटा पंच इलेक्ट्रिक व्हेरिएंटचे होते, जे 11 ते 16 लाख या किमतीला मिळतं, एका चार्जमध्ये या ईव्हीची रेंज 315 ते 450 किलोमीटर इतकी आहे, शिवाय ही कार ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असून ही 5 सीटर आहे.  टाटा पंचर सेफ्टीच्या बाबतीत माहिती देता, या कारमध्ये आपल्याला 6 एअरबॅक्स मिळतात शिवाय सेंट्रल लॉकिंग डे अँड नाईट, टायर प्रेशर मॉनिटर, ESC म्हणजेच इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, स्पीड सेन्सिंग, हिल डिसेंट कंट्रोल, हिल असिस्ट आणि 360 व्ह्यू कॅमेरा मिळतो.

इलेक्ट्रिक टाटा पंच बॅटरी

भर स्टेडियममध्ये उभारलेल्या टाटाच्या या इलेक्ट्रिक कारच्या बॅटरीची माहिती देता, इथे आपल्याला 35 kWh बॅटरीची कपॅसिटी मिळतेशिवाय मोटर 90 kW मिळते. या इलेक्ट्रिक कारमध्ये 120.69 bhp इतकी पावर तर 190 Nm इतका टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे, या इलेक्ट्रिक कारची बॅटरी ही लिथियम आयन प्रकारची आहे, ही संपूर्ण बॅटरी चार्ज होण्यासाठी केवळ 56 मिनिटे लागतात. स्टेडियम मध्ये उभारलेली टाटा पंच ही एम्पावर्ड ऑक्साईड टोन रंगांमधून आहे.

वाचा: एथर एनर्जीची बॅटरी फेकली 40 फुटावरून, पाहा पुढं काय झालं?

टाटा पंच ईव्ही फिचर्स

या इलेक्ट्रिक कार टाटा पंचच्या बाहेरील बाजूची माहिती घेता, यामध्ये पावर ऍडजेस्टेबल एक्सटेरियर मिररसोबत इलेक्ट्रिक फोल्डिंग रियर व्ह्यू मिरर, रेन सेंसिंग वायपर, रियर विंडो वायपर, रियर विंडो डी-फॉगर, अलोय व्हिल्स, प्रोजेक्टर हेड लॅम्प, कॉर्नरिंग फॉग लॅम्प, रूप रेल्स, LED DRLS, LED हेडलाईट, LED टेल लाईट आणि LED फॉग लँप्स यांचा समावेश आहे.

या एसयूव्हीच्या अत्याधुनिक फीचर्समध्ये पॉवर स्टेरिंग, अँटी-लॉक बेकिंग सिस्टीम, एसी, ड्रायव्हर एअरबॅग तसेच पॅसेंजरसाठी एअर बॅग, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, अलोय विल्स, मल्टी फंक्शन स्टेरिंग व्हील आणि पुढच्या सीटमध्ये पावर विंडो यांसारख्यां वैशिष्ठ्यांचा समावेश आहे. इलेक्ट्रिक कारमध्ये मनोरंजनासाठी रेडिओ ,मागच्या-पुढच्या सीटसाठी स्पीकर, वायरलेस फोनचार्जिंग, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, 10.25 इंचाची टच-स्क्रीन जिला अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कार प्ले यांसारख्या फीचर्स समावेश आहे.

 

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 
Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment