नव्या स्विफ्टचे नवे 5 वेरिएंट्स आणि रंग, बुकिंग करायचंय? मग ही पाहा किंमत आणि अपडेटेड फिचर्स

Aishwarya Potdar

Automotive industry मध्ये सध्या नवीन मारुती सुझुकीच्या स्विफ्ट 4 जनरेशनच्या लाँचिंगची जय्यत तयारी सुरू आहे, epic new swift 2024 ही कार 9 मे ला लाँच होणार असून, बरेच लोक या swift new modal बद्दल इंटरनेटवर बरीच माहिती वेगाने शोधत आहेत जसं; new swift 2024 launch date in india, swift vxi ऑन रोड किंमत, नवीन स्विफ्ट 2024 टॉप मॉडेलची किंमत, New Swift 2024 black colour याचसोबत new swift 2024 specifications म्हणूनच ही संपूर्ण मारुतीच्या नवीन स्विफ्टची माहिती एका लेखात देत आहे.

वाचा: अनन्याने रिव्हिल केली मारुतीची ही 7 लाखाची कार, बुकिंग कसं करायचंय कळत नाहीये? अहो ह्या सोप्या पद्धतीने करा बुकिंग 

एपिक न्यू स्विफ्ट 2024 मधील नवीन अपडेट

ह्या कारचे भारतात 5 वेरिएंट्स उपलब्ध होणार असून हे वेरिएंट्स अनुक्रमे LXi, VXi, VXi (O), ZXi आणि ZXi+ हे असणार आहेत याचशिवाय लाल, पांढरा, निळा, ब्लू ड्युअलटोन, हलका राखाडी, काळा, लाल ड्युअलटोन आणि ऑरेंज या रंगामधून ही नवीन कार उपलब्ध असणार आहे. या कारचे केबिन जुन्या स्विफ्टच्या तुलनेत खूप स्पिशियस म्हणजेच मोठे आणि प्रीमियम बनवण्यात आले आहे, या केबिनमध्ये डॅशबोर्ड अपडेट केला आहे, ज्यामध्ये सेंट्रल AC वेंट्स देण्यात आले आहेत. मारुतीच्या इतर कारप्रमाणे डेव्हलप झालेला क्लायमेट कंट्रोल पॅनल आणि 9 इंच मोठा टचस्क्रीन सारखी इतर एडवांस्ड फिचर्स देण्यात आले आहेत. याचसोबत या कारमध्ये वायरलेस चार्जर, क्रुझ कंट्रोल, हेडअप डिस्प्ले, स्टिअरिंग माउंटेड डिस्प्ले सारखे एडवांस्ड फिचर्स देण्यात आले आहेत.

new swift 2024 

नव्याने मिळालेले अपडेट्स

बेस व्हेरिएंट- LXi नवीन डिझाइन बँपर, फ्रंट ग्रिल, हॅलोजन प्रोजेक्टर लॅम्प, ब्लॅक डोअर हँडल्स, स्टीलची चाके
मिड व्हेरियंट – VXi आणि VXi(O) हॅलोजन टर्न सिग्नल्स, हॅलोजन प्रोजेक्टर हेडलॅम्प, इंटिग्रिटेड टर्न सिग्नल्स, ORVM, कलरफुल डोअर हँडल्स, स्टीलची चाके, 7 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम
टॉप-स्पेक व्हेरियंट – ZXi आणि ZXi+ LED हेडलँप्स, 7 इंच फ्रिस्टंडिंग टचस्क्रीन, मागील बाजूस AC वेंट्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल


वाचा: न्यू जनरेशन-न्यू स्विफ्ट, जुन्या स्विफ्टच्या तुलनेत हे मिळणार फिचर्स

नवीन स्विफ्ट 2024 लाँचिंग

नवीन जनरल स्विफ्ट हॅचबॅक भारतामध्ये 9 मे या दिवशी लाँच होत असून, ह्या कारची टेस्ट-राईड अथवा बुकिंग प्रक्रियासुद्धा सुरू झाली आहे. 3 सिलेंडर आणि 1.2 लिटरचे पेट्रोल पॉवरट्रेन इंजिन पॉवरफुल बनवण्यासाठी 5 स्पीड MT आणि AMT ट्रांसमिशन पर्यायासोबत दिलं आहे. सध्या ही कार पेट्रोल इंजिनमधून असून लवकरचं या कारचे CNG वेरिएंटसुद्धा उपलब्ध होऊ शकण्याची अपेक्षा आहे.

वाचा: 24 किमी मायलेज देणारी, मारुती सुझुकीची नवीन स्पोर्टलूक स्विफ्ट कार पहिली का?

स्विफ्ट 4 जनरेशन ऑन-रोड किंमत आणि बुकिंग

नवीन स्विफ्ट ही 5 सीटर असून, ह्या कारची किंमत 6. 50 ते 10 लाख इतकी आहे, ही किंमत वेरिएंटसनुसार बदलली जाते. ही हॅचबॅक कार स्पोर्टी दिसण्यासाठी हिचे स्टायलिंग अपडेत केले आहेत. 11,000 रुपये भरून लाइट हायब्रीड पॉवरफुल इंजिन असणाऱ्या ह्या कारचे बुकिंग तुम्ही तुमच्या जवळच्या मारुती सुझुकी शोरूममधून करू शकता.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 
Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment