न्यू जनरेशन-न्यू स्विफ्ट, जुन्या स्विफ्टच्या तुलनेत हे मिळणार फिचर्स

Aishwarya Potdar

Updated on:

New Generation Maruti Swift: मारुती स्विफ्टला फेसलिफ्ट मिळाले आहे, ज्यामध्ये काही फिचर्स-स्पेसिफिशन नव्याने दिले गेले आहेत, या फिचर्समध्ये व्हेंटिलेटेड सीट्स, ADAS आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक्स सारख्या अनेक एडवांस्ड फीचरसोबत सोबत इंजिनमध्ये केलेल्या बदलावांचा समावेश आहे. भारतामधली टॉपसेलिंग कारला फेसलिफ्ट मिळाले आहे, ज्यामुळे ही कार आधीपेक्षा खूप स्टाइलिश आणि स्पोर्टी दिसते आहे. या मारुती सुझुकीच्या टॉप सेलिंग कार स्विफ्ट फेसलिफ्ट बाबतीतील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील लेख संपूर्ण वाचा.

स्विफ्ट व्हीएक्सआय मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड किंमत
मारुती स्विफ्ट हायब्रिड 2024 किंमत
मारुती सुझुकी स्विफ्ट नवीन मॉडेल 2024

मारुती सुझुकी स्विफ्ट हायब्रिड मायलेज

मारुती सुझुकीच्या स्विफ्टला नव्या जनरेशनची स्विफ्ट अशी ओळख देण्यात येत आहे, कारण या न्यू स्विफ्टमध्ये आकर्षक लुकमध्ये इंटेरीयर-एक्सटीरियरमध्ये नव्याने काही गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे; मोठे LED लाइट्स, डार्क काळ्या रंगाचे सी-पिलर, व्हेंटिलेटेड सीट्स, ADAS (एडवांस्ड ड्राइवर असिस्ट) आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक्स, आकाराने मोठी नंबर-प्लेट हाउसिंग, नवे आलोय व्हिल्स, बूड-लीडवर असणारा रिव्हर्स कॅमेरा ज्यामुळे कार चालवताना-वळवताना-मागे घेताना अगदी ट्रॅफिकमध्ये सुद्धा कॅमेराचा उपयोग होईल असे फिचर्स देण्यात आले आहेत.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 

कारच्या मायलेज बाबतीत माहिती घ्यायची झाली तर, नॅचुरेली ऍस्पेरेतेड युनिटच्या मदतीने प्रति लिटर 23 किमी इतकं मायलेज कार देते तर विना इंधनचे हाइब्रिड व्हेरिएंट 24 किमी प्रति लिटर इतकं मायलेज देते.

मारुती स्विफ्ट हायब्रिड 2024 किंमत आणि स्पेसिफिकेशन

नव्या स्विफ्टमध्ये पॅसेंजर आणि ड्राइवर सेफ्टीसाठी 6 एअरबॅग, EBD आणि ESP, थ्री पॉइंटेड सीटबेल्ट,मोठी स्क्रिन, ऑटोमॅटिक एयर कंडीशन, वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, क्रुझ कंट्रोल आणि वायरलेस चार्जर यासारखे फिचर्स देण्यात आले आहेत. या कारला जेड सीरीजचे इंजिन मिळणार आहे. चालू तिसऱ्या जनरेशनच्या स्विफ्टमध्ये 89 bhp पॉवर आणि 113 Nm इतका टॉर्क जनरेट करणारं K12 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे पण आता नव्या पिढीच्या म्हणजे चौथ्या जनरेशनच्या स्विफ्टमध्ये इंजिन 1.2 लिटर 3 सिलेंडर पेट्रोल इंजिनने रिप्लेस होणार आहे याशिवाय नव्या फेसलिफ्ट स्विफ्टमध्ये 5- स्पीड मॅन्युअल आणि AMT गेयरबॉक्स असणार आहेत.

वाचा: 70 हजाराची जेमोपाई स्कूटर जिला चालवण्यासाठी लायसन्स-रजिस्ट्रेशनचीसुद्धा गरज नाही

मारुती सुझुकीच्या स्विफ्टच्या व्हेंटिलेटेड सीट्स या कारच प्रमुख आकर्षण आहे, भारतातल्या बदणाऱ्या वातावरणला लक्षात घेवून या कारमध्ये सीट्सची रचना काही अश्या प्रकारे करण्यात आली आहे,  ज्यातून हवा खेळती राहिल आणि प्रवास अधिक आरामदायी होईल.

वाचा: 22 हजारात मिळतेय बजाजची ही बाईक, 80 किमीचे मायलेज जाणून घ्या सर्व माहिती

ह्या कारमध्ये सेफ्टीसाठी अजून एका फिचर्सचा समावेश केला आहे; EPB म्हणजेच इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक. या फीचरमुळे ड्रायव्हरला गाडी एका इलेक्ट्रिक बटणावर आहे त्या जागेवर थांबवता येते.

वाचा: शुभम गिलचे कार कलेक्शन, महिंद्राची ही कार वापरतो क्रिकेटर

मारुती स्विफ्ट हायब्रीड भारतात लॉन्च होण्याची तारीख

मारुती स्विफ्ट ही कार भारतीय मार्केटमध्ये 5.99 लाखापासून सुरू आहे, तर ह्या कारचे टॉप मॉडेलची किंमत 9.03 लाख इतकी आहे. नव्या जनरेशनची लाँच होणारी स्विफ्टला हायब्रीड पॉवरट्रेन दिल्याने हिची किंमत 10 लाखाच्या आतमध्ये असण्याची शक्यता मांडली जातेय. ही कार येत्या मे मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. तुम्हीला जर ह्या न्यू फेसलिफ्ट स्विफ्ट बाबतीतली किंमत, बुकिंग आणि डिलीवरी बाबतीत माहिती हवी असेल तर ह्या पेजला फॉलो करा.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 
Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment