शुभम गिलचे कार कलेक्शन, महिंद्राची ही कार वापरतो क्रिकेटर

क्रिकेटच्या विश्वातला नवा गडी म्हणजेच शुभम गिलचे फॅन-फॉलोविंग असंख्य आहेत, त्याच्या प्रत्येक गोष्टीची माहिती चाहत्यांना जाणून घ्यायची असते. खालील माहितीमध्ये तुम्हाला क्रिकेटर शुभम गिलच्या कार कलेक्शन बद्दल सोबत इतक्या महागड्या कारच्या खरेदी करताना शुभम गिल नेट-वर्थची संपूर्ण माहिती शिवाय ह्या कारच्या स्पिसिफिकेशन- फिचर्सची माहिती देण्यात आली आहे.

शुभम गिल कार कलेक्शन

शुभम गिल हा भारतीय क्रिकेटर आहे, जो आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताकडून खेळतो. 8 सप्टेंबर 1999 रोजी पंजाब येथे जन्म झालेल्या शुभमने 2019 रोजी क्रिकेट खेळाच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. शुभम गिल हा इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) गुजरात टायटन्सचा कॅप्टन आहे. सध्या इंटरनेटवर या क्रिकेटरच्या संदर्भात सर्वात जास्त प्रश्न विचारला जातो तो म्हणजे शुभम गिलचे कार कलेक्शन आणि शुभम गिलचे नेटवर्थ म्हणजे नक्की शुभमाचा असा किती इनकम आहे; ज्यामुळे तो इतक्या महागड्या कार खरेदी करू शकतो.

तर शुभम गिलसुद्धा महेंद्रसिंग धोनी, युवराज सिंह सारख्या इतर क्रिकेटर प्रमाणे कारचा चाहता आहे, त्याच्या कारच्या ताफ्यात रेंज रोवर वेलार, मर्सिडीज बेंझ इ- 350 आणि महिंद्रा थार या कारच्या समावेश आहे. या तिन्ही कारची किंमत 17 लाख ते 90 लाख या दरमन्यामधल्या आहेत.

वाचा: MG ची कन्वर्टेबल कॉमेट पाहिली का? बघा ह्या कन्वर्टेबल ईव्हीचा फर्स्ट लूक, किंमत आणि सर्व काही

रेंज रोवर वेलार

लैंड रोवर रेंज रोवर वेलार या कारच्या बेस मॉडेलची किंमत 87.90 लाखापासून सुरू होते. या कारचे बाजारामध्ये 2.0 लिटरचे टर्बो पेट्रोल इंजिन आणि 2.0 लिटरचे टर्बो डिझेल हे दोन वेरिएंट्स उपलब्ध आहेत. ह्या एसयुव्हीचे इंजिन 1997-19997 cc चे आहेत. प्रीमियम क्वालिटीच्या ह्या कारमध्ये ऑल व्हील ड्राइव हा पर्याय मिळतो. सेफ्टीसाठी 6 एयरबॅग्स आणि ABS सारखे फिचर्स या एसयुव्ही कारमध्ये मिळतात.

वाचा: नव्या रंगात रंगली ओला इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या चालू डिस्काउंट आणि ऑफर्सची माहिती

मर्सिडीज बेंझ इ- 350

शुभम गिलच्या कार कलेक्शन मधील लग्जरी कार मर्सिडीज बेंझ इ- 350 हिची किंमत 72 लाखापासून सुरू होते. ह्या कारचे पेट्रोल आणि डिझेल इंजिन 1950 cc, 1991 cc आणि 2925 cc चे या असून रिअर-व्हील-ड्राइव कारचा टॉप स्पीड 240 ते 250 किलोमीटर प्रति तासाचा आहे. ह्या टॉपक्लास कारमध्ये प्रीमियम आणि आकर्षक डॅशबोर्ड सोबत कमालीचे सेफ्टी आणि एडवांस्ड फिचर्स मिळतात.

वाचा: टीवीएसचा सर्वात मोठा सेल, इलेक्ट्रीक स्कूटरच्या खरेदीवर 41,000 रुपयांचे फायदे, जाणून घ्या फिचर्स, सबसीडी आणि सर्व माहिती

नवीन महिंद्रा थार

साधारण 11 लाखापासून सुरू होणारी महिंद्राची ही एसयुव्ही थारसोबत शुभम गिलला अनेकदा बघण्यात आले आहे. ऑटोमेटिक आणि मॅन्युअल ट्रांसमिशन पर्यायाच्या ह्या ऑफरोडिंग एसयुव्हीमध्ये टर्बो डिझेल आणि टर्बो पेट्रोल इंजिन मिळते. ही कार एका लिटरमध्ये 15 किमी इतके मायलेज देते. सेफ्टीसाठी या कारमध्ये अँटी- लॉक ब्रेकिंग सिस्टम, ब्रेक असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल असे अनेक एडवांस्ड फिचर्स देण्यात आले आहेत.

शुभम गिल नेट-वर्थ

आत्ता इतक्या महागड्या कार खरेदी करणाऱ्या क्रिकेटरचा नक्की इनकम किती आहे? हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वानाच आहे, तर शुभम गिलचा वार्षिक उत्पन्नाचा आकडा हा 30 करोडच्या वर जातो, क्रिकेट विश्वात उतरल्यानंतर शुभम गिलचे 2020 मधील वार्षिक उत्पन 20 करोड, 2021 मध्ये 22 करोड, 2022 मध्ये 25 करोड, 2023 मध्ये 31 करोड इतके झाले आहे.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment