टीवीएसचा सर्वात मोठा सेल, इलेक्ट्रीक स्कूटरच्या खरेदीवर 41,000 रुपयांचे फायदे, जाणून घ्या फिचर्स, सबसीडी आणि सर्व माहिती

डिस्काउंट कोणाला आवडत नाही? आणि हा डिस्काउंट जर वाहनांवर मिळत असेल तर मात्र सोन्याहून पिवळं, म्हणूनच TVS iQube सुद्धा त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर वर पहिल्यांदा इतिहासात पहिल्यांदाच सर्वात मोठी सवलत देत आहे, ही सवलत तब्बल 30000 पेक्षा जास्त आहे. तुम्हाला सुद्धा या इलेक्ट्रिक स्कूटरची ओरिजनल किंमत, स्कूटरच्या खरेदीवर मिळणारी सबसीडी, स्कूटरचे ॲडव्हान्स फीचर्स आणि आत्ता चालू असणारा स्कूटरवरचा डिस्काउंट शिवाय स्कूटरसाठी बुकिंग कशी करायची, ही सगळी माहिती जाणून घ्यायची असेल, तर खालील लेख वाचा.

टीवीएस आईक्यूबच्या खरेदीवर 41,000 रुपयांचे फायदे

टीव्हीएस सध्या स्टॉक क्लिअरन्ससाठी त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरवर सवलती देत आहे. टीव्हीएस आयक्यूबने इतिहासात पहिल्यांदाच सर्वात डिस्काउंट इलेक्ट्रिक स्कूटरवर दिलेला आहे. डिस्काउंटची माहिती देता टीव्हीएस आयक्यूबच्या खरेदीवर 41 हजार रुपयांपर्यंत फायदा मिळू शकतो. जर तुम्ही आयक्यूबची खरेदी डीलरकडून केली तर तुम्हाला तब्बल 6,000 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे शिवाय तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करताना ‘नो कॉस्ट ईएमआय’ हा पर्याय निवडला तर त्यात 7,500 रुपयांचा डिस्काउंट अधिक दिला जाणार आहे.  नॉर्मली टीव्हीएस आयक्यूब इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेताना स्कूटरची वॉरंटी वाढवायची असेल तर त्यासाठी 5,000 रुपये एक्सट्रा भरावे लागतात, पण ह्या महिन्यात जर स्कूटरच बुकिंग केलं तर तुम्हाला हे 5,000 रुपये सुद्धा भरायची गरज नाही पडणार म्हणजेच टीव्हीएस आय क्यूब ची एक्सटेंडेड वॉरंटी सुद्धा या महिन्यात अगदी फ्री होणार आहे.

वाचा : एथरची सर्वात महागडी इलेक्ट्रिक स्कूटर, या नव्या अपडेट्समुळे वाढली स्कुटरची किंमत

वाचा : टाटा मोटर्सची हवा, टाटाच्या पंच आणि नेक्सॉनची रेकॉर्ड-ब्रेक विक्री

वाचा : TATA Nexon सह वाढली, टाटाच्या ‘या’ टॉप गाड्यांची किंमत

आईक्यूबच्या खरेदीवर 22,065 रुपयांची सबसिडी

ओला एस वन प्रो आणि बजाज चेतकसारख्या इलेक्ट्रिक स्कूटरना टक्कर देणाऱ्या ह्या टीव्हीएस स्कूटरच्या खरेदीवर 22,065 रुपयांची सबसिडी सुद्धा मिळते पण ही सबसिडी 1 एप्रिल 2024 पासून बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे तुम्ही जर ही इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल, तर हीच ती सुवर्णसंधी आहे, ज्याचा तुम्हाला सर्वाधिक फायदा मिळू शकतो.

टीवीएस आईक्यूब

सध्या बाजारात या इलेक्ट्रिक स्कूटरचे दोन व्हेरिएंट्स उपलब्ध आहेत टीव्हीएस आयक्यूब स्टॅंडर्ड आणि टीव्हीएस येस. आयक्यू स्टॅंडर्डची किंमत 1,55,600 रुपये आहे तर आयक्यूब एसची किंमत  1,62,290 रुपये इतकी आहे. टीव्हीएसचे हे दोन्ही व्हेरिएंट्स सात रंगांमध्ये उपलब्ध आहेत.

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये तीन लिथियम आयन बॅटरी-पॅक दिलेले आहेत, ज्या 2.25 किलो वॅटचा पॉवर जनरेट करतात. एका चार्जमध्ये ही स्कूटर 100 किलोमीटर पर्यंत रेंज देते. या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड 78 किलोमीटर प्रतितास असून, तिची बॅटरी चार्ज होण्यासाठी 5 तास लागतात. ही इलेक्ट्रिक स्कूटर इको मोड मध्ये 40 किलोमीटर प्रतितास इतकी रेंज देते. या स्कूटरच्या बॅटरीला आणि मोटारी तीन वर्षांची वॉरंटी मिळते.

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये इन्स्ट्रुमेंट कन्सोल,ऑडोमीटर, स्पीडोमीटर, टॅकोमीटर, ट्रिपमीटर हे डिजिटल दिले गेलेले आहेत शिवाय एलईडी हेडलाईट, एलईडी टेललाईट, एलईडी टर्नसिग्नल, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, कॉल एसएमएस अलर्ट, अलार्म, ल-बॅटरी इंडिकेटर, घड्याळ, मोबाईल ॲप कनेक्टिव्हिटी लाईट, जीपीएस आणि नेवीगेशन पोर्ट, चार्जिंग पोर्ट, रायडिंग मोड स्विच, पार्किंग असिस्टंट, स्टार्ट-स्टॉप बटन यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. शिवाय या स्कूटरमध्ये टायटॅनियम ग्रे, मर्क्युरी ग्रे, कॉपर ब्रॉन्स, मिंट ब्लू, लुसिड येलो, रेसिंग रेड आणि पर्ल व्हाईटसारखे रंग उपलब्ध आहेत.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment