टाटा मोटर्सची हवा, टाटाच्या पंच आणि नेक्सॉनची रेकॉर्ड-ब्रेक विक्री

वर्षाच्या दुसरा महिना चालू झाल्या झाल्या टाटा मोटर्सने नेक्सॉन, पंच SUV आणि टाटा च्या इतर काही कारची झालेल्या रेकॉर्ड-ब्रेक विक्रीसंबंधित पोस्ट टाकली होती, ज्यामुळे संपूर्ण वाहनक्षेत्रात हाहाकार माजला होता, चला जाणून घेऊया टाटा मोटर्सच्या टॉप सेलिंग कार आणि त्यांची माहिती

टाटा सेल्स ब्रेकअप जानेवारी 2024

टाटा मोटर्स च्या बरोबरीला मारुती सुझुकी , टोयोटा किर्लोस्कर मोटर्स, महिंद्रा आणि महिंद्रा,या वाहनबाजारातील नामांकित कंपन्या यांनी चालू वर्षात अनेक नव्या ‘एक से बढकर एक’ वाहनांना लॉंच केलं आहे. टाटा मोटर्सची जानेवारी 2023 मध्ये 81,069 वाहनांची विक्री झाली होती, तर जानेवारी 2024 मध्ये देशांतर्गत 84,276 युनिट्सची विक्री केली आहे, विक्री निदेर्शनावरून टाटा मोटर्स कंपनीला विक्रीच्या बाबतीत दुसरा क्रमांक मिळाला आहे. यामधील विक्रीत इलेक्ट्रिक कारचा 12 ते 15 % सेल झाला आहे.
टाटा मोटर्सने जानेवारी 2023 मध्ये 47,990 युनिट्सची विक्री केली, तर जानेवारी 2024 मध्ये टाटा मोटर्सने 53,635 युनिट्सची विक्री करून 11.8 टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवून रेकॉर्ड ब्रेक केलंय.
2024 tata sale

टॉप 10 मध्ये टाटा पंच आणि नेक्सॉन

टाटा पंच या कारची जानेवारी 2023 मध्ये विकल्या गेलेल्या 12,006 युनिट्सच्या तुलनेत 50 टक्के वाढ झाली आहे, म्हणजेच टाटा पंच या चारच्या जानेवारी 2024 मध्ये 17,978 युनिट्स विकल्या गेल्या आहेत तरह्या वर्षात नेक्सॉनच्या विक्रीमध्ये 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे, या वर्षात नेक्सॉनच्या 17,182 युनिट्सची विक्री झाली आहे.

जानेवारी 2024 मध्ये टाटा च्या सर्वात लोकप्रिय ठरलेल्या कारमध्ये हॅरियर आणि सफारीचा समावेश होतो,  जानेवारी 2024 मध्ये टाटा हॅरियरच्या 2,626  युनिट्सची विक्री झाली, तर टाटा सफारी जानेवारी 2024 मध्ये 2,893 युनिट्सच्या विकली गेली आहे.

वाचा: टाटा कर्वचा शानदार लुक, पावरफुल इंजन आणि कमाल फीचर्स जाणून घ्या

टाटाच्या ‘या’ कारच्या विक्रीत मात्र घट

टाटाच्या पंच आणि नेक्सॉनच्या तुलनेत मात्र टियागोच्या विक्रीत घट झाली आहे, कारण जानेवारी 2023 मध्ये 9,032 टियागो कारची विक्री झाली होती पण त्याच तुलनेत या वर्षात केवळ 6,482 युनिट्स विकल्या गेल्या आहेत.

Tata Altroz या कारच्यासुद्धा विक्रीत घट झाली आहे, ​​कारण जानेवारी 2023 मध्ये 5,675 टाटा आल्ट्रोस कारची विक्री झाली होती पण त्याच तुलनेत या वर्षात केवळ 4,935 युनिट्स विकल्या गेल्या आहेत.

2024 मध्ये टाटाच्या लॉंच झालेल्या कार

नुकत्याच पार पडलेल्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2024 मध्ये टाटाने Tata Punch- 5.93-9.49 लाख रुपये, Tata Tiago iCNG- 6.29-7.81 लाख रुपये, Tata Tiago – 5.40-7.82 लाख रुपये , Tata Nexon -7.60-14.08 लाख रुपये आणि Tata Harrier – 14.70-22.20 लाख रुपये किंमतीचे मॉडेल लॉंच केले आहेत.
Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment