मोठ्या कुटुंबासाठी कार खरेदी करताय? पहा Kia ची Carnival Hybrid, जाणून घ्या फीचर्स, किंमत आणि सर्व काही

कियांच्या इतिहासात पहिल्यांदाच किया कार्निव्हलमध्ये हायब्रीड ऑफर करत आहे, कियाच्या कारला Carnival HEV म्हणून नाव देण्यात आले आहे. हि कार 7 सीटर असून मोठ्या फॅमिलीसाठी उत्कृष्ट असणार आहे, किया सेलटॉसच्या तुलनेत किया कार्निव्हल हायब्रीडच्या अनुभव कमालीचा असणार आहे.

कार्निवल HEV मध्ये चार ट्रिम देण्यात आले असून, हायब्रीड टेक्निलॉजी दिली गेलेली, Kia Carnival Hybrid यूनिक फीचर्सने भरपूर असणार आहे. 2.2 डिझेल इंजिन आणि 1.6 लिटरच्या टर्बो इंजिन असणाऱ्या या हाइब्रिड मॉडलचे वर्षाअखेरीस आगमन होण्याची शक्यता मांडली जातेय. चला जाणून घेऊया या कारचे फीचर्स, स्पेसिफिकेशंस, किंमत आणि बुकिंग बद्दल सर्व माहिती.

Kia Motors India

भारतामध्ये किया मोटर्सने कार्निवलची विक्री थांबली होती, ही MPV 13.9 किमी/लिटर मायलेज देत होती, पण त्याच तुलनेत नवीन कार्निव्हलमध्ये इलेक्ट्रिक मोटर दिली गेली आहे, ज्यामुळे त्याची या कारची इफिशिएन्सी आणि मायलेज कमालीची सुधारू शकते.

Kia Motors India ने मागील महिन्यात सब-कॉम्पॅक्ट SUV, Kia Sonet चे फेसलिफ्ट लाँच केले होते, जे खूप लोकप्रिय ठरले. पाच-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनने सुसज्ज असणाऱ्या या कारमध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन दिले असून या कारच्या एंट्री-लेव्हल HTE व्हेरियंटची किंमत 8 लाख रुपये आहे आणि आता शिकागो ऑटो शो (CAS) मध्ये कियाने हायब्रीड कार्निवल सादर करून स्वतःला अपडेट केलं आहे. या कारच्या अपडेटमध्ये चार ट्रिम LXS, EX, SX, SX व्हेरिएंट ऑफर केले जाणार आहेत.

किया कार्निवल हायब्रिड: फीचर्स

किया कार्निवल HEV मध्ये परफॉर्मेन्स आणि सेफटीवर अधिक भर देण्यात आला आहे.

आधुनिक फीचर्समध्ये ई-हँडलिंगची सुविधा, ऍडवान्सड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) , ऑपरेशन असिस्ट, जंक्शन क्रॉसिंग (FCA-JC), लेन-चेंज ऑनकमिंग (FCA-LO), आणि लेन-चेंज साइड (FCA-LS), नेव्हिगेशन-बेस्ड स्मार्ट क्रूझ कंट्रोल (N-SCC) आणि इंटेलिजेंट स्पीड लिमिट असिस्ट (ISLA) यांचा समावेश आहे.

एअरफ्लो डेव्हलप होण्यासाठी 17-इंचाचे व्हील्स , रीजेनरेटिव ब्रेकिंग सिस्टीम सोबत रिजनरेटिव्ह ब्रेकिंगचे तीन मोड, ई-हँडलिंग ज्यामुळे अगदी चिंचोळ्या एरियाच्या आत शिरताना किंवा बाहेर पडताना मदत होते, ई-राइड , ई-इव्हेसिव्ह हँडलिंग असिस्ट यासारख्या सुधारित फीचर्सचासुद्धा समावेश आहे.

वाचा: इलेक्ट्रिक ड्यूकचा बोलबाला, एकदा पहाच KTM ची पहिली इलेक्ट्रिक बाइक

किया कार्निवल HEV इंटीरियर आणि एक्सटेरिअर

या एमपीव्हीच्या इंटिरियरला नव्याने डिझाईन मिळाले आहे, नवीन डॅशबोर्ड आणि सेंटर कंसोलच्या जोडीला डिजिटल सेंटर मिरर, कारच्या केबिनमध्ये 12.3 इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 12.3 इंचाचा डिजिटल गेज क्लस्टर असणार आहेत. मागील सीटवर बसलेल्या प्रवाश्यांच्या मनोरंजनासाठी 14.6 इंच हाई डेफिनेशन स्क्रीन आणि  कनेक्टिव्हिटीसाठी 7 यूएसबी-सी पोर्टही दिले गेले आहेत.

किया कार्निवल HEV एक्सटेरिअरमध्ये संपूर्ण नव्याने बनवलेला फ्रंट फॅसिआ सरळ आणि नव्याने डिझाइन केलेले हेडलॅम्प , आयताकार काळ्या रंगाचा ग्रिल तर कारच्या मागील बाजूस वळता 17-इंच अलॉय व्हील,19-इंचाचे व्हील्स, नवीन बंपर, रिडिझाईन  टेललाइट्स यांचा समावेश आहे.

वाचा: Tata Punch EV Prices: पंच ईव्ही सर्व मॉडेल्सच्या महाराष्ट्रातील ऑन रोड किमती (फेब्रुवारी)

किया कार्निवल हायब्रिड इंजिन

2025 किया कार्निवल HEV च्या अगदी मध्यभागात शक्तिशाली 1.6-लिटर टर्बो-हायब्रीड इंजिन उपस्थित आहे , या कारमधील इलेक्ट्रिक मोटर 72 bhp पॉवर आउटपुट तयार करते. इंजिन आणि मोटारीचे एकत्रित पॉवर आउटपुट करण्याची क्षमता 242 bhp आणि 367 Nm इतकी आहे. याकारमध्ये  दिल्या गेलेल्या इलेक्ट्रिक मोटरमुळे जबरदस्त टॉर्क आणि स्पीड जनरेट होण्याची मदत होते, या कारमध्ये 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स उपलब्ध आहेत.

वाचा: टाटा मोटर्सच्या 4 नवीन इलेक्ट्रीक कार झाल्या लॉंच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

किया कार्निवल हायब्रिड लॉंचिंग, किंमत आणि बुकिंग

कियाची नवीन कार- किया कार्निवल हायब्रिड भारतमध्ये वर्षाअखेरपर्यंत लॉंच होण्याची शक्यता मांडली जातेय, ही कार कियाच्या सोनेटच्या तुलनेत जास्त किंमतीत म्हणजेच साधारण 40 लाख इतकी या कारची किंमत असू शकते. अजूनपर्यंत या कारच्या किंमतीची माहिती बाहेर पडली नाहीये, आणि हि कार लॉंच झाल्यावर तुम्ही तुमच्या जवळील किया कार डीलर कडे भेट देऊन या कार साठी  बुकिंग करू शकता.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment