टाटा मोटर्सच्या 4 नवीन इलेक्ट्रीक कार झाल्या लॉंच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

सर्वत्र टाटा मोटर्स चा बोलबाला आहे, आणि याचं कारणसुद्धा तसं special आहे, टाटा मोटर्स लॉंच करत आहे नवीन इलेक्ट्रिक कार्स ज्या बेस्ट परफॉर्मन्स, आकर्षक लुक आणि पॉवरफुल बॅटरी साठी ओळखल्या जाणार आहेत. यामध्ये CURVV ईव्ही, सिएरा ईव्ही, अल्ट्रोझ ईव्ही आणि हॅरियर ईव्ही यांचा समावेश आहे. टाटाच्या या सेफेस्ट कार 12 ते 30 लाख किंमती दरम्यान मधल्या आहेत.

ऑटो एक्सपो 2024 मध्ये भारतमधली टॉप कंपनी टाटा मोटर्स ने नवनवीन कार लॉंच करून ,या कार्यक्रमाला ‘चार-चांद’ लावले. टाटासोबत अशोक लेलँड, बीएमडब्ल्यू इंडिया, हिरो मोटोकॉर्प, होंडा कार्स इंडिया, ह्युंदाई मोटर इंडिया, किया इंडिया, मारुती यासह अठ्ठावीस कंपन्या सहभागी या सोहळ्याला सहभागी झाल्या, पण टाटाच्या काही कार्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं,चला जाणून घेऊया या कार किंमती,फीचर्स अन बरंच काही खालील लेखामार्फत.

Tata कर्व ईव्ही फीचर्स लॉन्चिंग आणि किंमत

CURVV ईव्ही हि कार फक्त ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध आहे. CURVV ईव्ही चे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे हि कार टाटाच्या इतर सेगमेंटच्या तुलनेत ‘सगळ्यात जास्त रेंज देणारी कार’ असणार आहे. कर्व ईव्ही हि नेक्सॉन ईव्ही पेक्षा अधिक रेंज देईल. हि कार कॉम्पॅक्ट SUV स्पेसला म्हणजेच हॅरियर आणि नेक्सॉनला टक्कर देईल. या कारचा ट्रान्समिशन टाईप औटोमॅटिक आहे, फ्रंट ब्रेक डिस्क टाईप आहे. कारमध्ये 4 लोक आरामात बसू शकतात. हि कार पूर्णपणे इलेक्ट्रिक आहे.

टाटा कर्व ईव्ही 2024 ला, MR (मिडीयम रेंज) आणि LR (लाँग रेंज) प्रकार मिळतील, मिडीयम रेंज मध्ये आढळणारी 40.5kWh बॅटरी पॅक असेल. लाँग रेंजमध्ये 50kWh किंवा त्याहून जास्त क्षमतेची बॅटरी पॅक असेल, जी  550km ची रेंज देईल. CURVV ईव्ही ची  किंमत साधारणतः किंमत २० लाख असण्याची शक्यता आहे.

वाचा: टाटा Nexon i-CNG ला मिळणार ‘भरपूर बूटस्पेस’, भारतातील पहिली टर्बो सीएनजी कार

सिएरा ईव्ही फीचर्स लॉन्चिंग आणि किंमत

Tata Sierra ईव्ही च्या एक्सटेरिअर मध्ये LED हेडलॅम्प, DRLs आणि टेललाइट्स, पुढील आणि मागील बाजूस LED लाइट बार, मोठ्या डायमंड-कट अलॉय व्हील्स, ब्लॅक-आउट सी आणि डी-पिलर, इंटिग्रेटेड स्पॉयलर, रूफ रेल, फॉक्स स्किड यांचा समावेश असेल. फ्लश-फिटिंग डोअर हँडल्स सुद्धा या गाडीत उपलब्ध आहेत.

साधारणतः 2025 च्या सुरुवातीला Sierra ईव्ही लाँच करेल अशी अपेक्षा आहे.सिएरा ईव्ही क्रिएटिव्ह, फियरलेस, फियरलेस प्लस आणि एम्पॉर्ड अशा चार प्रकारांमध्ये लाँच केली जाऊ शकते. Sierra ईव्ही ची किंमत २० ते ३० लाखापर्यंत असू शकते, पण Sierra ईव्ही च्या प्रकारावर किंमत कमी-जास्त होऊ शकते.

वाचा: स्वस्तात मस्त आणि 150km पेक्षा अधिक रेंज देणारी ‘RV400 BRZ’

Altroz ईव्ही फीचर्स लॉन्चिंग आणि किंमत

नवीन Tata Altroz ​​ईव्ही मध्ये एक मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, नवीन स्टीयरिंग व्हील, ड्राइव्ह मोड निवडक आणि औतुमतीच क्लायमेट कंट्रोल हे नवीन असेल. Altroz ​​ईव्ही मध्ये वेगळेपणा जाणवतो ते म्हणजे कारमध्ये दिलेल्या एक्सटेरिअर फीचर्स मुळे , ज्यात ब्लँक-ऑफ फ्रंट लोखंडी जाळी, ट्वीक केलेले हेडलॅम्प आणि टेललाइट्स, रिडिझाइन केलेले अलॉय व्हील्स आणि निळ्या ॲक्सेंटसह नवीन पेंट यांचा समावेश आहे.

साधारणतः 2025 च्या सुरुवातीला टाटा 14 लाख या किंमतीत Altroz ईव्ही लाँच करेल अशी अपेक्षा आहे.

वाचा: महाराष्ट्रात पेट्रोलचे दर(LIVE):आजचा पेट्रोलचा भाव 29 जानेवारी 2024

हॅरियर ईव्ही फीचर्स लॉन्चिंग आणि किंमत

हॅरियर ईव्ही ही पाच-सीटर SUV असून यामधले ग्रिल टाटा Curv शी मिळतेजुळते असतील. पाच-सीटर SUV केबिनमध्ये पुरेशी जागा, हेडलॅम्प, एलईडी टेल लॅम्प स्टँडर्ड, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, पॅनोरामिक सनरूफ, कनेक्टिव्हिटी आणि ADAS सुरक्षा सूट यासारख्या वैशिष्ठांचा या कार मध्ये समावेश असेल.

मध्यम रेंज आणि लॉन्ग रेंज या दोन रेंज प्रकारातून लॉंच होणाऱ्या  हॅरियर ईव्ही ची किंमत 22.00 – 25.00 लाख इतकी असू शकते. 

Leave a Comment