एथरची सर्वात महागडी इलेक्ट्रिक स्कूटर, या नव्या अपडेट्समुळे वाढली स्कुटरची किंमत

Ather 450 Apex डिलिव्हरी सुरू झालेली असून, ह्या इलेक्ट्रिक स्कूटरची सर्वात जास्त चर्चा तिच्या किमतीमुळे होते. ह्या इलेक्ट्रिक स्कूटरला ‘सर्वात महागडी इ-स्कूटर’ म्हणून ठरवण्यात येत आहे. असं काय आहे ज्यामुळे या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत लाखाच्या घरात वाढते? असे कोणते फिचर्स इतक्या महागड्या किंमतीच्या बदल्यात मिळणार आहेत या Apex मध्ये? याचसोबत एथरची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर रिझटाबद्दल सर्व माहिती खालील लेखातून जाणून घेवूया.

एथर एनर्जी ही इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी लॉन्ग रेंज देणाऱ्या आणि एडवांस्ड फीचर्सने भरपूर असणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी खूप प्रसिद्ध आहे आणि आता एथर एनर्जी स्वतःची सर्वात महागडी ‘एथर 450 अपेक्स’ ही स्कूटर घेऊन बाजारात येत आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी सुद्धा सुरू झालेली आहे.या स्कूटरची बुकिंग प्रोसिजर सुद्धा खूप सोपी आहे.

एथर 450 अपेक्सचे नवे अपडेट्स

तगड्या किमतीच्या मानाने इतर 450 अपेक्समध्ये अनेक ॲडव्हान्स फीचर्स आणि ऍडव्हान्स बदल करण्यात आलेले आहेत. 450 एपेक्स मध्ये सर्वात पॉवरफुल मोटर देण्यात आली आहे ही मोटर 7.0 kw असून 26 Nm टॉर्क जनरेट करते. या स्कूटरला मिळालेल्या पारदर्शक साईड बॅनर्स मुळे स्कूटरचे इंटरनल पार्ट सुद्धा लगेच दिसून येतात आणि स्कूटरला मिळालेला रंग जो ‘इंडियन ब्लू’ खूपच खूपच आकर्षित आहे.

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये नव्याने गोष्टींचा समावेश केलेल्या गोष्टीमध्ये 5 वर्ष किंवा 60,000 किलोमीटरपर्यंत या स्कूटरची बॅटरी वॉरंटी, 3 वर्ष किंवा 30,000 किलोमीटरपर्यंत या इलेक्ट्रिक स्कूटरची वॉरंटी, स्कूटरसोबत तुम्हाला पोर्टेबल होम चार्जर मिळत आहे जो फक्त पाच तास 45 मिनिटात संपूर्ण बॅटरी फुल चार्ज करतो आणि या चार्जरला 3 वर्षाची वॉरंटी सुद्धा मिळते.

वाचा: आणि अचानक बाहेर पडले रेनॉल्टचे ‘सिक्रेट मॉडेल’ कमी किंमत शिवाय 400Km पेक्षा जास्त रेंज देणारी ईव्ही

वाचा: ही घ्या टाटाच्या नव्या 3 वेरिएंट्सची किंमत, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

वाचा: Ola ने लाँच केली स्वस्तात 200 किमी रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर

एथर 450 अपेक्स स्पेसिफिकेशन आणि फिचर्स

एथर 450 एपेक्सच्या स्पेसिफिकेशन आणि फिचर्स बाबतीत माहिती देता, ही इलेक्ट्रिक बाइक-स्कूटरची रेंज 150 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. यामध्ये स्टॅंडर्ड टॉप व्हेरिएंट  उपलब्ध आहे. या इलेक्ट्रिक स्कूटर च्या बॅटरीला चार्ज होण्यासाठी चार तास तीस मिनिटे लागतात. एका चार्जमध्ये ही स्कूटर 157 किलोमीटर इतकी रेंज देते. या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड 100 किलोमीटर प्रति तास असून, या बॅटरीला पाच वर्ष किंवा 60000 किलोमीटर इतकी वॉरंटी दिलेली आहे.

या इलेक्ट्रिक स्कूटरच्या ॲडव्हान्स फिचर्समध्ये रायडिंग मोड, म्युझिक कंट्रोल, कॉल एसएमएस अलर्ट, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, मोबाईल ॲप्लिकेशन, चार्जिंग स्टेशन लोकेटर, पॅसेंजर फुट रेस्ट, यूएसबी चार्जिंग पोट आणि डिस्प्ले दिलेले आहेत यासोबत स्पीडोमीटर,क्लॉक, इन्स्ट्रुमेंट कन्सोल या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये डिजिटल दिलेले आहेत. स्कूटरमध्ये स्मार्ट, इको, राईड, वॉर्प आणि वॉर्प प्लस हे मोड्स दिले आहेत. स्कूटरमध्ये एलईडी टेललाईट, एलईडी टर्नसिग्नल लॅम्प आणि एलईडी हेडलाईट दिलेले आहेत, स्कूटरमधील बॅटरी लिथियम आयन असून या बॅटरीची पाच वर्ष किंवा 60000 किलोमीटर इतकी वॉरंटी आहे.

एथर रिझटा फीचर्स

रिझटा मधल्या फीचर्समध्ये स्पेस भरपूर देण्यात आली आहे. अपेक्षित फीचर्समध्ये प्रशस्त फ्लोअरबोर्ड, डिजिटल क्लस्टर, टचस्क्रीन इन्स्ट्रुमेंट कन्सोल, अलॉय व्हील, फ्रंट डिस्क ब्रेक, स्टायलिश एलईडी लॅम्प, राइडिंग मोड , फास्ट चार्जिंग आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी यांचा समावेश आहे.या Rizta ची अंदाजे किंमत रु. 1.25 लाख असणार आहे.

एथर 450 अपेक्स बुकिंग

या आकर्षक किमतीत कमालीचे आणि ॲडव्हान्स फीचर्स केवळ लिमिटेड एडिशन मॉडेल्स मध्येच मिळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही एथर 450 एपेक्स साठी बुकिंग करू शकता. तुम्हाला जर ही स्कूटर बुक करायची असेल तर लवकरात लवकर तुम्ही तुमच्या जवळील एथर शोरूममध्ये भेट देऊन 2500 रुपयांची रिफंडेबल एमाउंट भरून करू शकता.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment